मी नीट समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. मला थ्रेड लिहिणं जमत नाही. समजून घ्या.

ब्रिटिशांना इथला उन्हाळा झेपायचा नाही. म्हणून ते मार्च च्या आत सगळी सरकारी कामं आटोपून २ महिन्यांसाठी थंड हवेच्या ठिकाणी निघून जात.

त्यातून ही जून ते मार्च शैक्षणिक वर्षाची मांडणी आली.
भारत हा कृषीप्रधान देश आहे. खेड्यात राहणारा देश. इथे मान्सून महत्त्वाचा. आजही जे करोडो मजूर खेड्यातल्या घरी निघाले आहेत ते मान्सूनमध्ये शेतीचं काम मिळेल ह्या आशेने.

मान्सून जून ते ऑगस्ट असतो आपल्याकडे.

आपल्या शाळा सप्टेंबरमध्ये सुरू व्हायला हव्यात.
सप्टेंबरला सुरू झालेल्या शाळा मे महिन्यापर्यंत चालतील.

भारतात दर चार/पाच वर्षांनी दुष्काळ पडतो. सध्या या काळात मुलं घेऊन लोकं मग शहरात जातात. मार्च ते मे पर्यंत.

शाळा सुरू राहिल्या की मुलांना हक्काचा पोषण आहार देता येईल. पालकांची मुलांना जेवू घालण्याची काळजी मिटेल
दुष्काळ आलेल्या काळातही मग त्या उन्हाळ्याच्या दिवसांत मजूर गावात राहतील. शहरावर ताण वाढणार नाही. गावात मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामं हाती घेता येतील. यातून हळू हळू दुष्काळ मुक्ती कडे जाता येईल
म्हणजे पावसाळ्यात शेती, दुष्काळ असेल तेव्हा हक्काची मजुरी आणि मुलांना जेवण.

हे प्रश्न इथल्या शैक्षणिक वर्षाची मांडणी बदलली की सुटतील.

आणि 'मेकॉलेपुत्रां'च्या मांडणीचा शिक्का पण पुसला जाईल.

जरा कल्पक विचार करा.

हे संकट व्यवस्था बदलू शकतं इतकं मोठं आहे. त्याचा वापर करा.
You can follow @ameytirodkar.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: