Fair and lovely.
शालेय जीवनापासून जेव्हा समज आली तिथं पासून ह्या क्रीम विषयी ऐकत होतो. सावळा रंग गोरा करून देते म्हणून सर्व प्रकारची मुले मुली , कॉलेज वयीन मुली, स्त्रिया आणि पुरुष सुद्धा हीच क्रीम वापरत होते. म्हणजे गोरे असणे म्हणजे काहीतरी विशेष असणे असा समज समाजात दृढ पने
मांडला जात होता. आणि मग अश्या फेअरनेस क्रीम ची मार्केट मध्ये बोलबाला सुरू झाला. हिंदुस्तान युनिलिव्हर सारखा मोठा ब्रँड ह्या क्रीम चा निर्माता होता. एखादी व्यक्ती काळी किंवा सावळी असणे म्हणजे तिने जन्माला येवुन फार मोठी किंमत मोजली असा पगडा समाज मनावर अगोदर पासून होताच त्यात अशी
क्रीम बाजारात उच्छाद मांडत होती , आणि मग सावळे असणे हे न्यूनगंड निर्माण करत होते. गोरी बायकोचं हवी , किंवा मग सावळी मुलगी गोरी झाल्यावर तिला मुलगा पसंद करतो, तिला नोकरी लागते, अशा भयंकर चीड आणणाऱ्या जाहिराती वारंवार टीव्ही माध्यमांवर दाखवले जात होते. पण म्हणतात ना काही गोष्टी
फार काळ टिकू शकत नाही. त्यातूनच मग संपूर्ण जगातून ह्या गोष्टींचा विरोध होवू लागला. आणि मोठे मोठे ब्रँड सुद्धा अडचणीत येवू लागले. यूरोप आणि अमेरिकेत तर "ब्लॅक लाईव्ह स मॅटर "अशी कँपैंन सुरू झाली. रंग माझा वेगळा तरी मी तुमच्यातला अशी भाषा सारे जग बोलू लागले. कारण खरे रूप , खरं
सौंदर्य चेहरा नसून , तो तुमचे कर्म आहे. त्यामुळे सावळा किंवा काळा रंग तुमचे किंवा कोणाचेच सौंदर्याचे परिमाण नाही ठरवू शकत. अखेर हिंदुस्तान युनिलिव्हर ह्यांनी दोन दिवसापूर्वी फेअर आणि लव्हली मधला , फेअर हा शब्दच काढून टाकणार आहोत अशी महत्वपूर्ण घोषणा केली. ही खऱ्या अर्थाने ,
एकतेची ,समानतेची नांदी आहे आणि स्त्री किंवा पुरुष हे रंगा मुळे कधीच नाकारले जाणार माहित अशी आशा करून फेअर अँन्ड लव्हली चा कित्तेक वर्षाचा जुनाट परंपरेला विसर्जित करण्याची घडी अखेर समीप आली आहे.
रंग माझा वेगळा
तरी मी तुमच्यातला.
✌️🙏🙏🙏
You can follow @dreamzunite.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: