#THREAD

काश्मीर राज्य आपल्या देशाचा अविभाज्य घटक व्हावं म्हणून आर्टिकल ३७० चा विरोध करणारे श्याम प्रसाद मुखर्जी एकदा म्हणाले होते."एक देश मे दो विधान,दो प्रधान और दो निशान नही चलेंगे".

भारतीय जन संघाचे संस्थापक अध्यक्ष, डॉक्टर श्याम प्रसाद मुखर्जी यांची आज जयंती.

(1/14)
६ जुलै १९०१ रोजी बंगाल मधील सुप्रसिद्ध न्यायाधीश आशुतोष मुखर्जी यांच्या घरी श्याम प्रसाद मुखर्जी यांचा जन्म झाला.१९२३ साली त्यांनी कलकत्ता विद्यापीठातून MA या शाखेत पदवीधर झाले.
(2/14)
वडिलांच्या मृत्यू नंतर त्यांनी १९२४ मध्ये कलकत्ता हायकोर्टात वकिली साठी नोंदणी केली,१९२६ साली ते लंडन(लिंकन इन) ला बॅरिस्टरी चा अभ्यास करण्यासाठी म्हणून गेले.१९२७ साले ते बॅरिस्टर झाले.
(3/14)
वयाच्या तेहतिसाव्या वर्षी ते जगातील सर्वात तरुण कुलगुरू झाले,ते त्यांच्या ३३ व्या वर्षांपासून ते ३७ व्या वर्षापर्यंत कलकत्ता विद्यापीठाचे कुलगुरू होते,त्यांच्या काळात त्यांनी बरेच उपयुक्त बदल केले आणि ते ASIATIC SOCIETY OF KOLKATTA याचेही कार्यकारी सदस्य होते.
(4/14)
काँग्रेस चे उमेदवार म्हणून मुखर्जी बंगाल विधान परिषदेत निवडून आले,पण जेव्हा काँग्रेस ने इथल्या विधिमंडळाचा बहिष्कार केला तेव्हा त्यांनी राजीनामा दिला,पुढे जाऊन ते अपक्ष उमेदवार म्हणून लढले आणि ते निवडून आले.

(5/14)
कृषक-प्रजा पार्टी आणि ऑल इंडिया मुस्लिम लीग यांची जेव्हा सरकार होती तेव्हा मुखर्जी हे विरोधी पक्ष नेते म्हणून भूमिका बजावत होते,येत्या काळात ते प्रोग्रेसिव्ह कोलेशन मिनिस्ट्री चे सदस्य झाले आणि फजलूल हक यांच्या अध्यक्षते खाली त्यांना अर्थमंत्री म्हणून नेमले गेले.
(6/14)
पण एकंदरीत या सगळ्यांचा रंग रूप पाहता वर्षभरात मुखर्जी यांनी राजीनामा दिला आणि त्यांनी १९४४ साली हिंदू महासभेचे सदस्यत्व स्वीकारले.ते हिंदुमहासभेचे अध्यक्ष सुद्धा झाले.
(7/14)
स्वातंत्र्यानंतर मुखर्जी याना नेहरूंच्या सरकार मध्ये वाणिज्य आणि उद्योग मंत्री म्हणून नेमले गेले,पण १९५० मध्ये झालेल्या नेहरू-लियाकत तहानंतर त्यांनी राजीनामा दिला आणि
(8/14)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या सोबत चर्चा करून भारतीय जन संघ २१ ऑक्टोबर १९५१ साली स्थापन केला.
(9/14)
१९५२ च्या निवडणुकीत जन संघाचे तीन उमेदवार निवडून आले,त्या पैकी एक म्हणजे मुखर्जी.त्यांनी त्या वेळेला नॅशनल डेमोक्रॅटिक पार्टी स्थापन केली ज्यात ३२ लोकसभेचे खासदार आणि १० राज्यसभेचे खासदार होते,परंतु लोकसभा अध्यक्षाने या पार्टी ला विरोधी पक्ष म्हणून नेमण्यास नकार दिला.
(10/14)
शेख अब्दुल्लाह यांनी मांडलेल्या थ्री नेशन थेअरी ला विरोध करण्यासाठी आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक राहण्यासाठी म्हणून त्यांनी त्यांचा विरोध हा संसदेच्या बाहेर अर्थात लोकांमध्ये जाऊन दर्शवला आणि हि एक देशभर चळवळ चालू झाली.
(11/14)
आर्टिकल ३७० चा विरोध करत ते म्हणाले,"."एक देश मे दो विधान,दो प्रधान और दो निशान नही चलेंगे"
१९५३ साली जेव्हा मुखर्जी यांना काश्मीर ची हद्द पार केल्यामुळे अटक केली गेली,आणि जवळपास ४५ दिवस त्यांना तुरुंगात ठेवण्यात आले,
(12/14)
याच वेळेला २३ जून १९५३ रोजी मुखर्जी यांचा मृत्यू गूढ परिस्थिती झाला,काही लोक असेही म्हणतात कि त्यांना मारले गेले.
येत्या काळात भारतीय जन संघाचे रूपांतर भारतीय जनता पार्टी मध्ये झाले आणि एका सध्या रोपाचे रूपांतर एका वटवृक्षात झाले....
(13/14)
एका प्रखर हिंदुत्ववादी,देशभक्त आणि देशाची एकातमता टिकवण्यासाठी लढणाऱ्या या नेत्याची आज जयंती.श्याम प्रसाद मुखर्जी यांच्या कर्तुत्वाला मनाचा मुजरा......जय हिंद !
(14/14)
You can follow @malhar_pandey.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: