#tweet4bharat
#लैंगिकसमानता
यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः।
यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफलाः क्रिया:।।
मनुस्मृती (3-56)
जेथे स्त्रियांची पूजा होते/मान दिला जातो,तेथे देवता आनंदाने राहतात. जेथे त्यांचा मान राखला जात नाही तेथे सर्व कार्ये निष्फळ होतात.
पुत्रेणदुहितासमा
पुत्र, पुत्री हे समान आहेत

प्राचीन काळी स्त्री/पुरूष ह्यांचे सामाजिक स्थान समानतेचे होते. शिक्षण, राजकारण, युद्धशास्त्र, स्वतःचा वर स्वतः निवडणे, पौरोहित्य, संन्यास, अश्या अनेक बाबतीत स्त्रियांना समान अधिकार होते.
आपण सरस्वतीला विद्येची देवता, पार्वतीला शक्तीची
आणि लक्ष्मीला धनसंपदेची देवता मानतो.

मैत्रेयी, गार्गी, कात्यायनी ह्या प्राचीन काळातील विदुषी. कैकयी ने राजनीती, युद्धनीतीचे शिक्षण घेतले होते. आद्य शंकराचार्य - मंडन मिश्रा वादविवादात परीक्षक विदुषी भारती होत्या. संत मुक्ताबाई, जनाबाई या अध्यात्मिक उन्नतीसाठी प्रसिद्ध आहेत.
अहिल्याबाई होळकर, जिजामाता, ताराबाई, राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले ह्या काळाच्या पुढे चालणाऱ्या स्त्रिया.
अश्या उच्च परंपरा असतांना, नेमकं गणित कुठे चुकत गेलं? आपल्या कडे सतीप्रथा, बालविवाह, स्त्रियांनी घरा बाहेर पडायचे नाही, हे बदल कधी, कसे झाले?
त्याचं उत्तर आहे-परकीय आक्रमणं आणि आपली बदलत गेलेली मानसिकता.

यवनांनी आक्रमणांत स्त्रियांवर कुदुष्टी केली. तेव्हा पासून भारतात स्त्रियांच्या प्रगतीला खोडा बसला.बळजबरीने लेकी-बाळी पळवणे ह्या प्रकारामुळे समाजाची मानसिकता बदलायला लागली. स्त्रियांचे बाहेर पडणे, हे त्यांच्यासाठी
धोकादायक व्हायला लागलं. बाहेरच पडायचं नाही मग शिक्षण कसे घेणार? बालविवाहा मागचा हेतू हा की मुलगी लवकर नवऱ्या घरी गेली, की आपली जवाबदारी संपली. सती प्रथा.. नवरा गेल्यावर तिला कोण सांभाळणार? त्यापेक्षा सती गेलेली बरी.. केशवपन, जौहर सारख्या महाभयंकर परंपरा रूढ झाला. परकीयांनी जेता
म्हणून स्त्रियांवर अत्याचार केले तर आपल्या लोकांनी आक्रमक भूमिका न घेता, पळपुटा मार्ग शोधला.

१९५० मधे प्रजासत्ताकाच्या स्थापनेमुळे स्त्रियांना समान दर्जा व सर्व क्षेत्रांत समान संधीची तरतूद मिळाली. अनेक समाजसुधारकांनी चळवळी उभ्या केल्या ज्यामुळे बरेच सकारात्मक बदल झाले. अजून
बराच बदल व्हायला हवा आहे. हा बदल आपण एक समाज म्हणून,घडवणे अशक्य नाही.
आजच्या सामाजिक परिस्थितीचा विचार केला तर आपल्या समोर 3 बाजू उभ्या राहतात:

1. स्त्रियांची सुधारत असलेली एकंदर परिस्थिती: संघर्ष, चिकाटी आणि अंगी असलेल्या गुणांच्या जोरावर आज नारी शक्ती अनेक क्षेत्रात आघाडीवर
आहेत. किरण बेदी, मीरा बोरवणकर, टेसी थॉमस, डॉ इंदिरा हिंदुजा, मेरी कॉम, हिमा दास, अंजना भदुरीया, शांती तिग्गा अश्या अनेक स्त्रियांनी वैद्यकीय, संशोधन, अणुशक्ती, खेळ, पोलीस, डिफेन्स क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. हे प्रयत्न निरंतर चालू आहे आणि समाजासाठी उत्तम उदाहरण आहेत.
2. स्त्रियांवरील अत्याचार रोखण्यात समाज म्हणून आपली भूमिका: समान हक्क हा केवळ कागदोपत्रीच दिसतो. 21साव्या शतकात सुद्धा हुंडाबळी, स्त्रीभ्रूण हत्या, हे मुद्दे आहेत.तर दुसरीकडे बलात्कार, शाळा/ऑफिस मध्ये लैंगिक शोषण, एकतर्फी प्रेमातून होणारे अपराध,अश्लील चित्रफीत बनवणे, किंवा दुसरा
कुठलाच मुद्दा नाही मिळाला तर तिच्या चारित्र्यावर असभ्य टिप्पणी करणे ह्या समस्या भेडसावत आहेत. ह्या मुद्द्यांवर शालेय मूल्य शिक्षणात योग्य ते मार्गदर्शन 8वी पासून पुढे केले पाहिजे, जेणे करून योग्य पिढी घडवण्यास मदत होईल. बलात्कार, स्त्रीभ्रूण हत्या अश्या गुन्ह्यावर त्वरित निकाल
आणि कठोर शिक्षेमुळे आळा बसेल.

आपण आपल्या घरा पासून सुरुवात करून लेकी-सुनांचा योग्य आदर करून, त्यांना पूर्ण स्वातंत्र्य देत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला पाहिजे. त्यांच्या आर्थिक स्वावलंबनाचा विचार व्हायला हवा.
3. समानतेचा दुरुपयोग: आज कायदा स्त्रियांच्या बाजूने आहे.
कायद्याचा गैरवापर काही ठिकाणी होतांना दिसतो. महिलांसाठी असणाऱ्या सहानुभूतीचा गैफायदा घेतांनाही अनेक ठिकाणी बघायला मिळते. शोषणाच्या खोट्या तक्रारी, सासरच्यांबद्दल अवास्तव अपेक्षा, त्या पूर्ण झाल्या नाहीत म्हणून त्यांच्या विरुद्ध खोटी तक्रार, भावी जोडीदारबद्दल अतिवाढीव अपेक्षा, जसं
की भरपूर पगार, स्वतःच घर,गाडी, परदेशात वास्तव्य..भरमसाठ अपेक्षा.अपेक्षापूर्ती न झाल्यास, त्यातून होणारा कलह सगळ्यांनाच त्रासदायक होतो. समानतेची ग्वाही देत हल्ली मुलींमध्ये व्यसनाचे प्रमाण वाढले आहे. मुलांची बरोबरी नको तिथे कशाला? स्त्री असो वा पुरुष, व्यसन हे पुर्णतः वाईटच, मग
ते कोणीही केले तरी!

स्त्री आणि पुरुष एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे, कोणी कमी नाही, कोणी जास्त नाही.

केवळ एक माणूस म्हणून स्त्रियांकडे बघावे, म्हणजे उणे-अधिक अपेक्षा, हीन दर्जाची दिली जाणारी वागणूक हे सगळं थांबायला मदत होईल. @iidlpgp
You can follow @AadiShakti1010.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: