पूर्ण थ्रेड वाचून कोणताही पूर्वाग्रह मनात न ठेवता मनमोकळेपणाने व्यक्त होऊ शकता सगळेच आपले समविचारी लोक असल्यामुळे कोणीही offend वगैरे होणार नाही याची खात्री आहे...
कुठल्याही social media platform ला आपण सरळधोट पणे Cringe म्हणून शकत नाही पण प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर....
अलीकडच्या 2,3 वर्षांत Cringe गोष्टींनाच जास्त views असल्याचं दिसून येतं...ज्या देशात केवळ वेडीवाकडी तोंडं करुन BB ki vines, chanchlani vines आणि तो भडना वगैरे लोक 20M subscribers गाठतात, स्वतःच स्वतःला Intellectual influencers म्हणून घेतात, केवळ एखाद्या सिनेमाचा trailer पाहताना..
त्यावर 1,2 reactions देणे यांसारख्या महान कलाकृतींना 4,5M views भेटतात तर दुसरीकडे त्याचवेळी Vox सारख्या पूर्ण जगात पाहिल्या जाणाऱ्या बाप चॅनेल ला केवळ 7M subscribers असतात, scoopwhoop सारखं चॅनेल तर अजून 1M पण गाठू शकल नाही...दररोज youtube वर ट्रेंड करणाऱ्या व्हीडिओ ची यादी...
पाहिली तरी भारताचं उज्ज्वल भविष्य दिसून येतं.....So certainly we are not living in fair & justified digital world....

आता येऊ TikTok कडे....

Fact 1: केवळ 10,20% family timepass शी संबंधीत हस्यविनोदाचे व्हीडिओ सोडले तर बाकी TikTok चा content केवळ आणि केवळ cringe नी भरलाय ज्यात..
नेमकी काय महान कला सादर होते हे मला वाटतंय memes मूळे तुम्हां सर्वांनाच ज्ञात असेल...त्यातही अजून गंभीर म्हणजे आत्महत्या, ऍसिड अटॅक, सर्वच बाजूने कट्टर धार्मिक शेरेबाजी, शारीरिक अत्याचार वगैरे गोष्टींचा प्रचार प्रसार करण्यावर काहीच regulation नसणं आणि त्याहून महत्वाचं म्हणजे...
नेमके असेच videos app वर विशिष्ट algorithm द्वारे जास्त promote करणं हे फार गंभीर आहे. तसेच चीन सरकारच्या दबावामुळे privacy policy चा भंग वगैरे या अशा गोष्टींमुळे इंटरनेटचा काहीतरी चांगला वापर करणाऱ्या बहुतांश लोकांनी हे app कधी वापरलंही नसेल..
Fact 2 : जे लोक अचानकच carryminati च्या व्हीडिओ नंतर tiktok विरोधात ट्रेंड चालवणे, ratings कमी करणे वगैरे फालतू गोष्टी करू लागले नेमके तेच लोक त्या दिवसपर्यंत TikTok वापरणारे, ज्यांना roast केलं त्यांना follow करणारे होते हा मोठा विनोदच म्हणावा लागेल... social media वर cool....
वाटण्यासाठी मेंढरांसारखं कळपामागे धावणाऱ्या भारतीयांची ही प्रवृत्ती तशी नवी नाही...
Fact 3: झालं carryminati चा व्हीडिओ viral झाला आणि अचानक दुसऱ्या दिवसापासून एका बाजूने tiktok ला विरोध म्हणून, """केवळ आणि केवळ ज्यांना roast केलं ते मुस्लिम आहेत म्हणून द्वेषापोटी""", cool वाटावं
म्हणून, चीन वर surgical strike म्हणून😂 किंवा आपण कसे carryminati चे कट्टर चाहते आहोत म्हणून एकीकडून भक्तांचे trend सुरू झाले तर दुसरीकडून व्हीडिओ होमोफोबिया promote करतो म्हणून, ''''केवळ आणि केवळ roast झालेले हे मुस्लिम आहेत म्हणून सहानुभूती''''' वाटल्याने🙄 , व्हीडिओ मध्ये...
जास्तच शिव्या असतात म्हणून आणि एखाद्या मोठ्या "ब्लू टिक वाल्या" लिबरल व्यक्तीने ट्विट केलंय मग आपणही करायला हवं या अशा सर्व कारणांमुळे एकडूनही carry च्या विरोधात ट्रेंड सुरू झाले. या भरमसाठ झालेल्या trend मुळे पहिल्यांदाच त्याचा एखादा व्हीडिओ पाहण्याचा योग्य आला.... खरंतर हे सगळं
प्रकरण म्हणजे उगाचच चिखलात लोळून तुझे कपडे स्वच्छ की माझे यावरून मारामारी करण्यासारखं वाटत होतं....

Part 3 : ट्रेंड करणाऱ्या, यातही classism व धार्मिकता आणणाऱ्या, LGBTQ community चा शिव्यासारखा वापर करणाऱ्या भक्तांचं जाऊद्या त्यावर काही बोलणं म्हणजे गाढवापुढे गीता वाचण्यासारखं
आहे पण या सर्वांमध्ये मला पडलेले काही rational प्रश्न स्वतःला rational म्हणवणाऱ्याना विचारायचे आहेत...

1. सगळे लिबरल्स त्या दिवसपर्यंत tiktok ला cringe बोलायचे, tiktok तरुण पिढी बरबाद करतंय म्हणायचे ते अचानक tiktok ला एक app platform म्हणून समर्थन का करू लागले ??
2. जे tiktok star celebrity किंवा तथाकथित social influencers स्वतः महिलांची अंतर्वस्त्रे, कपडे, घाणेरडा मेकअप करून स्वतः च LGBTQ community व महिलांना tiktok वर चेष्टेचा विषय बनवतात, रेप सीन inact करतात त्यांनी carryminati च्या होमोफोबियाच कारण पुढे करावं आणि त्या व्यक्तीला ट्विटर
वर लिबरल्सनी भरभरून समर्थन द्यावं हे कितीपत योग्य आहे.

आता खरी बाब तर ही आहे की या थंड पडलेल्या मुद्दयावर परत परत बोलून सगळेच youtubers भरभरून views आणि subscribers चा पाऊस पाडून घेतायेत त्यात काल अनपेक्षितपणे कुणाल कामराने देखील ठराविक 2,3 पंच आणि 3,4 गोष्टींची carry ला जाणीव..
करून देणं गरजेचं होतं ते सोडलं तर पहिल्यांदाच त्याचा एखादा व्हीडिओ इतका रटाळ व अहंभाव असलेला वाटला...यात "आजा बेटा तेरे को रोस्ट सिखाये" असं बोलून काही इतके खराब lame jokes आणि त्यामध्येही स्वतःच स्वतः च्या जोक्सची केलेली वाहवा कामरा सारख्या आपल्या सर्वात लाडक्या स्टँड अप
कॉमेडियन कडून अपेक्षित नव्हतं खरंतर.... carry नुसत्याच शिव्या देण्याला जोक्स समजतो त्यामुळे एक कॉमेडियन म्हणून कामराने त्याला प्रत्युतर खरंतर एखाद्या dark standup comedy act ने द्यायला हवं होतं त्याच्या नेहमीच्या style मध्ये...

बाकी माझ्यासारख्या अनेक कधीच tiktok वापरलं नसलेल्या
लिबरल लोकांसाठी साठी ते कालही waste of time app होतं आणि आजही...ना भक्तांच्या युफोरियामुळे त्यात काही बदल झाला ना काही लिबरल्स ना अचानक त्याच्याबद्दल वाटू लागलेल्या सहानुभूतीमुळे...carry च्या व्हीडिओ मधील खटकलेले बरेच मुद्दे मांडत mensxp च्या शुभम गौर ने किंवा त्या app काही
तांत्रिक गोष्टींचा कसा गैरवापर होतो हे दाखवून देत tech burner या youtuber ने चांगल्या पद्धतीने मुद्दे मांडले पण केवळ भक्त एखाद्या व्यक्तीला समर्थन देतायेत म्हणून विरोधाला विरोध दर्शवत दुसऱ्या त्या विरोधतल्या व्यक्तीला समर्थन देणं यात काय मोठी maturity दाखवली गेली काय माहीत....
उद्या भिडे गुरुजी विरुद्ध झाकीर नाईक वाद सुरू झाला व भक्तांनी भिडेची बाजू घेतली म्हणून आम्ही झाकीर ची घेणार याला काय अर्थ आहे...

मतमतांतरे असणं हे खरंतर लिबरल असण्याचं लक्षण आहे हेच लिबरल लोक विसरत जाऊन कळत न कळत त्यांनादेखील या कळप प्रवृत्तीने ग्रासले आहे.....
You can follow @ShivrajK11.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: