टाटांच्या बद्दल इतकं लिहिलं आणि वाचलं गेलं आहे की हातात "टाटायन" पुस्तक घेतलं तेव्हा "जस्ट अनादर बुक ऑन टाटा" असेल असं वाटलं होतं. परंतु गिरीश कुबेर यांनी नुसेरवान टाटांपासून रतन टाटांपर्यंतचा उद्योगजगातील अद्भुत प्रवास या पुस्तकात अत्यंत विस्तृतपणे चितारला आहे.
@LetsReadIndia
@LetsReadIndia
वंशपरंपरेने पुजारी बनायचं सोडून नुसेरवानजी कापसाच्या उद्योगात मुंबईत आले. जागतिक बाजारपेठेतील घडामोडीवरचे बारीक लक्ष, उद्यमशील चिकाटी वृत्ती, नुकसानीतही कर्जदारांचे कर्ज फेडून विश्वास आणि नैतिकतेच्या बळावर सुरू झालेला हा प्रवास अथ पासून इति पर्यंत सर्व उद्योगात आजही आघाडीवर आहे.
जमशेदजी टाटांनी भारतात पोलाद उद्योग उभारण्याचे पाहिलेले स्वप्न दोराबजींनी पूर्ण केले. त्यासोबत IISc बंगलोर आणि मुंबईला वीज देणारे वळवण डॅमचेही स्वप्न पूर्ण केले. १५० वर्षे पाच पिढ्या उद्योग करत असताना सामान्यांना चिरस्थायी फायदा कसा होईल हा टाटाविचार आपल्याला पदोपदी थक्क करतो.
जेआरडी टाटांकडे अध्यक्षपदाची सूत्रे आल्यानंतर आव्हानात्मक काळात देशाच्या विकासात भर घालण्याचे अभूतपूर्व कार्य त्यांनी केले. विमानापासून मिठापर्यंत टाटा नक्की किती क्षेत्रात कार्यरत होते याचे धक्क्यांमागून धक्के पुस्तक वाचताना मिळतात. Telco मधले सुमंतजींचे योगदानही स्पृहणीय आहे.
रतन टाटांना टाटा ग्रुपच्या अध्यक्षपदी नेमले तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. पण रतन टाटांनी टाटांच्या नीतीमूल्यांशी कसलीही तडजोड न करता अंतर्गत विरोधाला न जुमानता टाटा उद्योगसमूहाला नवे तंत्रस्नेही आणि नव्या स्पर्धात्मक जगात बलवान कसे बनवले याचा आढावा लेखकाने घेतला आहे
टाटांबद्दल, त्यांच्या मूल्याधिष्ठित उद्योग उभारणीबद्दल जितकं वाचावं तितका अभिमान वाढत जातो. सरकारचे बोट धरून अथवा सरकारला बोटावर नाचवून वाट्टेल तितका नफा कमवायचा मार्ग उपलब्ध असतानाही नेटाने आणि नीतीने देश पुढे नेणाऱ्या टाटांवरचे हे पुस्तक नक्की वाचा! https://www.amazon.in/dp/8174348182/ref=cm_sw_r_cp_apa_i_fgTmFbDWPE6HF">https://www.amazon.in/dp/817434...