राहुल गांधी..
नाव वाचल्या बरोबर चेहऱ्यावर हसू किंवा एखादा मजेदार meme किंवा व्हिडिओ आठवला असेलच. मागच्या जवळपास १० वर्षांपासून या माणसाची प्रतिमा कशी एक पप्पू , मंदबुद्धी,नेतृत्वहीन अशी व्यवस्थित पणे तयार केली गेली याचाच तो परिणाम.
खरेतर मनुष्याने कोठे जन्म घ्यावा हे त्याच्या क्षमता आणि इच्छा दोन्हींच्या पलीकडचे.गांधी घराण्याला ४-५ पिढ्यांपासून लाभलेला राजकीय वारसा आणि अश्या वातावरणात राहुन राजकारणात करिअर करायचं म्हटल्यास त्याचा थोडेफार फायदा होणारच.आई वडिलांच्या व्यवसायाचा फायदा त्यांच्या मुलांना होणार
हे तुमच्या आमच्या वैयक्तिक आयुष्यातही तेवढच खरे. पण त्याने कधी माझ्या परिवारा कडे पाहून मला मते द्या असं म्हटल्याचे आठवत नाही.
कल्पना करा की सकाळी तुम्ही उठलाय आणि प्रसार माध्यमा वरती तुमच्या वर जोक तयार. आला ना राग.हा माणसासोबत हे मागचे १० वर्ष झाले होतय. वैयक्तिक स्तरापर्यांत
ठीक पण त्याच्या आईला बार डान्सर, खुद्द प्रधानमंत्री कडून विधवा अश्या शब्दात हिणवले जाते. तरी हा माणूस शांत आणि चेहऱ्यावर स्मित हास्य. फिरोझ गांधी हे इंदिरा गांधी यांचे पती आणि राहुलचे आजोबा. पण ते राहुल गांधींचं आजोबा असताना मुस्लिम होतात तर वरून गांधीचे आजोबा असताना पारशी असतात
राहुलच्या भाषणाचा छोटासा भाग तोडायच ती एडिट करायचं आणि समजा मध्मावर पसरवयाचा यासाठी एक भलीमोठी टीमच आहे.मान्य आहे की मोदिंसारखी भाषण कला राहुल कडे नाही पण तो जाहीर सभेत खोटे बोलत नाही, इतिहास तोडून मोडून त्याचा विपर्यास करत नाही, दुसऱ्यांच्या आई चा अपमान करत नाही.
आपल्या स्वर्गीय पिता ,आजीच्या नावावर मते मागत नाही, तो हिंदू मुस्लिम या मुद्द्यावर वर मते मागत नाही.
राहुल गांधी हा पंतप्रधान पदाचा दावेदार आहे जी नाही हा राजकिय प्रश्न पण येवढे मात्र खरे की तो एक प्रामाणिक आणि आपण समजतो त्यापेक्षा खूप हुशार नेता आहे.
ताजेच उदाहरण द्यायचे झाल्यास 'करोना चे संकट हे मोठं आणि भयंकर असेल त्यासाठी सरकारने आत्ताच येत्या ती पावले उचलली पाहिजेत.'असे राहुल ने १२ Feb म्हणजे भारत सरकारच्या ४१ दिवस अगोदर सागितले होते.तेंव्हा बीजेपीच्या मोठ्या मोठ्या नेत्यांनी त्याची खिल्ली उडविली होती.करोना काळानंतर खूप
मोठ्या आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागेल त्यासाठी सरकारने उद्योगांना संरक्षण देण्याची गरज बोलावून दाखवली. तसेच या काळात नोबेल पुरस्कारप्राप्त अर्थशास्त्र अभिजित बॅनर्जी, रघुराम राजन याच्य सोबत आर्थिक गाडी कशी रुळावर येईल याबाबत चर्चा केली. हे सर्व mature राजकारणा ची लक्षणे.
माणसाने आपले आदर्श हे सत्याच्या कसोटीवर वेळोवेळी तपासून पाहिले पाहिजेत.एकच माणसाला राजकारणातील सर्वेसर्वा माणून तो म्हणेल तीच पूर्व दिशा असे मनाने म्हणजे निसर्गाने दिलेल्या बुध्दीचा अपमानच.
@RahulGandhi
#HappyBirthdayRahulGandhiJi
#HappyBirthdayRahulGandhi
#म
#मराठी
You can follow @im_omps.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: