सावरकरांचा माफीनामा आणि वास्तव:

“सावरकर अंदमानातच का मेले नाहीत” हे आमचे नाही; तर त्या लोकांचे म्हणणे असते, की जे सावरकरांची तथाकथित क्षमापत्रे दाखवून सावरकरांनी ५० वर्षांच्या जन्मठेपेवर असताना क्षमा का मागितली, असा प्रश्न करत असतात. त्यांच्या मनात सावरकरांनी तेथेच अंदमानात...
काळोखात मरायला हवे होते असेच असते. कारण अंदमानोत्तर सावरकर त्यांना नको असतात. अन् त्यांचा वैचारिक विरोध करण्याची त्यांची क्षमताही नसते. सावरकरांच्या तथाकथित क्षमापत्राची चर्चा आणि त्यावर टीका कानपूरच्या 'प्रताप'चे गांधीवादी संपादक गणेश शंकर विद्यार्थी यांनी १९२८ साली केली होती.
त्यामागे कोणतेही तात्त्विक कारण नव्हते. सावरकरांच्या 'सा. श्रद्धानंद'ने गणेश शंकर विद्यार्थी यांनी संपूर्ण स्वातंत्र्याच्या ठरावास केलेल्या विरोधावर खरमरीत टीका केली होती. त्या टीकेस प्रत्युत्तर म्हणून केवळ व्यक्तिगत आकसातून केलेली विद्यार्थी यांची ती टीका होती.
गंमत अशी की, त्याच्या काही महिने आधीच विद्यार्थी यांनी पाच-सहा महिन्यांचा तुरुंगवास टळावा म्हणून ब्रिटिश न्यायालयाची सपशेल माफी मागितली होती. लक्षात घ्या, केवळ काही महिन्यांचा तुरुंगवास टळावा म्हणून ज्याने साध्या तुरुंगात जाण्याआधीच क्षमा मागितली होती तो १४ वर्षे काळ्या पाण्याची
शिक्षा भोगलेल्या सावरकरांना ‘तुम्ही क्षमा का मागितली?’ म्हणून जाब विचारत होता! त्यास दस्तुरखुद्द सावरकरांनी “हुतात्मे अंदमानातच का मेले नाहीत?' या शीर्षकांतर्गत उत्तर दिले होते. जिज्ञासूंनी ते ‘गरमागरम चिवडा’ या सावरकरांच्या लेखसंग्रहात वाचावे.
आज त्याच धाटणीचे लोक सावरकरांनी मार्सेल्सहून पलायन केले म्हणून आणि त्यांनी क्षमा मागितली म्हणून सावरकरांच्या नावे गळा काढत असतात. खरे तर शत्रूच्या वेढ्यात सापडल्यानंतर किंवा शत्रूच्या तुरुंगात सापडल्यानंतर तेथून सुटण्यासाठी क्षमा मागणे, शत्रूच्या याचना करणे,
हे यच्चयावत जगात सर्वकाळी आणि सर्वांठायी सापडते. या क्षमापत्रांना क्षमापत्रे म्हणण्याचे धाडस शत्रूनेही केलेले नाही. उलट, वा क्षमापत्रांना मुत्सद्दीपणाच्या चष्म्यातून पाहिले जाते. मग ती क्षमापत्रे कृष्णाने धाडलेली असोत वा शिवाजीमहाराजांनी.
किंवा मग अगदी सावरकरांच्या काळातील काकोरीतील सत्येंद्र, रामप्रसादांची असोत! सावरकरांनी क्षमापत्राच्या धाटणीत बसतील अशी कोणतीही क्षमापत्रे पाठविली नाहीत. मात्र, ‘आपल्याला अंदमानातून सोडावे’ या अर्थीची ‘विनंतीपत्रे’ पाठवली आहित. त्यांनाच टीकाकार ‘क्षमापत्रे’ म्हणतात.
क्षणभर ती 'क्षमापत्रे'च आहेत असे गृहीत धरून काही प्रश्नांचा माग घेऊ या...

१) सावरकरांवर इंग्रजांची क्षमा मागण्याची वेळ का आली असावी?
‘सावरकरांनी इंग्रजांची क्षमा मागितली’ चा टाहो फोडणारे हे विसरतात, को क्षमा मागण्याची वेळ तेव्हाच येते, जेव्हा तुम्ही काहीतरी भयंकर आगळीक करता-
जी समोरच्याला सहन करणे अशक्य होते. सावरकरांनी इंग्रजांशी असे युद्ध आरंभिले होते, की ज्यामुळे इंग्रज जेरीस आले होते. या छुप्या युद्धाची झळ हुतात्मा मदनलालमुळे खुद्द राजधानी लंडनमध्ये त्यांना बसली होती. सावरकरांच्या कार्यकलापांना आळा बसावा म्हणून त्यांनी सावरकरांना कैद केले.
परंतु सावरकररूपी दारूगोळा भर लंडनमध्ये ठेवणे इंग्रजांना जोखमीचे वाटले म्हणून त्यांनी सावरकरांना भारतात पाठवले. स्स्त्यात मार्सेल्सला जगविख्यात उडी घेऊन फ्लायन करत सावरकरांनी आंतरराष्ट्रीय तिढा निर्माण करून ठेवला. जो निस्तरता निस्तरता इंग्रजांच्या नाकी नऊ आले.
तो प्रश्न फ्रान्सने हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात नेल्याने सावरकरांना फासावर चढविण्याच्या इंग्रजांच्या इच्छेत अडथळा आला असावा. त्यामुळे इंग्रजांनी सावरकरांना दोन जन्मठेपांची... ५० वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावली. अशी शिक्षा महात्मा गांधी, पं. नेहरू आदी तर सोडूनच द्या,
परंतु वासुदेव बळवंत यांच्यासारख्या क्रांतिकारकालाही दिलेली नव्हती. ही शिक्षाच सावरकरांचा इंग्रजांच्या लेखी असलेला गुन्हा आणि भारतीयांच्या दृष्टीने असलेली देशभक्ती अधोरेखित करते. त्यांना मिळालेली ही शिक्षाच त्यांच्या तथाकथित क्षमापत्रांना कारण होती, हे आरोपकर्ते साफ विसरतात.
२) सावरकरांनी क्षमा कोणत्या परिस्थितीत आणि का मागितली?
एखादी व्यक्ती जेव्हा क्षमा मागते तेव्हा तिने ती कोणत्या परिस्थितीत मागितली ते पाहणेही गरजेचे असते. एखाद्या संकटसमयी वा जिवावर बेतलेले असते तेव्हा कोणताही सुज्ञ माणूस क्षमा मागून शत्रूच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करीत असतो
सावरकरांचे आदर्श असलेल्या शिवरायांनी आग्र्याच्या कैदेत असताना असाच प्रयास केला होता. सावरकरांच्या बाबतीत त्यांनी क्षमा मागितली असे जरी गृहीत धरले, तरी ती लंडनच्या मुक्त वातावरणात मागितली नाही, नाशिकच्या मित्रमेळ्यात मागितली नाही, पुण्याला विदेशी कपड्यांची होळी केली
त्यावेळी मागितली नाही, स्कॉटलंड यार्डच्या पोलिसांनी लंडनला अटक केली तेव्हा धाय मोकलून रडत रडत 'मला सोडून द्या' म्हणत मागितलेली नाही. मार्सेल्सला उडी मारल्यावर व पुन्हा पकडले गेल्यावर मागितली नाही. इतकेच कशाला, न्यायालयात खटला चालू असताना मागितलेली नाही,
तर ती अंदमानच्या काळ्या पाण्यावर तुरुंगवास भोगताना मागितली आहे. ती मागण्यामागील हेतूही स्वच्छ होता; तेथून सुटावे, तुरुंगात निरर्थक वेळ घालवण्यापेक्षा बाहेर पडून जमेल तसे देशकार्य करावे. त्यासाठी इंग्रज सरकारच्या काही अटी स्वीकारल्या तरी चालणार होते.
ही बाब व्यवहार्यच होती, हे कुणीही सुजाण व्यक्ती मान्य करील.

३) शत्रुपक्षाने सावरकरांच्या क्षमापत्रावर विश्वास ठेवला का?
संकटात सापडलेला आपला शत्रू जेव्हा क्षमा मागतो, दयेची याचना करतो तेव्हा त्यावर क्षमा देणारा किती विश्वास ठेवतो, तेही पाहणे गरजेचे असते.
सावरकरांवर तथाकथित क्षमापत्रांचा हवाला देऊन सतत टीका करणारे याचा विचारच करीत नाहीत, की सावरकरांच्या या क्षमापत्रांवर इंग्रजांनी किती विश्वास ठेवला?
वस्तुस्थिती अशी आहे की, या तथाकथित क्षमापत्रांची योग्यता इंग्रज चांगलेच ओळखून होते.
म्हणूनच त्यांनी १४ वर्षे सावरकरांना अंदमानात काळ्या पाण्याच्या शिक्षेवर तुरुंगात डांबले होते. १४ वर्षांनी त्यांना तुरुंगवासातून सोडतानाही 'राजकारणात कोणत्याही प्रकार भाग घेणार नाही' या अटीवरच सोडले होते. येथे हेही ध्यानात ठेवणे गरजेचे आहे की,
हे ‘राजकारण’ म्हणजे सशस्त्र क्रांतिकार्य नव्हते, तर गांधी, नेहरू, टिळक आदी जे राजकारण करत होते तेही करण्यास सावरकरांना बंदी होती. इतकेच नव्हे, तर राजकारणावर कोणतेही भाष्य करण्यास त्यांना मनाई होती. म्हणजेच सावरकरांच्या शब्दांसही इंग्रज सरकार सावरकरांच्या शस्त्राइतकेच घाबरत होते.
बरे, ही अटघालूनही इंग्रजांची तगमग थांबेना. त्यामुळे त्यांनी सावरकरांना त्याकाळी दुर्गम असणाऱ्या रत्नागिरीसारख्या गावात तब्बल १३ वर्षे स्थानबद्धतेत म्हणजेच नजरकैदेत ठेवले. म्हणजे एकंदरीत २७ वर्षे सावरकर एक प्रकारे इंग्रजांच्या कैदेतच होते.
याचा सरळ अर्थ हाच की सावरकरांनी ज्यांना ती तथाकथित क्षमापत्रे लिहिली ते सातासमुद्रावर राज्य करणारे इंग्रज सरकार त्यांच्यावर विश्वास ठेवून फसायला अंदमानातून त्यांना सोडल्यावरही तयार नव्हते.
४) सुटका झाल्यानंतरची सावरकरांची कृती क्षमापत्रांना अनुसरून होती का?

एखाद्याने क्षमा मागितल्यावर आणि त्याला त्याबदल्यात क्षमा मिळाल्यावर त्या व्यक्तीची कृती क्षमापत्राबरुकूम होती का, याचा विचार करायचा असतो.
जर कृती क्षमापत्रानुसार राहिली, तर समजता येते की त्या व्यक्तीने क्षमा मनापासून मागितली होती.
आणि जर त्या व्यक्तीची कृती पूर्वीच्या कृतीस अनुसरून असेल तर ती क्षमा एक 'धोरण' होती असे समजायला हरकत नाही.
अंदमानोत्तर काळात सावरकर हिंदुत्वाची ध्वजा घेऊन उतरलेले होते तरी सशस्त्र क्रांतिकार्यावरील त्यांचा विश्वास कमी झालेला नव्हता, रत्नागिरीच्या स्थानबद्धतेत त्यांनी टोपणनावाने अनेक क्रांतिकारकांची जीवनचरित्रे जनतेसमोर आणली.
अनेक क्रांतिकारक त्यांना गुप्तपणे येऊन भेटत किंवा त्यांचे मोठे बंधू (ज्यांना सावरकरांबरोबरच जन्मठेपेची शिक्षा झाली होती आणि जे त्यांच्यासोबतच सुटले होते.) बाबाराव वा धाकटे बंधू नारायणराव यांच्या संपर्कात होते. ती यादी खूपच मोठी आहे.
त्यात चंद्रशेखर आझाद, बाबा पृथ्वीसिंग, भगवतीचरण व्होरा, भगतसिंग, राजगुरू आदींसारखे अग्रणी क्रांतिकारक होते. रत्नागिरीच्या स्थानबद्धतेत असताना वासुदेव बळवंत गोगटे सावरकरांना येऊन भेटून गेले होते. तेथून परतल्यानंतर काही काळातच त्यांनी मुंबईचा तत्कालीन हंगामी गव्हर्नर
अर्नेस्ट हॉटसनवर गोळ्या झाडल्या होत्या. सावरकरांना भेटल्यावर गोगटे सशस्त्र क्रांतिकारक झाले होते! सावरकरांचे नवनवे धिंग्रा, कान्हेरे तयार करण्याचे काम चालूच होते. मही व्ही. व्ही. एस. अय्यर यांच्यासारखे क्रांतिकारी सावरकरांना भेटायला येत असत.
भगतसिंगांनी सावरकरांचे 'स्वातंत्र्यसमर' प्रकाशित करून त्याच्या प्रती सावरकरांना धाडल्या होत्या. इंग्रजांना अशा गोष्टींची कुणकुण लागली की इंग्रज पोलीस अचानक छापा घालून सावरकरांच्या घराची झडती घेत. या सर्व बाबी हेच दर्शवतात, की सावरकर तदनंतरही क्रांतिकार्यात सहभागी होतेच.
१९३७ साली स्थानबद्धतेतून विनाअट सुटल्यानंतर दुसऱ्या महायुद्धाचे पडघम वाजू लागताच सावरकरांनी पुन्हा महाकालीची आराधना आरंभली... तीही सरस्वतीच्या व्यासपीठावरून! साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून 'लेखण्या मोडा व बंदुका उचला'चा क्रांतिकारी संदेश त्यांनी युवकांना दिला.
युवकांना सैन्यात भरती होण्याचे आवाहन ते करू लागले. कधी कधी भाषणाच्या ओघात ते बोलून जात... '' अरे! आमच्याकडे एक पिस्तुल सापडले म्हणून इंग्रजांनी आम्हास अंदमानला धाडले. आता तेच इंग्रज तुम्हाला बंदुका देतेय, ते शिकण्याचे वेतन देतेय, ते घ्या!
एकदा बंदुका शिकल्या की त्यांची तोंडं कोठे फिरवायची ते ठरवायला तुम्ही मोकळे!'' याच काळात 'आझाद हिंद सेने'चे संस्थापक क्रांतिकारी रासबिहारींना आठवण झाली ती सावरकरांचीच!
रासबिहारींच्या हाकेला साद देत सावरकरांनी त्यांना भेटायला आलेल्या काँग्रेसचे माजी अध्यक्ष असलेल्या
सुभाषचंद्र बोस यांना सशस्त्र क्रांतीची दीक्षा दिली आणि आझाद हिंद सेनेला नव्या दमाचा नेता मिळवून दिला. रक्ताचा एकही थेंब न सांडता ते आझाद हिंद सेनेला जाऊन मिळाले. ही मुत्सद्देगिरी नव्हे का?
या घटनेचे साक्षीदार असलेल्या जपानी लेखक ओहसावा यांनी त्यांच्या 'द टू ग्रेट इंडियन्स इन् जपान' या पुस्तकात ‘Savarkar's militarization policy in world war second began to shape...” असा सावरकरांचा स्पष्ट उल्लेख करून,
तर ब्रिटिश पंतप्रधान अँटली यांनी सावरकरांचा उल्लेख टाळून
भारतीय स्वातंत्र्यातील सावरकरांचे योगदान अधोरेखित करून ठेवले आहे. याचाच अर्थ सावरकरांचे वर्तन क्षमापत्रानुसार नव्हते, तर कृती पूर्वीच्या आपल्या कृतीस अनुसरूनच होती.
मात्र, सावरकरांच्या या कृतीकडे त्यांच्या तथाकथित क्षमापत्रात अडकलेले टीकाकार सोयीस्कररीत्या दुर्लक्ष करीत असतात.
जाताना हेही सांगणे आवश्यक आहे की, सावरकर हे राजकारणी होते. त्यांच्या राजकारणाचे सूत्र

साप विखारी देशजननीचा ये घेऊ चावा ।
अवचित गळुनि, ठकवुनि भुलवुनि कसाही ठेचावा

त्यामुळे त्यांनी क्षमा मागितली असती तरी ती शिवरायांनी औरंगजेबाला पाठविलेल्या क्षमापत्रापेक्षा खचितच वेगळी नसती.
या लेखाचे लेखक डॉ. नीरज श्याम देव असून ते मनोचिकित्सक व "दशग्रंथी सावरकर" या सन्मानपत्राने सन्मानित आहेत.)
You can follow @yatin_narayan.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: