#Tweet4Bharat
#राष्ट्रीय_एकात्मता ?
भाषणं ठोकायला गोंडस विषय आहे ना? पण नक्की
या नावाचं काही खरंच आहे का? "राष्ट्रीय एकात्मता दिवस". जाहीर व्हायला आणि साजरा करायला ७० वर्षे घेणाऱ्या या देशात तरी नक्कीच ही संकल्पना अस्तित्वात नाही.
२०१४ सालापासून आपण राष्ट्रीय एकात्मता दिवस साजरा करतो, #एक_भारत ही संकल्पना घेऊन कार्य करणारे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जन्मदिनी म्हणजेच ३१ ऑक्टोबरला. या महान राष्ट्राचं सार्वभौमत्व कायम राहावं म्हणून ५६० पेक्षाही जास्त संस्थानांचे विलीनीकरण त्यांनीच यशस्वी केले.
पण स्वातंत्र्यप्राप्तीनंतर या देशाची सत्ता त्या स्वातंत्र्यासाठी किंमत चुकवावी न लागलेल्या #सत्तापिपासू लोकांच्या हातात गेली, मग पुढे इथली जनता म्हणजे प्रत्येकाला जातीपातीत अडकवून फक्त आणि फक्त मतदान पदरात पाडून घेण्याचं मशीन बनून राहिली आणि या #एकात्मता शब्दाचा अर्थच आपण विसरलो.
स्वातंत्र्यानंतर संपूर्ण देशात एकीकरण होऊन संस्कृती संवर्धन आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रत्येक भारतीयाच्या मनात रोवले गेलेले #बीज आता फक्त १५ ऑगस्ट, २६ जानेवारी किंवा मग एखादा दहशतवादी हल्ला नाहीतर मग युद्धजन्य परिस्थिती असं #Occasionally उगवतं.
#आधुनिक_शिक्षण नावाचं बेगडी ओझं खांद्यावर नसताना सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध असलेल्या याच भारताच्या #अडाणी जनतेने आपली संस्कृती, चालीरीती, परंपरा, कला,संगीत,भाषा आणि साहित्य, दैनंदिन जीवन पद्धती यांचं त्याकाळात सुद्धा आदान-प्रदान केल्याचे पुरावे आजसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत.
स्वातंत्र्य मिळाल्यावर या भावना जोपासल्या पाहिजे होत्या त्यांना #भाषिक_प्रांतिक वादात अडकवून राजकीय स्वार्थ साधून घेणाऱ्या संधीसाधूंना काय म्हणायचं? जाणूनबुजून इथल्या संस्कृती, परंपरा यांचं विद्रुप विकृतीकरणं करून #पाश्चात्य_फॅड रुजवण्यामागे नक्कीचं षडयंत्र होतं हे आता दिसतंय.
एखाद्या राष्ट्रातील लोकांमध्ये देशाबद्दलचे बंधुत्व किंवा आपुलकी दर्शवते ती भावना म्हणजे #राष्ट्रीय_एकात्मता. राष्ट्राला मजबूत आणि संघटित करणारी, विविध धर्म, पंथ, जाती, पोशाख, परंपरा, आणि संस्कृतीच्या लोकांना एकाच धाग्यात एकत्र बांधून ठेवणारी भावना म्हणजे #राष्ट्रीय_एकात्मता.
ही भावना या राष्ट्रात अस्तित्वात आहे का हा खरा प्रश्न आहे. तुम्ही आणि मी दोन चार उदाहरणं देऊ शकतो मान्य, पण म्हणून एकात्मता सगळ्यांनाच कळाली असं म्हणता येईल का? कुणी तसं म्हणणं म्हणजे धाडसाचं होईल.
#राष्ट्रासाठी पुढे येणाऱ्या किती जणांना तुम्ही, मी आणि आपला समाज पाठींबा देतो?
#राइट_टू_डेथ या पुस्तकात राष्ट्राची उत्तम व्याख्या दिली आहे. त्या ‘राईट टू डेथ’ची थिअरी काय आहे, तर जगात मानवजातीनं निर्माण केलेली सर्वांत श्रेष्ठ संस्था कोणती? त्याचं एक उत्तर आहे ‘स्टेट’ नावाची. समाज विस्कळीत होता. त्याचं समाजामध्ये रूपांतर झालं -
त्याचं राष्ट्रात रूपांतर झालं.
राष्ट्राचा निर्णायक घटक कोणता असतो, तर राष्ट्र एका विशिष्ट सरहद्दीमध्ये, एका केंद्रीय राज्यसंस्थेखाली असतं. ज्याला समान परंपरा आहेत, समान भविष्याच्या आकांक्षा आहेत, दीर्घकाळाचा सहवास आहे -
#परस्परावलंबित्व त्यांच्यामध्ये निर्माण झालेलं आहे आणि त्यांना एकत्र राहण्याची इच्छा आहे, अशा एका विशिष्ट सीमेमध्ये एकाच केंद्रीय राज्यसंस्थेखाली नांदणारा समूह म्हणजे #राष्ट्र. जोपर्यंत उग्र राष्ट्रवाद आपण समाजात रुजवत नाही तोपर्यंत #एकात्मता निव्वळ कल्पना बनून राहील एवढं नक्की.
आणि #राष्ट्रवाद जाणून घ्यायचा तर घरादारावर तुळशीपत्र ठेवून सीमेवर देशसेवा करणाऱ्या सैनिकांकडून घ्यायला हवा. जात-पात, धर्म, पंथ, राज्य,भाषा, ही सगळी बंधने तोडून राष्ट्राच्या सीमेचं रक्षण करणाऱ्या सैनिकांपेक्षा जास्त कुणी राष्ट्रवादी असूच शकत नाही.
सरसकट सैनिकी प्रशिक्षण आणि ठराविक कालावधी सैन्यात देशसेवा हाच उपाय आहे #राष्ट्रीय_एकात्मता साध्य करायची असेल तर. अन्यथा #राष्ट्रसेवेचा गंध नसलेले टिंपाट बुद्धिजीवी AC मध्ये बसून देशप्रेमाचे उलटे धडे गिरवून राष्ट्रात फूट पाडत राहतील आणि तुम्ही,मी भाषिक-प्रांतिक वादातचं अडकून राहू.
#जय_हिंद https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="🇮🇳" title="Flagge von Indien" aria-label="Emoji: Flagge von Indien">https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="🇮🇳" title="Flagge von Indien" aria-label="Emoji: Flagge von Indien">https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="🇮🇳" title="Flagge von Indien" aria-label="Emoji: Flagge von Indien">

फोटो : गुगलवरून साभार https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="🙏" title="Folded hands" aria-label="Emoji: Folded hands">
राइट टू डेथ या पुस्तकावर हिटलर सुद्धा प्रभावित झाला होता अशी नोंद आहे.
You can follow @RajeGhatge_M.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: