📌📌📌

खंबीर पण परिस्थिती गंभीर! (भाग २)

आज शिवसेनेचा वर्धापनदिन आणि मी माझ्या लेखाचा भाग २ ट्विट करतोय हा निव्वळ योगायोग. काल २-३ जणांनी डीएममध्ये त्याबाबत सांगितले. बाळासाहेबांच्या भाषणांनी भारून शिवसेना रुजवणारे, वाढवणारे अनेक 'वडील' तुमच्याआमच्या घरी असतील. (१/२३)
आपण त्यांना बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक म्हणतो. बाळासाहेबांनी शिवसेना स्थापिली. या सेनेनं कोणी नसताना मराठी माणसाचा आवाज भक्कमपणे उभा केला हे सत्य नाकारता येणार नाही. 'किंबहुना' ते कोणी नाकारू नये. मात्र कुठलाही राजकीय पक्ष हा शेवटी स्वतःला वाढवत असतो. मागील (२/२३)
३० वर्षांपासून शिवसेना मुंबई पालिकेत आहे. आणि मुंबईला यांनी कशा पद्धतीने नासवली हे स्वतः पाहिल्याने हा 'थ्रेड'प्रपंच! राग शिवसेनेचा नाही. कधीच नव्हता. शिवसेनेच्या बदलत्या नेतृत्वामुळे मुंबईची झालेली दैना, मूळ मराठी माणूस मुंबईबाहेर फेकला जाणे (यामागे मराठी माणसाची (३/२३)
मानसिकता देखील काही प्रमाणात कारणीभूत आहे), शिवसेनेची स्वतःची व्होटबँक असताना 'हिंदीमय' होऊन जाणं (अरविंद सावंतांचा व्हिडीओ ऐकलं असालच) आणि अशी असंख्य कारणं..

त्यामुळे या थ्रेडमध्ये पालिकेचा पर्यायाने सत्ताधाऱ्यांचा षंडपणा तितका दाखवायचा आहे हे लक्षात घ्यायला हवे (४/२३)
प्रत्येक शिवसैनिकाने मनापासून हे दोन्ही भाग वाचावेत. चिंतन करावं. पक्षप्रेम म्हणून मतदान तिथेच करावं. मात्र सत्य परिस्थितीत काय, आपणही अशा धोरणांमुळे बाहेर फेकलो जाऊ शकतो याचा विचार करावा. शिक्षक पेशा असलेले तसेच स्तंभलेखक असलेले माझे मित्र म्हणतात, माझे वडील स्वतः (५/२३)
शिवसैनिक! एकेकाळी तिकीट मिळणार होते मात्र जॉब सोडता येणार नसल्याने तिकीट नाकारलं. पुढे ते काय म्हणतात हे फोटोमध्ये जोडतो आहे... तोवर शिवसेनेला वर्धापनदिनाच्या शुभेच्छा देत 'धागा धागा खोलतो नवा..' (टीप: शाळेत असताना वाढदिवस असलेल्या मुलाला शिक्षक ओरडत नसत. बाकी तुम्ही (६/२३)
समजून घ्या..)

झोपडपट्टी : मुंबईतही झोपडपट्टी माफियागिरीला फार वर्षांचा इतिहास आहे. तितक्या मागे मला जायचे नाही. मात्र या फोटोमध्ये दिसणारी ही (विक्रोळी कन्नमवारनगर) झोपडपट्टी अचानक कोणाच्या वरदहस्ताने वाढली आहे. मुंबईला महापुरांपासून वाचवणाऱ्या खारफुटी साफ करून हा (७/२३)
धिंगाणा घालण्यात आला आहे. का? ही कत्तल दिसते तितकी साधी नाही. एक अख्खी धारावी उभी राहतेय विक्रोळीच्या गर्भात. याच्या खोलात जायचे झाल्यास, या कांदळवानाच्या जागा महसूल विभाग, एमएमआरडीए तर काही भाग खासगी आहेत. मुंबईतील उरलेली कांदळवने टिकवण्यासाठी अतिक्रमणविरोधी कारवाई (८/२३)
गरजेची आहे. मात्र यातील जमीन महसूल विभागाच्या ताब्यात असल्याने कारवाईमध्ये अडचणी निर्माण होतात, असे सांगण्यात येते. मुंबई आणि मुंबई परिसर मिळून महसूल विभागाकडे १२ हजार हेक्टरपेक्षा अधिक जमीन आहे. मात्र हस्तांतरामुळे अनके प्रश्न प्रलंबित आहेत.

दहिसर-बोरिवलीमधील गणपत (९/२३)
पाटीलनगर ही झोपडपट्टी कांदळवनावर वसलेली असून यातील काही भाग कांदळवनाकडे आहे, काही भाग महसूल तर काही भाग खासगी आहे. या कांदळवनांना मोकळा श्वास घेता यावा यासाठी नोटीस बजावण्यात आल्या कळते आहे. यासंदर्भातही कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. यासोबतच चारकोप येथील काही (१०/२३)
जागाही महसूलच्या ताब्यात असून, या जागेवरही अतिक्रमण आहे. बीकेसीमधील, वडाळ्यामधील काही जागा 'एमएमआरडीए'कडे आहे, तर विक्रोळीच्या कन्नमवारनगर येथील जागा महसूल विभागाकडे आहे. या सर्व जागा कांदळवनाच्या ताब्यात आल्या तर येथे कारवाई करणे अधिक सोपे जाणार आहे. मात्र (११/२३)
प्रशासनाची उदासीनता इतकी वाढलीय की नव्या झोपडपट्ट्या जन्म घेतायत आणि दलालसुद्धा.. आता मुंबईची जबाबदारी पेलणाऱ्या पालिकेने जातीने या विषयात हात घालून, आपले अधिकार वापरून, राज्य सरकारला आवाहन करून हा मुद्दा मार्गी लावणे आत्यंतिक गरजेचे आहे. मात्र तसे केले जात नाही. उद्या (१२/२३)
अशा झोपडपट्ट्या पुनर्विकासाच्या नावाखाली पोटात घातल्या जाणार. याबाबत कुठलाही लोकप्रतिनिधी बोलण्यास तयार नाही ही शोकांतिका आहे.

रस्ते : यावर आम्ही-तुम्ही काही बोलावे असं वातावरण पालिकेने ठेवलंय? एकीकडे मुंबईला मायानगरी, स्वप्ननगरी वगैरे उपमा देताना तिला (१३/२३)
'तुंबई' करण्याचे श्रेय यांचेच. त्यांनी ते धाडसाने 'करून दाखवलं'! इतक्या वर्षात आपण मुंबईला चांगले रस्ते देऊ शकत नाही. मान्य आहे मुंबईची भौगोलिक परिस्थिती त्यात अडचणी आणत असेल. मग परदेशात अभ्यास दौरे जाहीर करता ते काय झक मारायला? तिथे जाऊन आमचे लोकप्रतिनिधी गोट्या (१४/२३)
खेळतात का? बरं परदेश दुस्र्यात जात नसाल मात्र अभ्यास वगैरे नावाची काही पद्धत? आज इतके वर्ष आपण मुंबईची 'तुंबई' मात्र तिने आमचा खजिना तुंबडी भरून दिलाय. तिच्यासाठी नवे तंत्रज्ञान आपण आणू शकत नाही? एकट्या एमएमआरडीएकडून तब्बल ४ कोटी ८४ लाख ६५ हजार ७१८ रुपये खर्च (१५/२३)
करून पूर्व व पश्चिम महामार्गांवर पावसात पडणारे खड्डे तत्काळ बुजवण्यासाठी कंत्राटदार नेमण्यात येणार आहे. मान्सूनपूर्व डागडुजीचे खर्च वेगळा. यावरून पालिकेच्या 'कोट्यवधी' आकडेवारीचा अंदाज आपण लावू शकतोच नाही का?

यंदाच्या पावसाळ्यापूर्वी ४५ ठिकाणे पूरमुक्त केली जाणार (१६/२३)
असली, तरी २४ ठिकाणी पाणी तुंबण्याची शक्यता कायम आहे. अतिवृष्टीत मुंबईला पूरमुक्त करण्याच्यादृष्टीने पालिकेने नियोजन करून कामे हाती घेतली आहेत. गेल्या दोन वर्षांमध्ये २७३ ठिकाणांमधील २०४ ठिकाणे पूरमुक्त केली आहेत. त्यात यंदाच्या पावसाळ्यापूर्वी अधिक ४५ ठिकाणे पूरमुक्त (१७/२३)
केली जाणार आहे. मात्र, उर्वरित २४ ठिकाणांची कामे पुढील एक - दीड वर्षांत पूर्ण होणे कठीण असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

त्यामुळे यंदाही त्या ठिकाणी पाणी तुंबण्याच्या समस्येला मुंबईकरांना सामोरे जावे लागणार आहे. मुंबईत थोड्या पावसांतही अनेक ठिकाणी रहिवाशांना पाणी (१८/२३)
तुंबण्याच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. पाणी तुंबण्याच्या या दरवर्षीच्या कटकटीतून मुंबईकरांची सुटका करण्याच्यादृष्टीने पावले उचलली आहेत. त्यामुळे गेल्या दोन वर्षांमध्ये पाणी साचणार्यास २७३ ठिकाणांमधील २०४ ठिकाणे कमी झाली असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. यंदा (१९/२३)
पावसाळ्याआधी ४५ ठिकाणे पूरमुक्त करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहेत. मात्र हिंदमाता, लोअर परळ, महालक्ष्मी, अंधेरी, वरळी, दादर टीटी, परळ आदी महत्त्वाच्या २४ ठिकाणांची कामे पुढील एक ते दीड वर्षात पूर्ण होणे अशक्य आहे. याचा अर्थ पालिका काहीच काम करत नाही असं नाही. (२०/२३)
मात्र ते प्रयत्न दरवर्षीच तोकडे पडताना दिसतात. त्यावर सार्वकालीन तोडगा काढण्याचं आव्हान पालिकेवर आहे.

लोकल : कभी कभी लागत है की अपूनीच 'गुरंढोरं' है! हा फील जर लोकलमधील प्रवाशाला येत नसेल तर तो इथे कुठेतरी दक्षिण मुंबईत राहणारा आहे. आज आमचा मराठी माणूस कमी पैशात (२१/२३)
फ्लॅट मिळाला म्हणून तिथे कल्याणपलीकडे गेला. मात्र आज तोच वाचवू म्हणून तिकडे रूम घेण्यात केलेला खर्च प्रवासखर्चाच्या रूपाने पुन्हा फिरून आपल्याकडे येऊन आपण 'फ्लॅट' झालोय याची त्याला कल्पना नाही. लोकल हा वैश्विक मुद्दा आहे. त्यामुळे त्यावर अजून काय ते लिहावे? (२२/२३)
तूर्तास इथेच थांबतो. अजून बहोत काही लिहिणे.
मुद्रा योजना थ्रेडनंतर मुख्यमंत्री रोजगार कार्यक्रमाबद्दल लिहायचंय. नवतरुणांना व्यवसायासाठी त्याचा कसा फायदा करून घेता येईल याबद्दल...
धन्यवाद!
(२३/२३)
You can follow @RaneSays.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: