शिवा.. बाळा.. इतके दिवस फक्त बघत होते.. तुझा पोरकटपणा सगळे पाहत दुर्लक्ष करतात याचा अर्थ असा होत नाही की वाट्टेल ते, तोंडाला येईल ते लिहित जावे.. असो.. सर्वात कीव तर त्या लोकांची येते जे पुरोगाम्यांच्या नावाखाली हा असला नीच प्रकार करत आहेत व https://twitter.com/ShivajiSSRG/status/1289551868423573504
ह्या थ्रेड मधील मुद्दे ज्यांना पटत आहेत ते तर महानच विद्वान म्हणायला हवेत..आता ह्या थ्रेड बद्दल बोलूया..
पहिला मुद्दा कलाम हे डरपोक व स्वार्थी.. त्यांनी दंगली बद्दल चकार शब्द काढले नाहीत म्हणून ते डरपोक?
ते जर बोलले असते तर ह्या बुभुक्षित राजकारण्यांनी त्यांना सुखाने जगू तरी दिले असते का? कलाम हे शास्त्रज्ञ होते.. सेलिब्रिटी किंवा पुढारी नव्हते.. त्यांनी त्यांची मते नोंदवायलाच हवीत याची काहीच जरूरी नाही..
बाकी त्यांच्या पुस्तकाच्या बाबत बोलायचं झालं तर ज्याने ती वाचली असतील तर त्यांनाच कळेल ते..
राष्ट्रपती जरी झाले तरी राष्ट्रपती चं काम टीकाटिप्पणी करणं कधीच नसतं! कारण दंगे हे कायम पक्षाच्या अजेंडा प्रेरित असतात
राष्ट्रपती ला न्यूट्रल राहावं लागतं
त्यामुळे केव्हाही पाहा,
कोणताही राष्ट्रपती राजकीय गोष्टींमध्ये हस्तक्षेप करत नाही.. किंवा आपली मते देत नाही.. अगदीच नाईलाज म्हणून अंतिम निर्णय घेण्याचा हक्क राष्ट्रपतीला असतो तो ही निष्पक्ष पणे घ्यावा लागतो..पण मुख्य निर्णयांचे काम पंतप्रधान कॅबिनेटकडूनच घेतले जातात..
अटर नाॅनसेन्स आहे तो थ्रेड.. कलाम स्वप्नाळू होते?? हो,होते..ती धमक त्यांच्यात होती स्वप्नं पुर्ण करायची.. त्या काळी सरकारची जी प्रगती चालू होती त्यानुसार भारत महासत्ता होणे अवघड नव्हते पण घात झाला व मोदी आला..
संपूर्ण अजेंडा विकासाकडून, धर्म, दंगे, दंगली इकडे शिफ्ट झाला.. फॅसिझम पुन्हा उफाळून आले.. कलामांनी लाखो तरुणांना स्वप्ने बघायची व ती सत्यात उतरवायची ताकद दिली आहे.. त्यांचे स्पीच व पुस्तके वाचणारा असलं काही बरळणार नाही.. त्यांच्या कारकिर्दीत इस्रो व डीआरडीओ ला जेवढं फंडिंग
मिळालं आहे तेवढं खचितच कोणाच्या काळात मिळालं असेल.. हा फालतूपणा धर्माच्या नावाखाली करू नये एवढंच मत आहे माझं!
बाकी मदर तेरेसा, विवेकानंद यांच्याबाबत जी वक्तव्ये केली आहेत ती एखादा मुर्ख माणूसच करू शकेल असे माझे ठाम मत आहे..
माझा सरळ प्रश्न आहे..
१) मदर तेरेसा यांच्या किती मिशनरीज ला भेट दिली आहे? किती कार्य जवळून पाहिलं आहे? किती पुस्तके वाचली आहेत?
हे सगळं केलं असतं तर हे उपटसुंभे विचार डोक्यात आले नसते!
२) स्वामी विवेकानंद यांनी लिहून ठेवलेले खंड व वाड्मय एकदा संपूर्णपणे वाचले
तर हे असली भंकसगिरी करावी लागणार नाही..
बाकी एका मुद्द्याशी सहमत की कोणताही माणूस परिपूर्ण नसतो.. म्हणून सर्व गोष्टींना एकाच उद्दीष्टाने पाहता येत नाही व एकाच राजकीय कोनातून पाहणे योग्य नाही..
You can follow @surgeon_sheel07.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: