आज एका लेखकाने ब्रिस्ट फिंडीगबद्दल चर्चा घडवून आणलीय. आधी एक ट्विट केला नंतर काही तासांनी याला टेबलवर चप्पल ठेवल्याच कारण दिलं. याला सोशल Experiment चे नाव दिले. म्हणे महिलांना लोक अजूनही कप्प्यात ठेवतात. लोकांच्या मानसिकतेवर महाशय बोलत आहेत.
मी काही मुद्दे मांडतोय... #ब्रिस्ट
मी काही मुद्दे मांडतोय... #ब्रिस्ट
ब्रिस्ट फिंडीग हा भारतात अतिशय संवेदनशील विषय समजला जातो मुळात ही अगदी सामान्य गोष्ट आहे. ममत्व भावाने न पाहता शास्त्रीय पद्धतीने पाहिलं तरी ब्रिस्ट फिंडीग बद्दल इतका गवगवा करण्याची गरज नाही. प्रत्येक स्री आणि बालकाचा तो मूलभूत अधिकार आहे.
त्याने तो कुठे आणि कसे वापरायचा हे ठरवणारा समाज कोण? स्रीला शरीराच्या अंगापर्यंत मर्यादित ठेवणारा हा कसला आदर्श समाज? ब्रिस्ट फिंडीग नंतरचा विषय राहिला जर एखाद्या स्त्रीला Puberty वेळी ब्रिस्टची योग्य वाढ न झाल्यास क्षणोक्षणी नावे ठेवणारा हाच तो समाज..
ब्रिस्टकडे महिलांच्या शरीराच्या एखाद्या अवयवापेक्षा जास्त मानसन्मान किंवा स्त्री होण्याची लिगल प्रूफ म्हणूनच पाहिलं जातं. जेव्हा Marriage ची वेळ येते तेव्हा ब्रिस्टच्या आकारावरून महिलांना Character certificate दिले जातात. ब्रिस्टबद्दल शालेय जीवनात मुलांकडून उडणाऱ्या खिल्लीला
अगदी Normalize करून टाकलं जातं. ब्रिस्टकडे फक्त आणि फक्त उपभोगाचं साधन म्हणून पाहिलं जातं. समजा, एखाद्या स्त्रीला ब्रिस्ट कॅन्सरमुळे ब्रिस्ट काढून टाकण्याचा निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा किती गवगवा केला जातो हे सगळ्यांना ठाऊक आहे. जणू ब्रिस्ट नसलेली महिला महिला नसतेच असा तो आव!
जर अशा संकुचित वातावरणात एखाद्या स्रीने पब्लिक मध्ये आपल्या बालकाला ब्रिस्ट फिड करायचं ठरवलं तर लगेच पुरूषी मानसिकता असणाऱ्या लोकांची तोंडे बारा दिशांनी फिरून त्या बाईच्या छातीकडे येते. अरे आमचं काय चुकं? तिनंच बाहेर प्रदर्शन करायचं ठरवलं तर आम्ही काय करणार?
हे प्रश्न अगदी नॉर्मल आहेत. महिलांना सगळ्यात जास्त ब्रिस्ट Cancer ला सामोरे जावे लागते पण समाजातील प्रेशरमुळे ती बहुतांश वेळा ब्रिस्ट न काढण्याचा निर्णय घेते. कारण अशाने सेक्स लाईफ खराब होते म्हणे.
त्यामुळे Death योग्य पणं ब्रिस्ट काढणं नकोच असा विचार घट्ट बनला जातो.
त्यामुळे Death योग्य पणं ब्रिस्ट काढणं नकोच असा विचार घट्ट बनला जातो.
ब्रिस्ट हा विषय पौरूषी समाजाने इतका मानपानाचा करून ठेवलाय की तिला ममत्व भाव काय असतो हेही विसरायला भाग पाडलेय. लहान मुलाला कुठे दूध पाजवायचं हे ठरण्याचा अधिकार फक्त आणि फक्त आईला आहे. पौरूषी समाजाला आपल्या स्त्रीने कुठेही आपल्या खाजगी मालकीची संपत्तीचे प्रदर्शन करू नये असचं वाटतं
वैवाहिक पुरुष स्रीच्या शरीरावर आपला मालकी हक्क सांगतो. आपल्या खाजगी property ने आपलं शील एका रुमपर्यंत मर्यादित ठेवावं याची अपेक्षा तो करतो, कारण शतकानुशतके या समाजात स्त्रीला तुच्छ मानलंय. तिचं शरीर तर फक्त Use & Throw करण्यासाठी आहे हे लोकांच्या मनात रूजण्यामागे ही लहानलहान
कारणं कारणीभूत आहेत. पण स्त्रीच्या मूलभूत गरजा काय असतात याची कधीही विचारणा न करणारा समाज तिच्या कडून अशी अपेक्षा करतो. ब्रिस्ट हा खरंतर विषयचं नाही पौरूषी मानसिकता हा खरा विषय आहे.
ऑस्ट्रेलिया मध्ये अनेक महिला सिनेटर्सनी याविरुद्ध आवाज उठवला, आपल्या अधिकारांची मागणी केली.
ऑस्ट्रेलिया मध्ये अनेक महिला सिनेटर्सनी याविरुद्ध आवाज उठवला, आपल्या अधिकारांची मागणी केली.
संसदेला शेवटी कायदे बदलायला भाग पाडलं, भाषण करताना ब्रिस्ट फिंडीग करून इतिहास घडवला. असे अनेक युध्द स्रीला क्षणोक्षणी लढावे लागतात.
आता तुम्ही मला सांगा स्रीला कप्प्यात ठेवणारा कोण आहे? ब्रिस्ट फिंडीग हा विषय सकारात्मक मार्गाने समोर आणता आला असता.
आता तुम्ही मला सांगा स्रीला कप्प्यात ठेवणारा कोण आहे? ब्रिस्ट फिंडीग हा विषय सकारात्मक मार्गाने समोर आणता आला असता.
पण हा महाशयांनी ते न करता एका चप्पलेचे उदाहरण देत सोशल प्रयोगाच्या नावाने तिला पुन्हा एका कप्प्यात आणून ठेवलंय. त्याने केलेल्या ट्विट वरून ब्रिस्ट फिंडीग अजूनही फार मोठी गोष्ट आहे हे सिद्ध होते.
तुम्हाला एखाद्या विषयावर चर्चा घडवायची असेल तर ती खुल्यापणाने घडवा.
तुम्हाला एखाद्या विषयावर चर्चा घडवायची असेल तर ती खुल्यापणाने घडवा.
दुसऱ्या विषयांच्या नावाने एखाद्या महत्त्वाच्या विषयावर ट्रोलिंग घडवून पब्लिसिटी मिळवण्याचा प्रयत्न करू नका. या स्त्रीने फार भोगलयं तिच्या अधिकारांवर बोलायचे असल्यास थेट बोला.
#ब्रिस्ट
_________________
प्रथमेश
#ब्रिस्ट
_________________
