दिनांकानुसार स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीच्या निमित्ताने...

स्वातंत्र्यवीर सावरकर लंडनला गेले, शिक्षण घेतले, वकील झाले पण वकिलाची पदवी नाही स्वीकारली. कारण ब्रिटिश सरकारने घातलेली अट. या पदवीचा उपयोग मातृभूमीसाठी करता येणार नाही.. मग काय? सावरकरांनी लाथाडली...
ज्या शिक्षणाचा उपयोग देशासाठी, धर्मासाठी होणार नसेल त्या शिक्षणाचा कागद घेऊन काय करायचं? लोणचं घालायचं???

गुणसुमने मी वेचियली या भावे
की तिने सुगंधा घ्यावे।
जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा
हा व्यर्थ भार विद्येचा।
आज देशातल्या सर्व वकिलांना स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अनुनय करण्याची गरज नाहीये का..?

आजच्या वकिलांच्या वकिलीचा उपयोग जर धर्मासाठी होणार नसेल, धर्मांधांशी लढण्याच्या विरोधात होणार नसेल, एखादी शक्ती तसा दबाव टाकून जर कोणी करू देत नसेल तर त्या वकिलीचा उपयोग तो काय??
अशावेळेस देशातल्या अश्या सर्व वकिलांनी सार्वत्रिक वकिली त्यागण्याचे, सोडण्याचे, वकिलीची पदवी सरकारला परत करण्याचे कार्य का करू नये? अन्यथा धर्मनिष्ठांचे खटले लढण्यासाठीतरी स्वतःहून पुढे यावे. एक फळी निर्माण करावी...
चुकीच्या गोष्टींचे समर्थन करण्यासाठी अवार्ड वापसी गँग निर्माण होऊ शकते तर योग्य गोष्टींचे समर्थन करण्यासाठी आपली धर्मनिष्ठ गँग तयार का होऊ शकत नाही?

क्रांतिसूर्य स्वातंत्र्यवीर सावरकरांना त्रिवार वंदन..!!

|| जय हिंदुराष्ट्र ||
You can follow @r_raktade.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: