#मनुस्मृति नाव ऐकलं की आपल्या सगळयांच्या समोर उभा राहतो तो वाद. आजपर्यंत मनूच्या नशिबी आला तो वादच. त्यात सर्वात मोठा वाद आहे तो जातिवादाचा असो.
मनुस्मृतिमध्ये फक्त जातींवर आणि वर्णव्यवस्थेवरच भाष्य केलंय का? खरंतर #मनुस्मृति हे असं शास्त्र आहे ज्यात सृष्टी उत्पत्तीपासून..
1/N
"मोक्ष"पर्यंत म्हणजेच विज्ञानापासून अध्यात्मापर्यंत सर्वच मानवीय बाबींचा उल्लेख आढळतो. आज आपण अशाच एका विज्ञानाधिशिष्ठीत बाबीचा विचार करूयात आणि त्यांनी दिलेलं हे शास्त्र किती अगाध आणि अथांग आहे याचा प्रत्यक्ष अनुभव करूयात.
2/N
#मनुस्मृति च्या पहिल्या अध्यायात सृष्टीच्या उत्पत्तीचे गूढ उकळण्यात आले आहे. या थ्रेडमध्ये आपण सृष्टीच्या वयाबद्दल महर्षि मनू यांनी काय सांगितलं आहे याबाबत पाहुयात.
#मनू #मनुस्मृति #सृष्टी_उत्पत्ती #विज्ञान #वेद #सनातन_सर्वश्रेष्ठ_है
3/N
सृष्टीच वय वैदिक ग्रंथ विरुद्ध विज्ञान:
वैदिक ग्रंथानुसार आपली सृष्टी 1अब्ज 96 कोटी 08 लाख 53 हजार 121 वर्षे जुनी आहे. खरं तर हे वेद उत्पत्तीचा काळ आहे. सृष्टी तर यापेक्षा आणखी जुनी आहे.
महर्षि दयानंद सरस्वती यांनी त्यांच्या "ऋग्वेदादीभाष्यभूमिका" ह्या ग्रंथाच्या दुसऱ्या
4/N
अध्यायात वेदांचा पर्यायाने मानव उत्पत्तीचा काळ काय असेल यावर प्रकाश टाकला आहे. कारण मानवाच्या उत्पत्ती नंतरच त्याला परमेश्वराकडून वेद ज्ञान प्राप्त झालं. या प्रकरणात महर्षींनी सृष्टी उत्पत्तीपासून ते मानवाची उत्पत्ती होण्यापर्यंतच्या काळाला गौण मानलं. कारण मानवाच्या उत्पत्ती
5/N
नंतरच त्याने कालगणना सुरू केली.
स्वामी दयानंद सरस्वती यांनी ही गणना करण्यासाठी मनुस्मृतिच्या श्लोकांचा आधार घेतला. त्यामुळे #मनुस्मृति ही केवळ जीवनशैली शिकवत नव्हती तर त्यात असलेलं विज्ञान ही तेवढंच महत्त्वाचे होते आणि म्हणूनच प्राचीन काळी या स्मृतीला किती महत्व होत हे कळते.
6/N
ह्या श्लोकात मानवी वर्ष आणि दैवी वर्ष याबाबत सांगितलं आहे.

दैवे रात्र्यहनी वर्षं प्रविभागस्तयोः पुनः ।अहस्तत्रोदगयनं रात्रिः स्याद्दक्षिणायनम् । ।1/67

मनुष्यांचे एक वर्ष एक "दैवी - दिन- रात्र" असते त्या दैवी दिवस - रात्रीचे पुन्हा विभाग आहेत ,त्यात सूर्याच्या भूमध्य
7/N
रेषेच्या (विषुववृत्ताच्या) उत्तरेकडे सूर्य स्थित असणे, अर्थात "उत्तरायण" दैवी दिवस म्हणविला जातो, व सूर्याची विषुववृत्ताच्या दक्षिणकडे स्थिती अर्थात "दक्षिणयान" दैवी रात्र असते.

(जसा पृथ्वीचा परिभ्रमण काल आहे तसा सूर्य आदी ग्रहांचा आहे हे त्यांना माहीत होते.)

8/N
*सूर्य जड देवता आहे - निरुक्तात "देव" शब्दाची निरुक्ती अशी दिली आहे."देवो दानाद्वा, दीपनाद्वा, द्योतनाद्वा, द्यु स्थानो भवतीति वा "।। (7।4।15)
अर्थ - "दान देणारा, प्रकाशित करणारा, होणारा वा द्युस्थानीय यांना देवता म्हणतात"सूर्य द्युस्थानीय आहे व आपल्या प्रकाशाने सर्व साकार
9/N
वस्तूंना प्रकाशित करतो म्हणून देव वा देवता आहे. त्यामुळे वैदिकदृष्ट्या सूर्य पूजनीय नाही.

पुढच्या श्लोकात मनू महाराज त्यांच्याकडे आलेल्या महर्षींना म्हणतात:
ब्राह्म परमात्म्याचा दिवस - रात्रीचे तसेच एकेका युगाचे जे कालपरिमाण आहे ते क्रमानुसार व संक्षिप्तपणे ऐका ।।1.68।।
10/N
चत्वार्याहुः सहस्राणि वर्साणां तत्कृतं युगम् ।तस्य तावच्छती संध्या संध्यांशश्च तथाविधः । ।1/69
त्या दैवी (श्लोक-67मध्ये वर्णन आहे) सतयुगाच्या जितक्या दिव्य शतकवर्षांच्या अर्थात 400 वर्षांच्या "संध्या" होतात आणि तितक्याच वर्षांच्या अर्थात 400 वर्षांच्या "संध्यांश"चा काल असतो.
11/N
संध्या म्हणजे एका युगातून दुसऱ्या युगात प्रवेश करण्यासाठी लागणारा काळ. म्हणजे सुरुवातीचा काळ हा "संध्या" तर शेवटच्या काळाला "संध्याश" म्हणतात. आणि हा काळ प्रत्येकी 400 वर्षांचा आहे.
या श्लोकाप्रमाणे सतयुगाचे कालपरिमाण 4000 वर्षे आणि संध्या आणि संध्याश यांचे प्रत्येकी
12/N
400 वर्षे म्हणजे सतयुग हे 4800 दैवी वर्षांचे याला मानव रुपात मांडायचे असेल तर त्याला 360 ने गुणावे लागेल
एक देववर्षं हे 360 मानव वर्षांबरोबर असते.
म्हणून4800x360=17,28,000 वर्षे सतयुगाचे आहेत.
याच्या पुढच्या श्लोकात महर्षि मनू पुढील तीन युगांचे कालपरिमाण कसे असेल ते सांगतात.
13/N
इतरेषु ससंध्येषु ससंध्यांशेषु च त्रिषु ।एकापायेन वर्तन्ते सहस्राणि शतानि च।। 1/70

उरलेल्या इतर तीन त्रेता, द्वापर व कलियुग, यांच्यात "संध्या" नामक कालांत, तसेच "संध्यांश" नामक कालांत क्रमश: एकेक हजार व एकेकशे उणे केल्याने त्यांच्या एकेकाचे कालपरिमाण बनते, अर्थात 4000...
14/N
दिव्यवर्षांचे सतयुग असते, त्या संख्येतून एक हजार व संध्या 400 वर्षे व संध्यांश 400 वर्षे यामधून एकेक शंभर उणे केल्याने 3000 दिव्य वर्षे 300 संध्या वर्षे 300 संध्यांशवर्षे 3600 दिव्यवर्षांचे त्रेतायुग होते.

दिव्यवर्षे 4000-1000= 3000
संध्या वर्षे 400-100= 300

15/N
संध्याश वर्षे 400-100= 300
एकूण= 3600 दिव्यवर्षे याला 360 ने गुणावे 12,96,000 मानव वर्षे त्रेतायुगाचे.

द्वापारयुग:
दिव्य वर्षे 3000-1000= 2000
संध्या 300-100= 200
संध्याश 300-100= 200
एकूण =2400
याला 360 ने गुणावे तर 8,64,000 मानव वर्षे हे द्वापारयुगाचे असतील.

16/N
ह्याच पद्धतीने कलियुग 1200 दिव्यवर्षे आणि 4,32,000 मानव वर्षे असेल. (यावरून आपण रामायण आणि महाभारताची कालगणना करू शकतो.)

पुढच्या श्लोकात महर्षि मनू चतुर्युगी आणि युग बद्दल सांगतात.

यदेतत्परिसंख्यातं आदावेव चतुर्युगम् ।एतद्द्वादशसाहस्रं देवानां युगं उच्यते । ।1/71

17/N
जो हा अगोदर (69-70 मध्ये) चार युगांच्या कालपरिमाणाच्या रूपात गणला आहे,तो बारा हजार दिव्य वर्षांचा काल एक मानवी चतुर्युगीचा काळ देवातांचे एक "युग" म्हणविला जातो.
18/N
देववर्षे (संध्या आणि संध्याश मिळून)
सतयुग 4800 x 360= 17,28,000
त्रेतायुग 3600 x 360= 12,96,000
द्वापारयुग 2400 x 360= 8,64,000
कलियुग 1200 x 360= 4,32,000
एकूण= 12,000 x 360= 43,20,000

ह्या चार युगांची मिळून एक चतुर्युगी आणि देवतांचा एक युग म्हणविला जातो.
19/N
आणि एक हजार चतुर्युगाची एक सृष्टीचा काल असतो.
पुढच्या श्लोकात ब्रह्म दिवसाचा उलगडा करतात.

दैविकानां युगानां तु सहस्रं परिसंख्यया ।ब्राह्मं एकं अहर्ज्ञेयं तावतीं रात्रिं एव च।।1/72
त्या देवयुगांना हजाराने गुणल्यावर जे कालपरिमाण येते, जसे मानुषुगांची दिव्यवर्षे, 12,000 होतात,
20/N
त्यांना हजाराने गुणल्यावर 1.2 एक कोटी , वीस लक्ष, दिव्यवर्षों परमात्म्याचा एकं अह- एक "दिवस" व तावतीं रत्रिम् तितक्याच दिव्य वर्षांची त्याची एक "रात्र" समजावी.
या 1 कोटी 20 लाख वर्षांना 360 ने गुणल्यास 4 अब्ज 32 कोटी मानवी वर्षांचा कालपरिणाम बनतो.

21/N
हा काल सृष्टीच्या उत्पत्तीचा असतो जो परमात्म्याच्या जागृत म्हणजे दिवस असतो तर इतकाच काळ (4 अब्ज 32 कोटी) सुषुप्ती (रात्र) काळ असतो.
म्हणजे 8 अब्ज 64 कोटी वर्षे ब्रह्माचा (परमेश्वराचा) एक दिवस.

म्हणजेच, 43,20,000 x 1000 एवढ्या वर्ष सृष्टी चालते.
22/N
यद्प्राग्द्वादशसाहस्रं उदितं दैविकं युगम् ।तदेकसप्ततिगुणं मन्वन्तरं इहोच्यते।। 1/79
पहिल्या श्लोकांमध्ये (1/71) जे बारा हजार दिव्य वर्षांचे एक देवयुग म्हटले आहे त्याच्या एकाहत्तरपट काल, अर्थात 12,000x71=8,52,000 दिव्यवर्षांचे अथवा 8,52,000 दिव्यवर्षे x360 =3,06,07,20,000
23/N
मानवं वर्षांचे एक "मन्वन्तर" असे काल-परिमाण मानले आहे.

मन्वन्तराण्यसंख्यानि सर्गः संहार एव च ।क्रीडन्निवैतत्कुरुते परमेष्ठी पुनः पुनः । ।1/80

परमेष्ठी परमात्मा असंख्य मन्वन्तरे सृष्टि - उत्त्पत्ती व प्रलय हा खेळ खेळत वारंवार करीत असतो.
अशाचप्रकारे असंख्य मन्वतंरामध्ये
24/N
अनेक वेळा सृष्टी झाली असून अनेकवेळा ती पुढेही होईल. म्हणूनही सृष्टी नेहमी, तो सर्वशक्तिमान परमेश्वर, सहज रचतो, तिचे पालन करतो व तिचा प्रलयही करतो व असे सतत चालत राहणार आहे.
थोडक्यात, सृष्टि-प्रवाहाने अनादी आहे.

ह्या नंतर महर्षि दयानंद सरस्वती संकल्प मंत्राच्या आधारावर वेद
25/N
उत्पत्तीची कालगणना त्यांच्या "ऋग्वेदादिभाष्यभूमिका" करतात.

ओम् तत्सत् श्री ब्रह्मणः द्वितीये प्रहरोत्तरार्द्धे वैवस्वते मन्वन्तरेऽअष्टाविंशतितमे कलियुगे कलियुग प्रथम चरणेऽमुकसंवत्सरायमनर्तु मास पक्ष दिन नक्षत्र लग्न मुहूर्तेऽवेदं कृतं क्रियते च।

26/N
ही जी वर्तमान सृष्टी आहे त्याचा वर्तमान कालखंड सातव्या वैवस्वत मनुचा आहे. याआधी सहा मन्वंतर उलटली आहेत आणि आणखी सावर्णी आदी मन्वंतरे पुढे होतील. जी मन्वंतरे उलटली आहेत ती अशी.
स्वायंभूव (हीच ती मनुस्मृति जी आपण वाचतो ती सृष्टीच्या सुरुवातीला झाली आहे.)
27/N
स्वरोचिष, औत्तमी, तामस, रैवत, चाक्षुस आणि हा सातवा वैवस्वत मनू चालू आहे. पुढचा सावर्णी असेल.

संकल्प मंत्राच्या आधारावर वेद उत्पत्तीची कालगणना अशी असेल.
1. सहा मन्वंतराचा काल:
43,20,000x71x6= 1,84,03,20,000 वर्षे.

2. वर्तमान मन्वंतराची 27 उलटलेल्या चतुर्युगीचा काल:
28/N
43,20,000x27= 11,66,40,000 वर्षे.

3. वर्तमान 28व्या चतुर्युगीच्या उलटलेल्या तीन युगांचा (सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग)
38,88,000 वर्षे.

4. कालियुगाच्या प्रारंभीपासून विक्रम संवत 3044+2077= 5121

ह्या चारी काळाची बेरीज म्हणजेच वेदोत्पत्तीचा काल.
जो येतो -
29/N
★1अब्ज, 96कोटी, 8लाख,53हजार, 121वर्षे.★

आपल्याला सृष्टी निर्मितीचा कालखंड पाहीजे. मनूच्या मते, 1000 चतुर्युगीची एक सृष्टी आहे पण आपण जी कालगणना केली त्यानुसार 994 चतुर्युगीचा काल मोजला तर उर्वरित 6 चतुर्युगीचा काळ हा सृष्टी उत्पत्तीपासून मानव किंवा वेदोत्पत्तीचा काळ आहे.
30/N
म्हणजेच 2,59,20,000 वर्षे.

हे दोन्हीची बेरीज केल्यानंतर 1अब्ज, 98कोटी,67लाख,73हजार, 116 वर्षे हे आपल्या सृष्टीचं आयुष्य आहे.

हे झालं वैदिक शास्त्राच मत "ख्रिश्चन" सृष्टी उत्पत्तीबद्दल काय म्हणतात हे पाहू.

31/N
Saint Augustine नी त्यांच्या "City Of God" या पुस्तकात सृष्टीची उत्पत्ती येशूच्या 500 वर्षांपूर्वी झाली असे मानतात.

बिशप उशर यांच्यामते, सृष्टीची उत्पत्ती 4004 वर्षांपूर्वी झाली. आणि केम्ब्रिज विश्वविद्यालयाचे कुलपती डॉ. लाईटफूट यांनी सृष्टी उत्पत्तीचा काळ
32/N
23-Oct-4004 सकाळी 9 वा. असा सांगितला.
ह्या वरून हा धर्म किती प्रगतिशील आहे हे कळते.

NASA And UNIVERSE
नासा BIG BANG Theory वर काम करत आहे. त्याच्या Friedmann Model नुसार Big Bang सोबत Time आणि Space ची सुरुवात झाली.
नासाच्या WMAP या Space Craft च्या संशोधनानुसार
33/N
ब्रह्माण्डाच वय 1अब्ज 37 लाख आणि 1,30,000 वर्षे कमी अधिक एवढं आहे. त्यांचं हे अध्ययन Cosmic Microwaves आणि Theory of General Relativity वर आधारित आहे.
34/N
आणखी एका टीमने ज्याचे leader Wendy Freedman ह्या आहेत. त्यांनी Hubble Space Telescope चा वापर करून सृष्टी ही 90 कोटी ते 1.15 अब्ज असेल असा निष्कर्ष काढला.

Dr. Allan Sandage यांनी देखील Hubble चाच वापर करून सृष्टीच वय 1.15 ते 1.45 अब्ज वर्ष असेल असं शोधून काढलं.
35/N
एवढ्यावरच नाही संपलं ते म्हणतात न picture अभी बाकी है मेरे दोस्त. ह्या सर्व शास्त्रज्ञाना अक्षरशः वेड्यात काढलं ते Methuselah Star या ताऱ्याने हा आपल्याला माहीत असेलला ह्या सृष्टीतील सर्वात जुना तारा आहे आणि याचं वय आहे 1.4 अब्ज. म्हणजे वरील तिन्ही संशोधनापेक्षा जास्त.
36/N
याचा अर्थ असा की सृष्टी होण्याआधीच ह्या ताऱ्याचा जन्म झाला.
म्हणजे "आईच्या आधी मुलाने जन्म घेतला".
मग सद्यस्थितीत इथे NASA, WMAP, THEORY OF GENERAL RELATIVITY, HST सर्व फेल झाले. हे मत माझं नाही तर NASAच्या Scientistच आहे. (SS सोबत जोडला आहे)
37/N
जसे जसे विज्ञान प्रगत होत जाईल तसे आपल्याला याची उत्तरे मिळतील. पण सध्यातरी हे विज्ञान एवढं प्रगत नाही की ते सृष्टीच आयुष्य सांगू शकेल.

पण #मनुस्मृति चा आधार घेऊन #महर्षि_दयानंद यांनी केलेली सृष्टीची कालगणना ही त्याच दिशेनं असावी ह्या वरून हेच सिद्ध होतंय की आपली
38/N
वैदिक संस्कृती ही विज्ञानाने परिपूर्ण आहे. आणि #मनुस्मृति ला फक्त जीवनशैली संबधी ग्रंथ न ठरवता त्यातलं विज्ञानपण मान्य करावं लागेल.

काही प्रश्न किंवा शंका असतील तर त्यांचं समाधान करण्याचा प्रयत्न नक्की करेल.

@aryapraveen07
।।ओम्।।
You can follow @aryapraveen07.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: