#Thread
विषय: राष्ट्रीय एकात्मता

भारतासारख्या विविधता पूर्ण देशात आपण राहत आहोत हेच एक उत्तम उदाहरण आहे राष्ट्रीय एकात्मतेचे,परंतु काही घटक आहेत ज्या मुळे अनेक वेळेला या एकात्मतेला धक्का बसतो त्या पैकी एक म्हणजे प्रांतवाद आणि भाषावाद..पण यावर उपाय तो काय?

#Tweet4Bharat

(1/15)
भटकंती आवडते म्हणून आजवर अनेक जागांवर गेलो आहे,अनेक राज्यात गेलो,तिथले पदार्थ खाल्ले आहेत,तिथल्या लोकांसोबत गप्पा मारल्या आहेत,अनेकांच्या घरात जाऊन राहिलो आहे,अनोळखी माणसांसोबत चहा पिला आहे,
भाषा समजत नसली तरी एक आपुलकीची नाळ कायम जुळली गेली आहे ! पण याला एक मूलभूत कारण आहे.
(2)
मी ज्या भागात जातो त्या भागाचा होण्याचा प्रयत्न करतो ! उदा:बंगाल मध्ये जाऊन मी मराठीत बोललो तर तिथली व्यक्ती माझ्याशी बोलेलच असे नाही परंतु मी मोडक्या बंगालीत त्याच्याशी बोलून नंतर हिंदी/इंग्रजी मध्ये बोलू लागलो तर कदाचित तो व्यक्ती माझ्याशी बोलेल!
(3/15)
गावाकडे जाऊन मी शहरातल्या सवाई जर कायम ठेवल्या तर मी गावातल्या लोकांसाठी कायमचाच शहरातून आलेला असेन आणि कदाचित जे प्रश्न मला फक्त गावाच्या लोकांकडून मिळू शकतात ते न निर्माण झालेल्या आपुलकी मुळे मिळणार नाहीत,कारण मी त्या गावकऱ्यांशी connect झालेलो नसेन !
(4/15)
सांगण्याचा उद्देश काय ? तुम्ही ज्या भागात जाल तिथली संस्कृती,इतिहास,खाद्यसंस्कृती,भूगोल जाणून घेतलात तर तुम्हाला तिथले लोक आपले म्हणतील आणि तुम्ही राष्ट्र एक करण्यासाठी हातभार द्याल !

याच संदर्भात एक अनुभव सांगतो .......

(5/15)
एक दोन वर्षांपूर्वी हंपीला गेलो होतो आणि तिथल्या रिक्षा वाल्याला मराठी येत नव्हती आणि मला कानडी येत नव्हती मग करायचं काय ? मला जे चार शब्द येत, होते त्याचा मी वापर केला ,"कन्नड, निमदंर्हयेसनयेनु" म्हणजे मला कानडी येत नाही
(6/15)
आता यातल्या फक्त "निमदंर्हयेसनयेनु" या शब्दाचा अर्थ माहित होता तो म्हणजे " येत नाही"
या एका शब्दामुळे,तो रिक्षा वाला हसला आणि तो मला ठिकठिकाणी घेऊन गेला,कश्याचा आधारावर ? GOOGLE फोटोज च्या आधारावर !
(7/15)
दिवसभर त्याच्या रिक्षात हिंडल्यावर बसून,दोन अनोळखी माणसे,ज्यांना एकमेकांची भाषा देखील येत नव्हती त्यांनी एका ठिकाणी इडली खाल्ली आणि तो माझ्याकडून चार शब्द शिकला आणि मी त्याच्या कडून चार शब्द शिकलो....
इथे काही क्षणात भाषावाद संपुष्टात आला आणि प्रांतवाद सुद्धा !
(8/15)
कर्नाटक महाराष्ट्रात कन्नड मराठी जो वाद आहे तो आम्ही विसरून गेलो,त्याने मला कन्नड येत नाही म्हणून हिणवले नाही,त्याला मराठी येत नाही म्हणून मी त्याच्यात रिक्षात बसलो नाही असे झाले नाही कारण दोघांनाही एकमेकांची गरज होती आणि आणि हीच गोष्ट आपल्याला राष्ट्रनिर्मितीसाठी गरजेची आहे
(9)
तसेच आपण सुद्धा एखाद्या व्यक्तीला आपली भाषा येत नसेल तर त्या व्यक्तीला हिणवण्या पेक्षा त्याला प्रेमाने आपण चार गोष्टी शिकवल्या तर आपल्याला सुद्धा त्या व्यक्तीकडून नवीन गोष्टी शिकायला मिळतीलच !
(10/15)
भारतात किती भाषा आहेत,किती प्रांत आहे,किती परंपरा आहेत आणि आपण आपल्या गोष्टीवर कायम अडून राहिलो तर आपण अनेक गोष्टी शिकण्यापासून मुकू शकतो !
स्वतःच्या प्रांताचा आणि भाषेचा अभिमान अवश्य बाळगा,परंतु त्या अभिमानाचे रूपांतर गर्वात होऊ देऊ नका,
(11/15)
तसे झाले तर हि राष्ट्रनिर्मितीला एक मोठी हानिकारक गोष्ट ठरू शकते......चाणक्य सुद्धा असेच म्हणाले होते कि "आपण जर आपापसात अश्या क्षुल्लक गोष्टींवरून भांडत राहिलो तर आपल्याला नष्ट करायला बाहेरील ताकदीची गरज नाही ! आपण स्वतःमुळे नष्ट होऊ शकतो !"
(12/15)
राष्ट्रीय एकात्मता हि चालू होते स्वतःपासून आणि आपण ज्यांना आपला आदर्श मानतो अश्या व्यक्तींपासून,आज माझे देशातल्या कान्याकोपऱ्यात मित्र आहेत आणि मला एक माहिती आहे कि मी जिथे जाईन तिथले लोक मला आपले वाटतील कारण मी तिथली संस्कृती आत्मसाद करू पाहीन !
(13/15)
आणि शेवटी कितीही प्रांतवाद आणि भाषावाद म्हणालोच तरी हॉटेल मध्ये गेल्यावर पंजाबी भाजी खायला आणि नाचताना पंजाबी गाणी ऐकायला आपल्याला आवडतातच ना ? आपण सगळे भारतीय आहोत हे फक्त बोलताना वापरण्या ऐवजी आपण आचरणात आणले तर कदाचित राष्ट्रीय एकात्मते मध्ये त्याचा फायदा शकतो !
जय हिंद!
(14)
You can follow @malhar_pandey.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: