मित्रांनो मी"एक शरद व सगळे गारद"..ही तथाकथित ऐतिहासिक खळबळ माजवली जाणारी मुलाखत पूर्ण पहिली आहे.
मी या मुलाखतीचे विश्लेषण किंवा पोस्ट मॉर्टन करणार आहे तेंव्हा ते जरूर वाचा..तसे या मुलाखती मधून काही खळबळ निर्माण होईल असे मुद्दे आहेत पण यावर कुठेही चर्चा केली जात नाही..१/
मुलाखतीच्या सुरवातीला पवारांची ओळख करून देताना संजय राऊत बोलले की पवार साहेब हे ५० वर्षापेक्षा जास्त काळ सक्रिय व अजिंक्य आहेत तसेच ते राजकारणातील भीष्म पितामह आहेत.शरद पवारांना अजिंक्य बोलणे हे हास्यास्पद आहे.१९८०,१९८५ विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव तसेच १९९५ ला स्वतः ..२/
मुख्यमंत्री पदी असताना पराभव होऊन पदावरून पायउतार व्हावे लागले होते.तसेच २०१४ लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाचे पानिपत झाले होते याचा विसर राऊत यांना पडला आहे.त्याचबरोबर राऊत यांनी पवारांची तुलना भीष्म पितामह यांच्याशी केली तरी ते पवारांनी कसे ऐकून घेतले याचे..३/
आश्चर्य वाटते कारण मागच्याच वर्षी पवार बोलले होते की देशाला रामायण, महाभारत गरज नाही मग त्याच महाभारतातील महान व्यक्तिमत्त्व असणाऱ्या भीष्म पितामह यांच्याशी केलेली तुलना कशी काय चालते?.सामना या शिवसेना च्याच वृत्तपत्र साठी मुलाखत देणारे पवार हे ठाकरे घराणे सोडून पाहिले ..४/
व्यक्ती आहेत."शरद पवार जरी मित्र असला तरी नीच प्रवृत्ती आहे" हे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे वक्तव्य आहे याचा विसर राऊत आणि शिवसेनेला पडला आहे. ज्या पवारांना बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पासून दूर ठेवले त्याच पवारांची मुलाखत त्यांचाच मुखपत्र घेतो आहे. किती मोठा विरोधाभास?.५/
पवारांनी सांगितले की लॉकडाउन मध्ये गीत रामायण ऐकले व ते मला आवडते असे बोलले.या माणसाने कधीही राम मंदिर साठी समर्थन दिले नाही,तसेच रामायण महाभारत ची देशाला गरज नाही असे बोलणारे गीत रामायण ऐकत आहेत.अवघड आहे.पुढे पवार बोलले की राज्यसरकार ने कठोर लॉक डाऊन केलं होत. हसू का रडू?..६/
उध्दव ठाकरे उशिरा,हळू हळू पण सावध निर्णय घेतात- पवार. अहो पवार साहेब या हळू हळू आणि सावध निर्णय घेण्याच्या नादात राज्याची पूर्ण वाट लावली आहे याचे भान ठेवा जरा.
पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली की मी पुन्हा येईन हा चेष्टेचा विषय,जनतेला गृहीत धरू नये,यांना धडा ..७/
शिकवला पाहिजे असा जनतेच्या मनात विचार होता.पवार साहेब जर जनतेला फडणवीस यांना धडा शिकवायचा होता तर त्यांच्याच नेतृत्वाखाली विधानसभा निवडणूक लढवली होती हे विसरला वाटतं?.निवडणुकीत युतीचा विजय झाला होता आणि तुमचा पराभव झाला होता.तसेच तुमच्या पक्षाचे जितके आमदार नाहीत त्याच्या ..८/
दुप्पट आमदार निवडून आले आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी चे आमदार एकत्र केले तरी बरोबरी होऊ शकत नाही हे लक्षात असूद्या.पुढे शरद पवार खूप छान बोलले"या देशातील सामान्य माणूस लोकशाहीच्या बाबतीत राजकारणातील लोकांपेक्षा शहाणा आहे,लोक राजकारण्यांना धडा शिकवतात".या शरद पवारांच्या मताशी.९/
मी पूर्णपणे सहमत आहे.लोक हुशार आहेत म्हणून तर लोकांनी लोकसभा निवडणुकीत मोदींना आणि विधान सभा निवडणुकीत फडणवीस यांना मतदान केले होते.पण तरीही या जनमताचा अपमान करण्याचे काम महा विकास आघाडी बनवून तुम्ही केलं आहे.तुम्ही बोलला त्याप्रमाणे जनता हुशार आहे आणि पुढच्या निवडणुकीत ..१०/
तुम्हाला नक्की धडा शिकवेल.पुढे शरद पवारांनी एक हास्यासपद विधान केलं आहे ते ऐकून मला विश्वास बसेना की या माणसाने ५० वर्षे राजकारण केलं आहे.पवार बोलले की भाजपा च्या १०५ जागा निवडून आल्या आहेत त्यात शिवसेना चे खूप मोठे योगदान आहे,शिवसेना नसती तर ४०-५० जागा निवडून आल्या असत्या..११/
माझ्या मते पवारांनी हे विधान जाणून बुजून केलं आहे व त्याचे असे बोलण्या मागचा उद्देश शिवसेना ला हरभरा च्या झाडावर चढवण्याचा आहे जेणेकरून शिवसेनेने अजून भाजप वर आक्रमक व्हावे.पवारांना २०१४ ची निवडणूक आठवत नाहीये तेंव्हा सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते भाजपा च्या १२० जागा निवडून. १२/
आल्या होत्या.तेंव्हा शिवसेना च्या ६३ जागा निवडून आल्या होत्या म्हणजे भाजपा च्या जागा शिवसेना च्या दुप्पट आहेत.२०१९ च्या निवडणुकीत पण भाजपाच्या जागा शिवसेना पेक्षा दुप्पट आहेत. असे असताना पवार कशाच्या आधारावर बोलत आहेत की १०५ मध्ये शिवसेनेचे योगदान खूप मोठे आहे..१३/
बाळासाहेब यांची विचारधारा,कामाची पद्धत भाजपा शी सुसंगत होती असे मला कधी वाटले नाहीं - असे पवार बोलले. पवारांच्या म्हणण्यानुसार ज्या दोन पक्षांची युती जवळ जवळ ३०वर्षे होती त्यांची विचार सुसंगत नव्हती. पुढे पवारांनी जाहीर केलं की राज्याचे सरकार सहा महिन्यांच्या परीक्षेत पास..१४
झाले आहे आणि पुढची परीक्षा पण सहज पास होणार आहे.पण सत्य परिस्थिती ही आहे की हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे.या सरकार कडून कर्जमाफी चे दिलेलं आश्वासन पूर्ण करता आले नाही, सहा महिन्यात जवळ जवळ २००० शेतकरी आत्महत्या झाल्या, कोरोना मुळे १०००० पेक्षा जास्त मृत्य झाले आहेत ..१५/
कोकण किनारपट्टी भागातील वादळामुळे लोकांचे जे प्रचंड नुकसान झाले आहे त्यांना अजून मदत मिळाली नाहीये. या सर्व भोंगळ कारभाराला जर पवार सरकार परीक्षेत पास झाले असे बोलत असतील तर हा जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. आता यानंतर पवार जे काही बोलले ते जरा महविकास आघाडीच्या..१६/
कार्यकर्त्यांनी नीट कान देऊन ऐकावे. पवार बोलले की "मला मोदींचे गुरु असे म्हणून त्यांना पण अडचणीत आणू नका आणि मला पण अडचणी त आणि नका" तसेच राजकारणात कुणी कुणाचा गुरू नसतो. देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी देशाला मनमोहन सिंग यांची गरज आहे.हा बरोबर आहे म्हणजे घोटाळे करायला ..१७/
मोकळे रान हवे आहे.पाकिस्तान पेक्षा चीन देशासमोर असणारे मोठे संकट आहे असे मत व्यक्त केले.पण आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आज पाकिस्तान आपल्या सर्वांना दुबळा वाटतो आहे कारण मागच्या सहा वर्षात भारत मजबूत झाला आहे.नाहीतर पाकिस्तान भारतात कायम दहशत वादी हल्ले घडवून आणत होता.१८/
प्रियांका गांधी च्या घराच्या बाबतीत विचारल्या प्रश्नाचे उत्तर देताना पवार बोलले की सत्तेचा गैरवापर होतो आहे आणि हे शुद्रपणाचे राजकारण आहे. पवारांनी केलेली टीका ठीक आहे पण पवारांनी शब्द वापरला आहे शुद्रपणा चे राजकारण म्हणजे यातून पवारांना काय बोलायचे आहे?...१९/
इथे पवारांनी शुद्रपणा हा शब्द खालच्या पातळीचे राजकारण यासाठी वापरला आहे.पवार स्वतःला पुरोगामी समजतात ना?.मग त्यांना कुणी सांगितले की शुद्रापणा म्हणजे खालच्या पातळीचे?.पवारांनी इथे चुकीचा शब्द वापरला आहे यावर कुणीच काही बोलत का नाही?. शूद्र पणा म्हणजे खालच्या पातळीचे असते..२०/
या पवारांच्या विचारसरणी चा निषेद करतो आहे.पवारांनी या मुलाखती मध्ये संजय राऊत यांना सांगितले की"माझी खात्री आहे की हे सरकार पाच वर्षे काम करेल,ऑपरेशन कमल चा काही परिणाम होणार नाही". आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा जेंव्हा पवार कोणत्यातरी गोष्टीची खात्री देतात याचा अर्थ असतो की.२१/
याची चुकूनही खात्री नाही.मुळात पहिली गोष्ट ही आहे पवारांना किंवा महा विकास आघाडी च्या नेत्यांना आमचे सरकार स्थिर आहे व ते पाच वर्षे चालणार असे रोज उठून का सांगावे लागते आहे?.याचे कारण एकच आहे त्यांना पण माहिती आहे की हे सरकार पाच वर्षे टिकू शकत नाही, आघाडी मध्ये प्रचंड..२२/
बेबनाव आहे व रोज कुणीतरी नाराजी व्यक्त करत असते.पवारांनी २०१४ मध्ये केलेल्या राजकीय खेळीचा खुलासा केला आहे.त्यांनी सांगितले की २०१४ मध्ये सेना व भाजपा चे सरकार बनू नये म्हणून त्यावेळी भाजपा ला पाठिंबा जाहीर केला होता. बरं ठीक आहे शरद पवार त्यांच्या खेळीत यशस्वी पण झाले..२३/
कारण त्यानंतर शिवसेना आणि भाजप मध्ये जो दुरावा निर्माण झाला तो कायम आहे.पण आता प्रश्न निर्माण होतो की यावेळी पवारांनी शिवसेना ला पाठिंबा दिला आहे तेंव्हा यावेळी पण पवारांचा काहीतरी डाव असणार आहे.मागच्या वेळी शिवसेना भाजपा एकत्र येऊ नको म्हणून खेळी केली होती आणि त्यावेळी.. २४/
पवारांच्या खेळी मध्ये भाजपा वाले फसले होते.मग आता यावेळी शिवसेना फसलेली आहे ,बहुतेक या वेळी शिवसेनेचे पूर्ण खच्चीकरण करण्याचा डाव असू शकतो. महा विकास आघाडी चा कारभार पाहून तर तेच वाटते की शिवसेना चे जास्तीत जास्त नुकसान कसे होईल असाच कारभार केला जातो आहे.तेंव्हा शिवसेना ने...२५/
लवकरात लवकर सावध झाले तर बरं होईल नाहीतर नंतर वेळ निघून गेलेली असेल.
ठाकरेंच्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये मला संवाद दिसत नाही असे पवार बोलले आहेत. एकप्रकारे पवारांनी ही आपली नाराजी व्यक्त केली आहे यावर कोणीही चर्चा करत नाही.खरेतर हा या मुलाखतीतील खरा गोप्य स्पोट आहे,पण याकडे..२६
कुणाचे लक्ष नाही.पवारांच्या या बोलण्यातून सरळ सरळ नाराजी व्यक्त होत आहे.आघाडी मध्ये बिघडी निर्माण होण्याचे तेच महत्त्वाचे कारण आहे की ठाकरे यांचा मंत्रिमडळा बरोबर संवाद नाही.त्यामुळे रोज एक निर्णय जाहीर केला जातो व दुसऱ्या दिवशी तो बदलला जातो हेच गेले सहा महिने सुरू आहे..२७/
मोदी सरकारच्या सत्तेला सुरुंग लावणार वगैरे असे कोणतेही वक्तव्य पवारांनी मुलाखती मध्ये केलं नाही. पवार फक्त इतकेच बोलले की देशाला पर्याय देण्याची गरज आहे,त्याची अंमलबजावणी आम्ही करू,विरोधी पक्षांना एकत्र करण्याची भूमिका घेणार.२८/
ठाकरे सरकार चे भविष्य काय?..या शेवटच्या प्रश्नावर पवारांनी जे उत्तर दिले आहे ते नीट समजून घेतले पाहिजे .. पवार बोलले की"हे सरकार पाच वर्षे चालेल याबद्दल शंका नाही,पण व्यवस्थित काळजी घेतली तर पुढच्या निवडणुका सुद्धा एकत्र लढू"..इथे लक्ष द्या पवार बोलले आहेत की व्यवस्थित काळजी..२९/
घेतली तर पुढच्या निवडणुक एकत्र लढू,म्हणजे इथे जर तर चा प्रश्न आहे.याचाच अर्थ असा होतो पुढची निवडणूक एकत्र लढण्याची काही गॅरंटी नाही.पवारांच्या डोक्यात काहीतरी वेगळच नियोजन चालू आहे त्याचा उलगडा भविष्यात होईलच.. रणधीर देशमुख..
जय शिवराय जय हिंदवी स्वराज्य ⛳⛳⛳
@RajeGhatge_M
You can follow @randheerdeshmuk.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: