धारावी :श्रेयवादाची लढाई-रवींद्र मुळे.
संपर्क प्रमुख ,प.महाराष्ट्र.( रा.स्व.संघ ) - थ्रेड
धारावी येथे कोविद १९चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला होता.तो आटोक्यात आणण्यासाठी सरकार असमर्थ ठरत होते. त्यात काही सामाजिक संस्था पुढे आल्या विशेष करून संघविचाराच्या संस्थांनी.
स्वयंसेवकांनी ppe kit घालून स्क्रिनिंग साठी पुढाकार घेतला. समुपदेशन झाले. काढा ,औषध, स्वच्छता ,sanitisation याचा प्रसार झाला .परिणाम स्वरूप सरकारी प्रयत्नांना ही जोड मिळाल्यावर तेथील प्रादुर्भाव झपाट्याने कमी झाला. WHO ने पण दखल घेतली. आणि येथेच गम्मत सुरू झाली.
सरकारला त्याचे श्रेय मिळणे स्वाभाविक होते. विरोधी पक्षातील मंडळी हे श्रेय सरकारचे नाही संघाचे आहे हे उच्च रवात चंद्रकांत पाटील ते नितेश राणे सांगू लागले. तिकडे सत्ताधारी मंडळीनी उदार पणे हे केवळ आमचे यश नाही तर सर्वांचे आहे असे न म्हणता स्वतःची पाठ थोपटून घेण्यात धन्यता मानली.
पण ज्या स्वयंसेवकांनी किंवा संघांनी हे स्वाभाविक कर्तव्य म्हणून केले ते याकडे कसे पाहतात किंवा कसे बघितले पाहिजे यासाठी संघ समजून घेण्याची गरज आहे.
पूजनीय डॉक्टरांना एकदा नागपूरकर मंडळीनी भेट घेवून सध्या नागपूरमध्ये मुस्लिम समाजाचे खूप आक्रमक रूप दिसते आहे उद्या दंगल सदृश्य परिस्थिती झाली तर तुम्ही कार्यकर्त्यांना काय सांगणार असे विचारले.डॉक्टरांनी शांत पणे सांगितले मी त्यांना अंथरूण पांघरूण घेवून कार्यालयात झोपायला बोलवेल.
ते आश्चर्याने डॉक्टर यांच्या कडे बघायला लागले. डॉक्टर पुढे म्हणाले समाजात कुठलेही
कॉन्ट्रॅक्ट घेणारी संघटना असे संघाचे स्वरूप मला करायचे नाही. संघावर सगळे सोपवून समाज निष्क्रिय राहणे हे जर घडले तर ते संघाचे अपयश आहे . संघ आणि समाज वेगळे नाही.
त्या मुळे सर्व समाजाला बरोबर घेवून समाजा‌ कडून ते करून घेणे यासाठी समाज उभा राहिला पाहिजे अशी संघाची भूमिका आहे. धारावीत पण तेथील समाजाने ठरवले कोरोना‌ वर मात करायची म्हणून ते घडले संघ निमित्त मात्र ठरला.संघ स्वयंसेवक रोज म्हणतात त्या प्रार्थनेत निश्रेयस असा उल्लेख आहे.
त्यामुळे संघाने अमक्या वेळेस काय केले ? तमक्या वेळेस संघ कुठे होता याची उत्तरे खरे तर संघाला द्यावी वाटत नाहीत. ( स्वयंसेवक जी प्रार्थना संघ स्थानावर म्हणतात ती पण संघाची नाही तर सगळ्या समाजाची आहे अशी संघाची धारणा आहे त्यात कुठेही संघाचे नाव नाही.)
फाळणीच्या वेळेस हिंदू समाजाला सुरक्षित भारतात आणणे किंवा त्यांचे पुनर्वसनाचे कार्य करणे किंवा श्रीनगर विमानतळ पाकिस्तानने हल्ला केल्यावर बर्फ दूर करून भारतीय सैन्याला विमाने उतरवण्यासाठी उपलब्ध करून देणे, युद्धाच्या वेळी सीमेवर सैनिकांची सेवा करणे पुर, दुष्काळ ,भूकंप , वादळ ,
विमान किंवा रेल्वे अपघात यात मदतीला धावून जाणे याचे कधीच श्रेय घेण्याच्या भानगडीत संघ पडला नाही. याचे श्रेय घेणे म्हणजे आज माझ्या आईचे पाय दाबून दिले.
तिला औषध दिले तीची सेवा केली असे स्वतःच म्हणणे हे जितके हास्यास्पद तितके संघाने हे केले , स्वयंसेवक असे करतात असे म्हणून पाठ थोपटून घेणे हास्यास्पद आहे.
म्हणूनच अनेक वर्ष रामजन्मभूमी आंदोलन करत कोठारी बंधूंचे बलिदान समोर असून प्रत्यक्ष बाबरी ढाचा उध्वस्त झाल्यावर संतप्त हिंदू समाजाचे हे कार्य आहे असे सांगून सरसंघचालक समाजाला श्रेय देवून मोकळे झाले.
आणीबाणी चा प्रदीर्घ लढा देवून ही" विसरा आणि क्षमा करा" असे म्हणताना सरसंघचालकांनी स्वयंसेवक ना चालून आलेली सत्ता पदे नाकारली.गोवा , दादरा नगर हवेली चा स्वातंत्र्य संग्रामात स्वयंसेवक अग्रेसर होते पण संघाने त्याचे श्रेय घेतलेले नाही .
एखाद्याला देशभक्त म्हणणे हा त्याचा सन्मान असू शकतो पण बाकीच्यांच्या अपमान आहे असे संघाला वाटते. देशभक्त असणे किंवा मातृभक्त असणे हा गुण नाही तर
ती सहज सुलभ मानवी भावना असली पाहिजे अशी संघाची धारणा प्रथमपासून आहे. हा फार वेगळा विचार आहे. तो मुळात च समजून घेण्याचा आहे.
श्रेय देणारे ,श्रेय नाकारणारे आणि श्रेय घेणारे या सगळ्यांनीच संघ मुळात समजून घेण्याची गरज आहे. सामाजिक माध्यमे हे अत्यंत स्वस्त सोपे संवंग माध्यम व्यक्त होण्यासाठी आज सर्वांना उपलब्ध आहे.
अनेक जण ज्यांना संघ स्वयंसेवकांनी केलेल्या सेवेचा उपयोग झाला ते संघाची अफाट स्तुती करतात मग ती सगळ्या समाज माध्यमातून प्रसिद्ध पावते. ज्या राजकारणी मंडळींना याचा आपल्याला फायदा आहे असे वाटते ते पण याला प्रसिध्दी देतात.
या उलट जे दीर्घ द्वेष करणारी मंडळी आहेत किंवा ज्यांना असे वाटते यामुळे आपले राजकीय नुकसान आहे ,( कारण नसताना असे वाटत असते) ते संघावर मग खालच्या पातळीवर टीका करतात संघाचे व्यंगात्मक प्रदर्शन वगैरे करतात.वस्तुस्थिती कडे डोळेझाक करतात.
वास्तविक स्वयंसेवकांनी
स्वतःचे जीव धोक्यात घालून काम केले ही वस्तू स्थिती आहे. ज्या तरुणांनी काम केले त्यांच्या घरातले वयस्कर मंडळी आज कोरोना positive झाले आहेत.
पुणे ,नाशिक,ठाणे, डोंबिवली कल्याण मुंबई आणि धारावी सगळीकडे कार्यकर्ते काम करत आहेत ही वस्तुस्थिती आहे आणि या कामाचा सरकार कुणाचे आहे आणि देशाचे नेतृत्व कोण करत आहे याच्याशी काही संबंध नाही हे पण लक्षात ठेवावे लागेल.
खरा स्वयंसेवक स्तुतीने हुरळून जात नाही आणि निंदा झाली म्हणून खचून पण जात नाही. कर्तव्य भावनेने या कोविडच्या काळात अन्न धान्य वाटप ते अंत्य संस्कार करण्या पर्यंत सर्व काम कुठल्याही श्रेयाची अपेक्षा न बाळगता चालू आहे ते टीका झाली म्हणून थांबणार नाही.
जेंव्हा अशी संकटे येतात तेंव्हा केवळ एखादी व्यक्ती किंवा सरकार किंवा संघटन पुरेसे नसते तर या सर्वांनी मिळून त्या संकटाला तोंड द्यायचे असते पण प्रत्येक बाबतीत राजकीय लाभ आणि मलिदा शोधणारी संस्कृती उदयाला आली की तेथे प्रश्न सोडवण्यापेक्षा श्रेय घेण्या कडे कल जास्त येतो.
संघाने आपल्या सेवा प्रकल्प, सेवा कार्य याची कधीच फारसी प्रसिध्दी केलेली नाही आणि टीका करणाऱ्या लोकांना फार महत्त्व दिलेले नाही संघाचे कार्य अविरत चालू राहणार आहे पण ते सर्व समाजाला बरोबर घेवून .
संघ संस्थापक तर संघाचे लवकरात लवकर समाजात विसर्जन व्हावे या मताचे होते. आज ही संघाची हीच भूमिका आहे. या कोविद च्या काळात केवळ संघ नाही तर अनेक संस्था ,धार्मिक मठ मंदिरे , अनेक ज्ञाती संस्थांचे कार्यकर्ते अनेक सामाजिक कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले आहेत.
पुण्यात उद्योजक एकत्र आले आणि त्यांनी एक व्यासपीठ उभे करून खूप मोठे काम उभे केले. कुणी कोविद साठी रुग्णालय उभे केले. संघ आणि समाज त्यांचा मना पासून ऋणी आहे.
भाजप विरोधकांनी आपल्या राजकीय लढाईत संघाला ओढण्याची गरज नाही.
पण राजकीय पक्ष म्हणून या काळात कुठल्या पक्ष कार्यकर्त्याने काय भूमिका बजावली याचे तटस्थ समीक्षण अवश्य पत्रकार मंडळीनी करावे अशी स्थिती आहे. संघ स्वयंसेवक म्हणून स्वयंसेवकांची ती जबाबदारी नाही त्यांचे ते काम पण नाही.
गीतेतील वर्णन केलेला स्थित प्रज्ञ ,कर्मयोगी असा स्वयंसेवक डॉक्टर साहेबांना अपेक्षित होता. सुरुवातीच्या काळात संघ प्रसिध्दी परांमुख आहे असे प्रसिद्ध वाक्य होते.
काळ बदलला संघाची इच्छा असो नसो काही नाही तर टीआरपी साठी किंवा राजकीय फायदा तोट्यासाठी लोकांचे कॅमेरे हे संघाकडे आहेत आणि संघाची हीच खरी परीक्षा आहे. पण शाखेतील संस्कारांच्या बळावर स्वयंसेवक ही परीक्षा पास होतील.
तेंव्हा तूर्तास श्रेय देणाऱ्या मंडळीनी जरा सबुरीने घ्यावे , श्रेय नाकारणाऱ्या नी प्रामाणिक व्हावे आणि संघ स्वयंसेवकांनी हुरळून न जाता अलिप्त पणे बघावे एव्हढेच वाटते.
१३/७/२०
You can follow @vipinrocs.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: