देशात आजही अनेकांना दलित आरक्षण संपावे असे वाटते. पण देशात दलितांची परिस्थिती कोणी जाणून घेत नाही. त्यांच्यावर होणारे अन्याय आजही थांबलेले नाहीयेत. उच्च जातीकडून दलितांवर होत असलेले अन्याय आणि त्यांची परिस्थीती आपण पाहू शकता..https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="👇" title="Rückhand Zeigefinger nach unten" aria-label="Emoji: Rückhand Zeigefinger nach unten">
National Family Health Survey Data अनुसार दलित महिलांचे सरासरी मृत्यू वय ३९.५ वर्ष इतके आहे. तर उच्च जातीतील महिलांचे हेच वय ५४.१ वर्ष इतके आहे. जवळ जवळ १४ वर्षाचा फरक आहे.
रस्ता, गटारी, Manholes, संडास वगैरे साफ करणाऱ्या एकूण सरकारी कर्मचाऱ्यांपैकी ९०% कर्मचारी आजही दलितच आहेत.
National Crime Records Bureau अनुसार प्रत्येक ६ व्या मिनिटाला दलितांवर उच्च जातीकडून अत्याचार केला जातो आहे, एका आठवड्याला ४ पेक्षा अधिक महिलांचे बलात्कार उच्च जातीकडून होतात, त्याचबरोबर एका आठवड्यात १३ दलितांचा खून आणि ६ दलितांचे अपहरण उच्च जातीकडून केले जात आहेत.
वरील सर्व आकडे २०१४ पर्यंतचे आहेत. २०१४ नंतर या गुन्ह्यांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. बलात्काराचे प्रमाण दिवसाला ४ महिला इथपर्यंत पोहचले आहे.
आजही अनेक राज्यांमध्ये दलितांना समान वागणूक दिली जात नाही. अजूनही दलितांना अस्पृश्य समजले जाते. उत्तरप्रदेश सारख्या राज्यात दलितांवर होणारे अन्याय २०१४ चा तुलनेत ४७ टक्क्यांनी वाढले आहेत. त्याखालोखाल गुजरात २६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर महाराष्ट्रात ११ टक्क्यांनी.
वर दिलेले आकडे थक्क करणारे आहेत. उच्च जातीचे वर्चस्व आणि दलितांचे शोषण आजही अनेक घटनेवरून दिसून येत आहे. खैरलांजी सारखी उदाहरणे आजही आपल्यासमोर जिवंत आहेत. सरकार कोणतेही असो त्यांना दलितांची उन्नती व्हावी असे कधीच वाटले नाही आणि त्यासाठी प्रयत्नही केलेले दिसत नाहीत.
सर्व दलितांना त्यांचा आरक्षणाचा हक्क मिळावा, त्यांची उन्नती व्हावी आणि त्यांच्यावर होणारे अन्याय पूर्णपणे थांबावेत इतकीच अपेक्षा...https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="🙏" title="Folded hands" aria-label="Emoji: Folded hands">
#दलितों_पर_राजनीति_नही_चलेगी

https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="👆" title="Rückhand Zeigefinger nach oben" aria-label="Emoji: Rückhand Zeigefinger nach oben"> हा ट्रेंड पहिला आणि Arundhti Roy यांनी दिलेले 2014 पर्यंतचे आकडे आणि आताच्या सरकारची सत्यस्थिती समजावी यासाठी हा थ्रेड...https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="👍" title="Thumbs up" aria-label="Emoji: Thumbs up">
You can follow @SahilVastad.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: