#Thread
Timeline of #Kargil War

आपल्या देशात अनेक युद्ध घडली पण कारगिल युद्ध हे सर्वात जास्त चर्चेत असलेलं युद्ध असेल असं मला वाटतं,
#२६जुलै ला आपण कारगिल चे युद्ध जिंकलो परंतु ते
कसं झालं,काय प्रसंग घडले या बद्दल संक्षिप्त रूपात माहिती देणारा हा थ्रेड:

(1/19)
ऑपेरेशन बद्र नावाचे एक ऑपरेशन पाकिस्तान्यांनी ठरवले होते,आणि १९९९ च्या एप्रिल मध्ये ह्या ऑपरेशन ला सुरवात झाली. या ऑपरेशन चा मुख्य उद्देश हा होता कि सियाचीन ग्लेशियर वर पूर्णपणे पाकिस्तान चा कब्जा व्हावा आणि काश्मीर चा मुद्दा पुन्हा जागतीक पातळीवर पेटावा....तर प्रसंग असे घडले..
३ मे १९९९ :
पाकिस्तानी सैन्य कारगिल मध्ये घुसले आहे आणि ते दिसून आले आहेत असं स्थानिक मेंढपाळांनी भारतीय सैन्याच्या अधिकाऱ्यांना सांगितलं.

५ मे
सांगितलेली गोष्ट खरी आहे का नाही हे पाहण्यासाठी ५ सैनिक त्या भागात पाठवले गेले,दुर्दैवाने त्यांना पकडण्यात आलं आणि त्यांना मारलं गेलं
९ मे १९९९:
पाकिस्तानी सैन्याकडून मोठ्या प्रमाणात गोळीबार झाला आणि भारतीय सैन्याचा दारुगोळ्याची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले
१० मे १९९९:
पाकिस्तानी सैनिक जिहादच्या वेशात,द्रास,कस्कर आणि मुशकोह या भागा पर्यंत आले.
याच दिवशी भारतीय सैन्यांनी,काश्मीर मध्ये तैनात असलेल्या तुकड्याने कारगिल ला तैनात होण्याचे आदेश दिले.
२६ मे १९९९:
भारतीय हवाई दलाने (IAF ) ने शत्रूवर हल्ला केला

२७ मे १९९९:
भारतीय हवाई दलाचे दोन विमाने मिग-२१ आणि मिग-२७ (पाकिस्तानी सैन्याने पाडली) आणि FL.लेफ्टनंड. नचिकेता याना युद्ध कैदी म्हणून पकडण्यात आले.
२८ मे १९९९ :
भारतीय हवाई दलाचे मिग-१७ हे विमान पाकिस्तान्यांनी पाडले आणि ४ वैमानिक हल्ल्यात मारले गेले.

१ जून १९९९:
राष्ट्रीय महामार्ग नं.१ पाकिस्तान्यांनी बॉम्बस्फोट करून उध्वस्त केला.
६ जून १९९९:
भारतीय सैन्य आता पूर्ण तयारीनिशी आणि बेभान होऊन पाकिस्तानी सैन्यावर हल्ला करू लागले आणि हा रुद्रावतार पाहून पाकिस्तानी जरा थबकले.

९ जून १९९९:
बटालिक मधील दोन मुख्य ठिकाणं जी पाकिस्त्यानी काबीज केली होती ती पुन्हा भारतीय सैनिकांनी जिंकून घेतली.
११ जून:
नवाझ शरीफ जो आव आणत होते कि ह्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानी सैन्य शामिल नाही त्यावर खुलासा झाला,भारतीय सैन्याच्या हाती काही ठोस पुरावे मिळाले ज्यात नवाझ शरीफ आणि परवेझ मुशरफ यांना ह्या युद्धाची कल्पना होती आणि त्यांनीच पाकिस्तानी सैनिक जिहादी म्हणून जा असे सांगितले असे कळले
जून १३ १९९९:
भारतीय सैन्याने तोलोलिंग नावाचे एक महत्वाचे शिखर पुन्हा काबीज करून भारतात दाखल केले.

जून १५ १९९९ :
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी नवाझ यांना कारगिल मधून पाकिस्तानी सैन्य मागे घ्या अशी विनंती केली जी पाकिस्तानने धुडकावून लावली.
जून २९ १९९९ :
विक्रम बात्रा यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्याने पॉईंट ५१०० आणि ५१६० पुन्हा काबीज केला आणि हि विक्रम बात्रा यांची पहिली मोहीम होती ज्यात ते यशस्वी होऊन परत आल्यावर म्हणाले "ये दिल मांगे more "
जुलै २ १९९९ :
भारतीय सैन्याने कारगिल मध्ये सगळ्या दिशेने पाकिस्तान्यांवर हल्ला चालू केला.

जुलै ४ १९९९:
११ तासाचा युद्ध नंतर आपल्या सैन्याने टायगर हिल काबीज केली.
जुलै ५ :
द्रास भागावर भारताने पुन्हा कब्जा केला आणि शरीफ ने आता माघार घ्यायला सुरवात केली,या नंतर लगेच तो बिल क्लिंटन यांच्यासोबत बैठकीसाठी म्हणून गेला.
जुलै ७ :
जुबेर हिल भारताने काबीज केले, या दिवशी कॅप्टन अनुज नैय्यर आणि कॅप्टन विक्रम बत्रा यांना वीरमरण आले,
कॅप्टन बत्रा यांच्या अदम्य साहसाची त्यांना शेर शहा ऑफ कारगिल असे म्हणले जात आणि येत्या काळात या दोघांना परम वीर चक्र जाहीर केले गेले.
जुलै ११:
पाकिस्तान आता मागे सरकू लागले आणि भारतीय सैन्य बटालिक मधील मुख्य शिखरे भारतात दाखल करू लागले.

जुलै १४:
अटल बिहार वाजपेयी भारताचे तत्कालीन पंतप्रधान यांनी ऑपेरेशन विजय यशस्वी झाले आहे असे घोषित केले.
जुलै २६:
"आम्ही हरलो आणि तुम्ही जिंकला" असे अधिकृत रित्या पाकिस्तानने मान्य केले आणि आपण कारगिल युद्ध जिंकलो !!!!!!!
कारगिल युद्ध हि एक अशी कहाणी आहे जी आजही ऐकताना अंगावर रोमांच येतात,श्वास फुलतात,पुढे काय झालं असेल हे वाचण्याची इच्छा निर्माण होते.
पण हे युद्ध जिंकण्याकरिता अनेक अनेक सैनिकांना वीरगती प्राप्त करावी लागली,अनेक जण भारत मातेच्या कुशीत कायमस्वरूपीसाठी विश्रांतीसाठी म्हणून निघून गेले.
उद्या २६ जुलै,उद्याच्या दिवशी या सगळ्या सैनिकांना मानवंदना म्हणून घरात दिवा लावा आणि त्यांच्या स्मृतीस धन्यवाद करा कि आज आपण जे आहोत ते त्यांच्या मुळे आहोत.

उद्या कारगिल युद्धाचा परिणाम काय झालं या विषयावर थ्रेड ! जय हिंद ! भारत माता कि जय !
#KargilVijayDiwas2020
You can follow @malhar_pandey.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: