"जो गती ग्राह गजेंद्र की, गत भई जान हूं आज। बाजी जान बुंदेल की, बाजी राखो लाज।"

हा संदेश पेशवे बाजीराव ह्यांना मिळाला, आणि भरल्या ताटावरून उठून "जर पोचायला उशीर झाला, तर इतिहास म्हणेल की तिथे हिंदू राजा अडचणीत होता, आणि दुसरा हिंदू भोजन करत होता" असं म्हणत सैन्याला सज्ज होण्यास
आज्ञा दिली.

बुंदेलखंड हा समृद्ध प्रदेश. 80 वर्षाचे महाराज छत्रसाल बुंदेलांनी 50+ वर्षे मुघलांना युद्धात पाणी पाजलं. बुंदेलांचा बंदोबस्त करण्यासाठी महंमदशाह ने महम्मदखान बंगश (मूळ अफगाणी) ला आक्रमणास पाठवले. सागरा इतके विशाल सैन्य घेऊन बंगश ने बुंदेलखंडावर आक्रमण केले.
2 वर्षे त्यांची झटापट चालू होती, शेवटी छत्रसाल महाराजांना एकच आशेचा किरण दिसला, तो म्हणजे छत्रपतीे शिवाजी महाराजांचे स्वराज वाढीस नेणाऱ्या, मराठा साम्राज्याचा विस्तार करणाऱ्या, आणि विलक्षण रणनीती धुरंधर पेशवे बाजीराव बल्लाळ भट्ट..
देवगड ते बांदा आणि पुढे बुंदेलखंड हे अंतर 1400km
हे अंतर वायुवेगाने कापत पेशवे आपल्यावर चाल करून येतील हे बंगश ला स्वप्नांत पण वाटलं नव्हतं.
25000 घोडदळ, पायदळ घेऊन बाजीरावांनी 30 मार्च 1729 ला बंगशला जैतपूर येथे गाठले. बंगशशी सामना करून त्याला असा चोप दिला की त्याने पळून किल्ल्याचा आश्रय घेतला.
जैतपुरच्या किल्ल्यावरून बंगश खाली मोगलांच्या सैन्याची मराठ्यांनी उडविलेली दाणादाण बघत होता. त्यात त्याला घोड्यावर बसलेले बाजीराव दिसले.. त्यांचा आवेश, ती तळपती तलवार, तो तलवारबाजीचा विद्युतवेग.. हे बघून बंगश थक्क झाला, "बम्मन होकर भी क्या शमशेर चलाता है!" असं बोलून गेला.
जैतपुर किल्ल्यात रसद नव्हती. त्यात मराठ्यांनी किल्ल्याला वेढा दिला. मल्हारराव होळकर, पिलाजी जाधव, दावलजी, हे बंगशला कुठलीही रसद मिळू नये ही खबरदारी घेत होते. बंगशचा मुलगा काईमखान हा 30000 चे सैन्य घेऊन चालून आला, मराठ्यांनी त्याचाही पराभव केला.
पावसाळा जवळ होता म्हणून छत्रसालने बंगशला 'परत बुंदेलखंडात पाऊल ठेवणार नाही' ही कबुली घेऊन सोडून दिले.

बंगशला बाजीरावांची जरब बसली. बाजीरावांबद्दल भीतीयुक्त आदर त्याला वाटू लागला होता. त्यामुळे पुढे जेव्हा बाजीरावांची आई राधाबाईंना तीर्थ यात्रा करायची होती,
तेव्हा बंगश ने बाजीरावांच्या सांगण्यावरून राधाबाईंना त्यांच्या तीर्थ यात्रेत संरक्षण दिले.

बाजीराव एका हिंदूराजाच्या हाकेला केवळ धावुनच गेले नाही तर त्यांनी पुरता बिमोड केला बंगशचा.
अश्या ह्या अजिंक्य योद्धयाला योग्य तो न्याय कधीच मिळाला नाही ..

PC: अजिंक्य योद्धा
कधी त्यांना मस्तानीमध्ये तर कधी त्यांच्या जाती मध्ये अडकवून ठेवले गेले आणि हेच हिंदूंच दुर्भाग्य. जातीत अडकुन पडतो आपण.

ही केवळ एक मोहीम.. अश्या असंख्य मोहीम .. प्रत्येक वेळी अजिंक्य.. अफाट नेतृत्वशक्ति, अद्भुत रणकौशल्य, अजेय योद्धा .. लक्ष एकच.. मराठा साम्राज्य विस्तार ..
You can follow @AadiShakti1010.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: