📌📌📌

त्याच्या यशाची चर्चा..

फ्रान्स देशाकडून त्यांच्या संशोधन संस्थेत रुजू होण्यासाठी त्याला प्रतिमहिना १६ लाख रुपयांची नोकरी, ५ बीएचके फ्लॅट, अडीच कोटी रकमेची चारचाकी अशी ऑफर होती. त्यानं नाकारली. एन. एम. प्रताप त्याचं नाव.
अलीकडेच आपल्या देशानं या युवा वैज्ञानिकाचा उचित सन्मान करून, भारताच्या डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनमध्ये (डीआरडीओ) रुजू करून घेतलंय. पण हे यश सहजासहजी मिळालेलं नाही. अलीकडेच @satya_AmitSingh या हॅन्डलवर इंग्रजीतून थ्रेड लिहिला आहे. थ्रेड वाचल्यानंतर
यातून मिळणारं मानसिक बळ आपल्या तरूणांपर्यंत पोहोचावं यासाठी मराठीतून अनुवाद करत आहे. काही ठिकाणी अतिरिक्त माहिती जोडत आहे.

कर्नाटक येथील मैसूरजवळील मंड्या जिल्ह्यात एन. एम. प्रतापचा जन्म झाला. वडील पेशाने शेतकरी. त्यामुळे अवघे २००० इतके मासिक उत्पन्न.
लहानपणापासून इलेक्ट्रॉनिक्समध्ये आवड असल्याने जवळच्या सायबर कॅफेत अधिकाधिक वेळ घालवत एव्हिएशन, स्पेस (अवकाश), रोल्स रॉयस गाडी, बोईंग ७७७ अशा विषयांची माहिती मिळवत. यादरम्यान जगभरातील अनेक शास्त्रज्ञांकडे त्याने ईमेलच्या माध्यमातून आपल्या तोडक्यामोडक्या इंग्रजीत
या क्षेत्रात काम करण्याची इच्छा व्यक्त केली. इंजिनीअरिंग करण्याची अतीव इच्छा असताना आर्थिक अडचणींमुळे बीएससी (फिजिक्स) मध्ये प्रवेश घेतला. मात्र आर्थिक अडचण कायम राहिल्याने हे शिक्षणही त्याला पूर्ण करता आले नाही. याच काळात हॉस्टेलमधील खोलीचे भाडे थकले म्हणून त्याला
हाकलवून देण्यात आले. अखेर झोपण्यासाठी मैसूर बस स्टॉप आणि कपडे धुण्यासाठी एखाद्या सार्वजनिक शौचालयांचा वापर करण्याची वेळ प्रतापवर आली.

स्वतःच्या आयुष्यासोबत ही अशी जीवघेणी स्पर्धा सुरूच होती. मात्र इच्छाशक्ती असली म्हणजे यशाचा मार्गातील अडचणी दूर सारण्याची ताकद
आपोआप मिळते म्हणतात. तसंच काहीस प्रतापच्या आयुष्यात सुरु होतं. प्रतापने सी++, जावा कोअर आणि पायथॉनसारख्या कॉम्प्युटर लँग्वेज शिकण्यास सुरुवात केली. हे शिक्षण सुरु असताना ई-कचऱ्यामधून ड्रोन बनवण्याचा प्रयत्न सुरु केला. जवळपास ८० प्रयत्न फोल ठरल्यानंतर
अखेर ड्रोन तयार करण्यात प्रताप यशस्वी ठरला. हे ड्रोन मॉडेल घेऊन तो आयआयटी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी गेला आणि द्वितीय क्रमांकाचा मानकरी देखील ठरला. त्याच ते मॉडेल पाहून त्याने जपानच्या आंतरराष्ट्रीय रोबोटिक्स स्पर्धेत सहभागी व्हाव असं सुचवण्यात आलं
जपानला जाण्यासाठी चेन्नईच्या कॉलेजमधील प्राध्यापकाने त्यांचा प्रबंध मंजूर करणे अपेक्षित होते. यासाठी त्याने पहिल्यांदाच चेन्नई गाठलं. अनेक अडचणींचा सामना त्याला करावा लागला. अखेर प्रताप लिहिण्यास पात्र नाही अशा काही टिप्पणी देत त्याचे मॉडेल मान्य करण्यात आले.
तांत्रिक बाबी पूर्ण झाल्या होत्या. आता जपान गाठायचे होते. यासाठी ६० हजार इतका खर्च येणार होता. म्हैसूरमधील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याचे विमानाचे तिकीट स्पॉन्सर केले. आणि उर्वरित खर्चासाठी लागणारी रक्कम जमा करण्यासाठी प्रतापच्या आईने आपले मंगळसूत्र विकण्याचा निर्णय घेतला.
सर्व प्रयत्नांची पराकाष्टा करत प्रतापने टोकियो गाठले. यावेळी त्याच्या खिशात अवघे १४०० रुपये होते. स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी बुलेट ट्रेनचा पर्याय उपलब्ध होता. मात्र हा खर्च शक्य नसल्याने प्रतापने लोकलने प्रवास सुरु केला. जवळपास १६ ठिकाणी त्याला लोकलबदल करावा लागला.
सर्व सामानासह त्याचा प्रवास सुरु होता. मात्र त्याचा 'स्ट्रगल' संपला नव्हता. इच्छित स्थळ गाठण्यासाठी प्रतापने आपल्या सामानासह ८ किमी अंतर पायी कापले.

तब्बल १२७ देशांचा सहभाग असलेल्या त्या प्रदर्शनात प्रतापने भाग घेतला. निकाल जाहीर होऊ लागले. प्रथम दहापर्यंत नाव
न आल्याने प्रतापने परतीची वाट पकडली. तोपर्यंत परीक्षकांनी तृतीय, द्वितीय क्रमांक जाहीर केला. आता प्रथम क्रमांक जाहीर होणार होता. आणि उद्घोषणा झाली. प्रथम क्रमांक मिस्टर प्रताप (भारत).. मान मागे वळली. डोळ्यांवर विश्वास बसणं अशक्य झालं. डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या होत्या
त्याच आनंदाश्रू तरळलेल्या डोळ्यांनी प्रतापने भारताचा झेंडा डौलानं फडकताना पाहिला. त्याला १० हजार यूएस डॉलर इतक्या घसघशीत रकमेने गौरविण्यात आले. या यशानंतर भारतीय पंतप्रधानांसह कर्नाटकमधील आमदार खासदारांनी बोलावून बोलावून त्याचा सत्कार केला.
हे यश पाहून फ्रान्स देशाकडून त्यांच्या संशोधन संस्थेत रुजू होण्यासाठी प्रतापला प्रतिमहिना १६ लाख रुपयांची नोकरी, ५ बीएचके फ्लॅट, अडीच कोटी रकमेची चारचाकी अशी ऑफर मिळाली. त्यानं ती नाकारली.
पंतप्रधांनांनी डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनमध्ये सामावून घेण्याच्या सूचना दिल्या. त्याच्या या यशाच्या कथा आता अनेक वेब पोर्टलवर झळकत आहेत. आयआयएससी, आयआयटी मुंबईसारख्या नामांकित संस्थांकडून त्याला लेक्चर देण्यासाठी पाचारण करण्यात आले आहे.
प्रतापने २०१८ साली, जर्मनी येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय ड्रोन एक्स्पोअल्बर्ट आइन्स्टाइन इनोव्हेशन गोल्ड मेडल पटकावले आहे. स्पर्धेत अलीकडेच कर्नाटक येथे आलेल्या महापुरात अडकलेल्या हजारो लोकांना प्रतापच्या ६०० ड्रोन्सच्या साहाय्याने अन्न आणि औषध पाठवण्यात आली होती.
You can follow @RaneSays.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: