"जातीचा अभिमान बाळगण्याचे दिवस गेले, अभिमान कर्तृत्वाचा बाळगायला हवा"
फडणवीसांचं हे वाक्य एकदम जुन्या दिवसांची आठवण करून गेलं.
संभाजी ब्रिगेड, दादोजी कोंडदेव पुतळा, भांडारकर इन्स्टिट्यूट हे सर्व विषय तापलेले असतानाच्या काळात अनेक ब्राह्मण तरुण - विशेषतः मराठवाड्यातील तरुण - +

खूपच डिस्टर्ब्ड होते. आजही ब्राह्मण सरसकट टार्गेट होतातच. त्यावेळी मात्र हा प्रकार वेगळ्याच लेव्हलवर चालत होता.
एका मित्राच्या कॉलेज गॅदरिंगमध्ये चक्क भाषणाला कुणा ब्रिगेडी माणसाला बोलावलं होतं तेव्हा. विद्यार्थ्यंसमोर भाषणात हा विकृत मनुष्य उघड जातीय शिवीगाळ करून गेला. +
एका मित्राच्या कॉलेज गॅदरिंगमध्ये चक्क भाषणाला कुणा ब्रिगेडी माणसाला बोलावलं होतं तेव्हा. विद्यार्थ्यंसमोर भाषणात हा विकृत मनुष्य उघड जातीय शिवीगाळ करून गेला. +
होस्टेलवर एकमेकांसोबत रहाणाऱ्या, असाइन्मेंट्स शेअर करणाऱ्या, दिवाळीचा फराळ मांडीला मांडी लावून खाणाऱ्या मित्रांमध्ये विष कालवून गेला हा मनुष्य! अश्या अनेक घटना घडत होत्या. +
विद्वेषी लोकांना यश नेहेमीच दुतर्फा मिळतं. एका समूहाला दुसऱ्या समूहाविरुद्ध पेटवलं की दोन्ही समूह चिथावले जातात.
त्यावेळी १४-१५ वर्षीय ब्राह्मण पोरांमध्ये "सगळे आम्हाला मारायला उठले आहेत!" अशी भीती नि त्या भीतीतून राग उत्पन्न होणं स्वाभाविक होतं.
परिणाम काय झाला? +
त्यावेळी १४-१५ वर्षीय ब्राह्मण पोरांमध्ये "सगळे आम्हाला मारायला उठले आहेत!" अशी भीती नि त्या भीतीतून राग उत्पन्न होणं स्वाभाविक होतं.
परिणाम काय झाला? +
गल्लीबोळात ब्राह्मण संघटना उघडल्या गेल्या! ब्राह्मणांना पलीकडून शिव्या पडल्या की इकडून उत्साही, महत्वाकांक्षी मंडळी "आपण एक व्हायला हवं!" असं सांगत उभे रहातात. संघटना, संघटनेची पदं, मग महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथीचे कार्यक्रम, मग - जय परशुराम! - ची घोषणा...सगळं सुरु झालं. +
यातून मानसिक आधार मिळाला, मनातील भीती कमी होऊन पोरं सुखाने जगू लागली तर प्रश्नच मिटला. पण तसं होतं कुठे!
आधी स्वतःशी वा १-२ जवळच्या मित्रांशी "आपलं कठीण आहे!" म्हणणारे तरुण १०-२० जणांच्या घोळक्यात तेच बोलायला लागले! यातून आधी चांगले जिगरी असलेले देशपांडे - देशमुख +
आधी स्वतःशी वा १-२ जवळच्या मित्रांशी "आपलं कठीण आहे!" म्हणणारे तरुण १०-२० जणांच्या घोळक्यात तेच बोलायला लागले! यातून आधी चांगले जिगरी असलेले देशपांडे - देशमुख +
विनाकारण दूर जायला लागले.
विविध फेसबुक ग्रुप्सवर हे सगळं दिसत होतं. त्यात झडझडून चर्चा होत होत्या. शिवाय ब्राह्मण तरुणांना हे "मुलींचे आंतरजातीय विवाह" नावाचं प्रकरण भलतंच तापदायक वाटत असतं! +
विविध फेसबुक ग्रुप्सवर हे सगळं दिसत होतं. त्यात झडझडून चर्चा होत होत्या. शिवाय ब्राह्मण तरुणांना हे "मुलींचे आंतरजातीय विवाह" नावाचं प्रकरण भलतंच तापदायक वाटत असतं! +
त्यात एखादी मुलगी धाडस करून "मी जात मानत नाही!" असं काहीतरी लिहिते. बास! मग ब्राह्मण ग्रुप्समध्ये मुलं विरुद्ध मुली तुंबळ युद्धच!
गम्मत बघा - मुली आमच्याशी चांगलं बोलत नाहीत - ही तक्रार असणारे मुलं - एखादी मुलगी बोलायला लागली की अस्से तुटून पडतात - +
गम्मत बघा - मुली आमच्याशी चांगलं बोलत नाहीत - ही तक्रार असणारे मुलं - एखादी मुलगी बोलायला लागली की अस्से तुटून पडतात - +
की तिने जन्मात पुन्हा यांच्या नादी लागू नये...!
यात व्हेज नॉनव्हेज, हिंदुत्व की ब्राह्मणत्व (त्यात हिंदुत्व हेच ब्राह्मणत्व हा एक अँगल!) असे वेगवेगळे फाटे आहेत. मग "ब्राह्मणांनी संघ व भाजपला "आपलं" समजावं की समजू नये?" - इथपर्यंत सगळं काही येतं. +
यात व्हेज नॉनव्हेज, हिंदुत्व की ब्राह्मणत्व (त्यात हिंदुत्व हेच ब्राह्मणत्व हा एक अँगल!) असे वेगवेगळे फाटे आहेत. मग "ब्राह्मणांनी संघ व भाजपला "आपलं" समजावं की समजू नये?" - इथपर्यंत सगळं काही येतं. +
शिवाय गोडसे प्रकरण आहे. (मी त्याकाळी गांधीजी पण आवडतात, गोडसे पण "समजू शकतो" अश्या भलत्याच स्टेजमध्ये होतो :D ) परशुराम ही आहेतच. +
या सगळ्या प्रकारांत सेन व्हॉइसेस फारच कमी असतात.
जात नाकारू नकोस - पण तिचा बिनकामाचा अभिमानही बाळगू नकोस अन अनावश्यक गिल्ट ही पाळू नकोस, "ते" लोक जय भीम म्हणतात म्हणून तू चार चौघांत उगाच "जय परशुराम" म्हणण्याची आवश्यकता नाही...उलट मिळून मिसळून रहा...तू पण म्हण की जय भीम...! - +

असं म्हणणारे फार कमी होते. अर्थात हे असं फेसबुकवर सांगून होत नाही. समजत नाही, पटत नाही.
म्हणून मग पब्लिकला समक्ष भेटणं, जमेल तश्या छोट्या मीटिंग्ज घेणं सुरु केलं.
त्याकाळी मी एक लॉजिक नेहेमी समजावून सांगायचा प्रयत्न करायचो. +
म्हणून मग पब्लिकला समक्ष भेटणं, जमेल तश्या छोट्या मीटिंग्ज घेणं सुरु केलं.
त्याकाळी मी एक लॉजिक नेहेमी समजावून सांगायचा प्रयत्न करायचो. +
समाजात १०० लोक असतील तर ५ लोक पॉलिटिकल मोटिव्ह ठेऊन काहीतरी बरळतात, आणखी १०-१५ लोक त्याला भुलून वा आपापल्या कारणांमुळे त्यांची री ओढतात. पण उर्वरित ८०% लोक आहेत तसे जगत रहातात. +
आपल्या शाळा कॉलेजमध्ये एकमेकांना मदत करताना आपण जातीचा विचार करत नाही. होस्टेलवर रहाताना रात्री अपरात्री कुणी आजारी पडलं तर मदत करताना तो जय भीम वाला आहे की जय जिग्नेश वाला...याकडे कुणी बघतही नाही. हॉटेलवर जेवताना समोरच्या टेबलवर कोण आहे, हा स्वयंपाक करणारा कोणत्या जातीचा आहे, +
आपण बसमध्ये बसल्यावर बाजूला कोण आहे - ड्रॉयव्हर कंडक्टर कोण आहेत...आपल्याला काहीही फरक पडत नाही.
या सगळ्यामागचा मुद्दा इतकाच की - हो, जातीय विद्वेष करणारे विकृत आहेतच - पण - "सगळे आपल्याला मारायला उठलेत! आपलं आता काही खरं नाही!" - अशी भीती कुणालाच - ब्राह्मणच नव्हे, +
या सगळ्यामागचा मुद्दा इतकाच की - हो, जातीय विद्वेष करणारे विकृत आहेतच - पण - "सगळे आपल्याला मारायला उठलेत! आपलं आता काही खरं नाही!" - अशी भीती कुणालाच - ब्राह्मणच नव्हे, +
कुणालाच वाटावी अशी परिस्थिती अजिबातच नाहीये...कधीच नसते.
एकदा हे लक्षात आलं की फडणवीस म्हणाले ते - "जातीचा अभिमान नको - कर्तृत्वाचा हवा" हे नीट समजायला, पटायला लागतं. +
एकदा हे लक्षात आलं की फडणवीस म्हणाले ते - "जातीचा अभिमान नको - कर्तृत्वाचा हवा" हे नीट समजायला, पटायला लागतं. +
जात व्यवस्था कशी उगम पावली, कुणी जन्माला घातली वगैरे ऐतिहासिक तथ्य एकाबाजूला - आज मात्र जात ही एक एक्स्टेंडेड लूज फॅमिली सारखी झाली आहे. बाय चान्स, बाय शिअर लक आपण अमुक एका जातीत जन्मतो.
बायचान्स मिळालेल्या - ज्यात आपलं स्वतःचा काहीही रोल नाही - गोष्टीचा अभिमान काय बाळगायचा?! +
बायचान्स मिळालेल्या - ज्यात आपलं स्वतःचा काहीही रोल नाही - गोष्टीचा अभिमान काय बाळगायचा?! +
हां - धन्यता जरूर बाळगू शकता.
प्रत्येक जातीचे काही विशिष्ट वैशिष्ट्य आहेत. म्हणजे, मारवाडी घरात जन्मलेल्या मुलांना धंदा, मनी मॅनेजमेंट वेगळं शिकवावं लागत नाही (अगेन...हे ही एक स्टिरिओटाइपिंगच आहे...!)...म्हणून मारवाडी तरुणाने +
प्रत्येक जातीचे काही विशिष्ट वैशिष्ट्य आहेत. म्हणजे, मारवाडी घरात जन्मलेल्या मुलांना धंदा, मनी मॅनेजमेंट वेगळं शिकवावं लागत नाही (अगेन...हे ही एक स्टिरिओटाइपिंगच आहे...!)...म्हणून मारवाडी तरुणाने +
"बरं झालं यार मी मारवाडी झालो!" हा विचार करणं ठीकच आहे. या भावनेत अभिमान नाही, धन्यता आहे. बीईंग थँकफुल इज फाईन. बीईंग प्राऊड इज वियर्ड अँड रॉंग. +
(बाय द वे, बाय चान्स जन्म लॉजिक धर्म आणि देशालासुद्धा लागू आहेच! फक्त धर्म म्हटलं व्याप्ती कितीतरी वाढते. देश म्हटलं की आपण एका मोठ्या यंत्रणेचे लाभार्थी होतो. विविध सिस्टिम्समुळे आपलं जगणं सुसह्य-असह्य होत रहातं. भारतासारख्या देशात धर्म आणि देश अनेकांसाठी एकच होऊन गेलाय! +
म्हणून मग राष्ट्रप्रेम, राष्ट्रनिष्ठा वगैरे संकल्पनांचं महत्व टिकून रहातं. जातीत हे सगळं - एक्स्टेंडेड फॅमिली सारखं असतं. असो.)
"मी अमुक जातीत बाय चान्स जन्मलो, वर्तमान सोशल स्ट्रक्चरमुळे या जातीत जन्मल्याचे काही फायदे मला विनासायास लाभले...त्यामुळे आय फील लकी!" या भावनेत +
"मी अमुक जातीत बाय चान्स जन्मलो, वर्तमान सोशल स्ट्रक्चरमुळे या जातीत जन्मल्याचे काही फायदे मला विनासायास लाभले...त्यामुळे आय फील लकी!" या भावनेत +
काही वावगं नाही. "मी अमुक जातीत जमलो, त्याचा मला अभिमान वाटतो!" हे म्हणणं चूक आहे. कारण हा अभिमान एकाबाजूने नसतो. "माझी जात ग्रेट आहे" असं म्हटलं की "इतर जाती ग्रेट नाहीत" हा अर्थ येतोच. +
पण हे असं सांगितलं की प्रत्येकालाच टोचतं. बोचतं. कारण जातीची ओळख आजही "आवश्यक" वाटते आपल्याला. या जात आवश्यक वाटण्यामागे इनसेक्युरिटीची भावना आहे. "दुसरे एकत्र आहेत, ते मला ओव्हरपावर करू शकतात, म्हणून आम्हीपण एकत्र रहायला हवं" ही ती इनसेक्युरिटी. +
ही असुरक्षिततेची भावना फक्त लॉबिंग पुरती नाही. ही असुरक्षितता त्यापुढे जाते...आपल्या अस्तित्वाच्या मुळाशी येते...मग गडबड होते.
म्हणूनच ते ५-१५-८०% वास्तव समजून घेणं आवश्यक आहे. +
म्हणूनच ते ५-१५-८०% वास्तव समजून घेणं आवश्यक आहे. +
त्या २-३ वर्षांत मी अनेकांना हे समजावून सांगत राहिलो. जमेल तितक्या तरुणांमधील जातीय अंगार जमेल तितका शांत करत राहिलो. त्याकाळी मित्र झालेले सर्वजण आज फेसबुकवर भेटत राहतातच. मस्त जगत आहेत. सेटल झालेत. +
पुढे मी डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सवर ऑन ग्राऊंड काम सुरु केलं आणि हे सगळं मागे पडलं. पण त्या काळात बरंच काही शिकून गेलो.
जात - हे आपल्या समाजरचनेचं वास्तव आहे. पुरोगामीत्वची झूल पांघरून "मी जात नाकारतो" असं म्हणणं कूल आहे. म्हणायला हरकत नाही. पण त्याने जातीय विखार थांबणार नाही. +
जात - हे आपल्या समाजरचनेचं वास्तव आहे. पुरोगामीत्वची झूल पांघरून "मी जात नाकारतो" असं म्हणणं कूल आहे. म्हणायला हरकत नाही. पण त्याने जातीय विखार थांबणार नाही. +
जातीय अस्मिता डायल्युट करत करत पुढे सरकावं लागेल. आणि त्या आपल्या आपणच कराव्या लागतील.
मॉडरेट ब्राह्मणांनी इतर ब्राह्मणांना समजावून सांगावं लागेल. मॉडरेट मराठ्यांनी इतर मराठ्यांना. सर्वच जातीत हेच घडवत रहावं लागेल. +
मॉडरेट ब्राह्मणांनी इतर ब्राह्मणांना समजावून सांगावं लागेल. मॉडरेट मराठ्यांनी इतर मराठ्यांना. सर्वच जातीत हेच घडवत रहावं लागेल. +
देवेंद्र फडणवीसांसारखं प्रत्येक नेता जर हेच - "जातीचा अभिमान मानण्याचे दिवस गेले, कर्तृत्वाचा अभिमान मानावा!" - असं उघडपणे बोलायला लागला - तर ते एक पुढचं पाऊल असेल.
: ओंकार दाभाडकर
d.omkar1@gmail.com
@threadreaderapp please unroll.
: ओंकार दाभाडकर
d.omkar1@gmail.com
@threadreaderapp please unroll.