#Thread #ShivajiMaharaj
"सक्खर" Sukkur हे पाकिस्तान मधील प्रमुख व मोठ्या शहरांपैकी असलेले एक शहर, जे सिंध प्रांतात वसलेले आहे. पाकिस्तानमधील सर्वात मोठ्या असलेल्या शहरांमध्ये या शहराचा समावेश तिसऱ्या क्रमांकात होतो.
पहिल्या दोन क्रमांकात "लाहोर" व "हैदराबाद" ही शहरे येतात.
(१/७)
त्याच बरोबर सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये याचा ७वा क्रमांक लागतो. सध्या हे शहर शैक्षणिक दृष्ट्या प्रसिद्ध असून या ठिकाणी नावाजलेली विद्यापीठे ही आहेत. खाली दिसणारे चित्र हे स्वातंत्र्यपूर्व काळातील "सक्खर" शहरात असलेल्या एका बड्या व्यापाराच्या माल पावतीचे आहे.
(२/७)
सदरहु व्यापाराचे नाव लाला जातूराम वाधूराम असे लिहिण्यात आले आहे.जे इंग्रजी,हिंदी व उर्दू या तिन्ही भाषांमध्ये लिहिण्यात आले आहे. या पावती च्या एका बाजूस "छत्रपती शिवाजी महाराज" यांची प्रतिमा असून या प्रतिमेच्या खाली इंग्रजी भाषेमध्ये व्यापारासंबंधी चे नियमावली छापलेली आहे.
(३/७)
पावतीवर तारखेचा उल्लेख नाही, परंतु या व्यापाऱ्यांनी हा व्यवहार राजस्थानमधील चुरू या गावात केलेला आहे हे यावरील लिखणावरून दिसून येते.स्वातंत्र्यपूर्व काळात सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा महिमा संपूर्ण हिंदुस्थानभर होता,
(४/७)
आजही आपणास तत्कालीन विविध दस्त,महत्वाची कागदपत्रे काड्यापेट्या, पोस्टकार्ड यांच्यावर महाराजांची असलेली सुंदर प्रतिमा पहावयास मिळतात. यावरून लोकांचे त्यांच्यावर असणारे प्रेम दिसून येते. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर दुर्दैवाने
(५/७)
व्यापारी दृष्ट्या महत्त्वाच असणारे हे "सक्खर, सिंध" शहर पाकिस्तान मध्ये गेले. या शहरातील तत्कालीन व्यापाऱ्यांने शिवरायांच्या प्रेमापोटी म्हणा किंवा भक्ती पोटी..
(६/७)
त्यांच्या व्यापारातील पावती च्या दर्शनी भागात नक्षीदार युक्त चौकटीत महाराजांची प्रतिमा अतिशय सुंदर रित्या व मोठ्या जागेत छापलेली आहे.
II जय शिवराय II
संग्राहक: श्री.अभिजीत अ. धोत्रे , पुणे
End
You can follow @SjAmruta.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: