साक्षात देवी !

पुण्यश्लोक म्हणजे ज्याने पुण्य कमावले आहे असे. हे नाव शोभते ते विरांगणा अहिल्याबाई होळकर यांनाच. अहमदनगर जवळील चौंढी गावात जन्मलेल्या या मुलीचे नाव प्रत्येक मुखी आहे. अहिल्यादेवी होळकर (३१ मे १७२५ ते १३ ऑगस्ट १७९५)
पराक्रमी सरदार मल्हारराव होळकरांनी अहिल्याबाईंची सून म्हणून केलेली निवड किती सार्थ होती हे जगाला कळले. इंदूर संस्थानाच्या या राणीवर दुःखाचे आघात झाले. मग पती निधन असो वा पुत्र निधन, त्यांनी निर्धाराने न डगमगता मराठा साम्राज्य सांभाळले. सुधारणावादी पण तरीही धर्मपरायण होत्या.
तब्बल २८ वर्षाचा त्यांचा राज्यकारभार हा जनहितासाठीच्या निर्णयाचा आदर्श.
त्या शिवभक्त. म्हणूनच राजधानी इंदूरहून महेश्वरला नेली. हाती शिवलींग घेत न्यायनिवाडा करायच्या. राणींनी मुलीसाठी वर निवडतांना अट ठेवली की जो डाकू, गुंडांचा बंदोबस्त करेल त्याला जात न बघता मुलगी देईन.
हा शब्द खरा केला. जनता निर्भय व्हावी हा त्यांचा उद्देश होता.विकासाची दूरदृष्टी राणींना होती. महेश्वरला वीणकर नेले आणि व्यवसायाला प्रोत्साहन दिले. हजारो लोकांना आजही त्यामुळे रोजगार आहे. आजही महेश्वरी साडी देशविदेशात प्रसिद्ध आहे.
त्यांनी राज्यात शेतकरी सुखी व्हावे म्हणून शेकडो विहीर.. तलाव बांधले. तिर्थक्षेत्री नदीवर घाट बांधले. मंदिरे.. धर्मशाळा बांधल्या. आज देशभर प्रत्येक तिर्थक्षेत्री अहिल्याबाईंचे कार्य आहेच. त्यांच्या धर्मशील.. उदारहृदयी कार्याने लोक त्यांना देवी संबोधत.
आजही इंदूर असो वा सुंदर नर्मदा किनाऱ्यावरचे महेश्वर.. त्यांच्या कार्याचे साक्षी आहेत. मराठा साम्राज्याच्या राणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जन्मदिनी विनम्र अभिवादन.

#अहिल्यादेवी_होल्कर_जयंती #अहिल्यादेवी_होळकर_जयंती #अहिल्याबाई_होळकर
#अहिल्यादेवी_होळकर
संदर्भ : वीरांगना अहिल्याबाई होळकर

- मल्हार @malhar4you
You can follow @malhar4you.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: