# पावसाचा थेंब #
गेल्या काही दिवसात देवेन्द्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीने आर्थिक आघाडीवर ठाकरे सरकारला प्रश्न विचारून भंबेरी उडवली.त्याला उत्तर देण्यासाठी सेनेचे अनिल परब ह्यांनी लगेच घाईघाईत लगेच सांगून टाकलं की उद्या आम्ही ह्यावर सविस्तर म्हणजे अभ्यास करून उत्तर देणार
दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद झाली 3 पक्षांचे 3 नेते पत्रकार परिषदे मध्ये बसले एकाला पण नीट उत्तर देता आलं नाही.असो.
शिवसेनेकडून माझी अपेक्षाच नव्हती की सेनेतून कुणी अभ्यासपूर्ण उत्तर देईल कारण सेनेकडे एक नारायण राणे सोडले तर कधीच कुणी अभ्यासु नेता नव्हता आणि आतातर नाहीच.
नारायण राणे हे सेनेत असताना त्यांना सेनेची मुलुखमैदान तोफ म्हटलं जायचं..हा लहान चणीचा माणूस बोलायला उभा राहिला की समोरच्याची दाणादाण करून टाकायचा..मी जी काही विधानसभेत गॅलरीत बसून भाषणं पाहिली त्यात नारायण राणे ह्यांना 1 नंबर देईन.विषयाचा काटेकोरपणे अभ्यास करून ते बोलायचे.
ते गेले आणि सेनेचा अभ्यासपूर्ण आवाज गेला...उरले फक्त कर्णकर्कश ओरडणारे नेते.कोथळा,जबडा,असली भाषा बोलणारे..पण असली भाषा विरोधात असताना चालते.जेव्हा तुम्ही सत्तेत असता तेव्हा तुम्ही थोडं मवाळ होऊन लोकांना पटतील अशी विधान करावी लागतात.पण सेनेत ही संस्कृती कधीच नव्हती आणि नाही.
बरं सेनेत आताच्या घडीला बऱ्यापैकी शिकलेले नेते आहेत.पण एकाला पण फडणवीस ह्यांनी उपस्थित केलेल्या प्रत्येक मुद्द्यावर मुद्देसूद बोलता येणार नाही.ते निवडून आले काम झालं.बाकी ते डोक्याला ताप करून घेत नाहीत.हे नेते नाव ऐकलं की वाटतात वटवृक्ष असल्यासारखे पण प्रत्यक्षात हे बोन्साय आहेत
दोन्ही देसाई,परब,कदम,हे सगळे नावाचे नेते मागच्या दाराने विधानपरिषद मिळवायची बस झालं.सध्याच्या घडीला एकनाथ शिंदे हे नेते उरलेत सेनेत..ते एकमेव कुशल संघटक आहेत.बाकीचे नेते हे फक्त जागा अडवून बसलेत...त्यामुळे फडणवीस ना कुणीही उत्तर देऊ शकल नाही..
अजूनही सेनेचे नेते एवढच बोलतायत की फडणवीस आकडे फुगवून सांगतायत.बर चला मान्य करू...पण कसे हे सांगा बाबांनो..नाहीतर मग तुम्हाला प्रश्न कळला नाही किंवा तुमच्याकडे उत्तर नाहीत.मुलाखती देताय तर त्यात फडणवीस यांच्या एक एक मुद्द्यावर योग्य उत्तर द्या.बघुया जमतयं का?
त्यात हल्लीची सेना ही युवराज म्हणतील तशी चालते...ते आले आणि त्यांनी नवीन मांडणी केली...अपेक्षा होत्या लोकांना..पण कुठलं काय..त्यांचे विचार सेनेचा जो पिंड आहे किंवा सेना ज्या पायावर उभी आहे त्याच्या विरुद्ध...त्यांना सेनेला प्रोफेशनल बनवायचं असावं बहुदा...
पण आयुष्यभर कुस्ती खेळलेल्या पैलवानांना अचानक मॅटवर कुस्ती जमत नाही...आधीतर पायाला ग्रीप भेटत नाही...कुस्ती जिंकायचं राहूच दे...तरीही नुरा कुस्ती खेळून सेना सत्तेत बसली..स्वतः उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले...त्यात हा कोरोना आला...मग आता सेनेत प्रोफिशनलिझम आल्याने+
एक PR कंपनी नेमली म्हणे..आणि जाहिरातीचा भडिमार चालू झाला..मुख्यमंत्री कुटूंबप्रमुखाप्रमाणे राज्याची काळजी घेतायत...खरंतर रेस अजून चालू सुद्धा झाली नव्हती..तोवर हा पावसाचा थेंब वळवाचा पाऊस होऊन,हिंदुत्व लाथाडून,पुरोगामी वादळ घेऊन आपल्या अंगावर कोसळला+
जसे आकडे वाढत गेले तसं थोडं कमी झालं आहे...शिवसेने सारख्या पक्षाला PR ची गरज पडावी..ह्याचच मला त्या जाहिराती पाहून हसायला येत होतं.त्यात मराठी माध्यमातले झाडून सगळे पत्रकार...बॉलीवूड च वऱ्हाड..असे सगळे त्यात होते...पण एकानेही कोरोनावर च्या उपाययोजना किंवा लोकांना मदत ह्यावर+
एकदाही प्रश्न उपस्थित केला नाही..जे आजही चालू आहे...पावसाचा थेंब व्हाट्सअप्प ला कंटेंट पाठवतोय...चाललीय जाहिरात.हे सरकार लोकांच्या मदतीसाठी आहे की स्वतःची जाहिरात करण्यासाठी?...त्या फेसबुक लाईव्ह वर तर महाराष्ट्रभर विनोद तयार झाले.
लोक हसतायत सेनेवर पण सेनेन आणि सेनेच्या सैनिकांनी डोळ्यावर झापडं लावली आहेत.लोकांच्या समस्या काय आहेत हे जाणून घेण्यात रसच नाही त्यांना..भाजपाने प्रश्न विचारले की तुम्ही राजकारण करताय...अरे बाबांनो विरोधी पक्ष आहे तो त्यांचं कामच आहे सरकारला धारेवर धरण...तुमच्याकडे उत्तर नाहीत
कारण एकतर तुम्ही नीट काम करत नाही आहात किंवा मग काहीतरी लपवताय?एवढ्या शाखा आहेत..मजबूत पक्ष संघटना आहे.तिचा वापर करा...शाखाप्रमुख फक्त वास्तवमधल्या संजय दत्त सारखे 50 तोला वाल्या चेन घालून मिरवायला नाहीत.
बाळासाहेब असते तर लाथा घातल्या असत्या सर्वांना...त्यात तो लोल्या...त्याला आवरा किती बोलतो?कुणाला बोलतो?कशासाठी बोलतो?त्याच त्याला तरी कळतं का?आणि सगळे सैनिक मस्त टाळ्या वाजवतात...अरे काय चाललंय..ही बाळासाहेब ठाकरे ह्या हिंदुत्वाच्या अंगाराची सेना आहे असं मला तरी वाटत नाही.
भाजपाची जिरवण्याच्या नादात सेना पक्ष म्हणून रसातळाला चाललाय किंवा गेलाय अस मला तरी वाटतं.....तूर्तास एवढंच.😃
You can follow @patil23235.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: