सावरकरांनी #स्वातंत्र्यवीर हि पदवी स्वत:च स्वत:ला लावून घेतली असा प्रचार पी साईनाथ का कोणातरी कम्युनिस्टाने सुरु केला. १९२६ साली चित्रगुप्त लिखित चरित्रात त्यांनी स्वत:च स्वत:ला स्वातंत्र्यवीर म्हणवून घेतले इत्यादी काहीतरी भंपक गोष्टी सांगणारा एक विडीओ...
(१/न)
#सावरकरजयंती
..त्यांनी प्रसारीत केला आणि सगळे जमाते पुरोगामी हा मुद्दा घेऊन गोबेल्स तंत्र वापरत सावरकरांवर चिखलफेक करण्याचा त्यांचा आवडीचा खेळ करण्यात गुंग झाले.

त्यावर बाळाराव सावरकर यांनी लिहिलेल्या रत्नागिरी पर्वातला कवी वैशंपायन आणि रणदुंदुभी नाटकाचे नाटककार वामनराव जोशी यांनी...
(२/न)
...सन १९२४ च्या फेब्रुवारी मध्येच सावरकरांना स्वातंत्र्यवीर असा गौरव केला हा संदर्भ उपलब्ध आहे. आता मुळात चित्रगुप्त लिखित चरित्रातही कुठेच सावरकरांचा वीर किंवा स्वातंत्र्यवीर हा उल्लेख नाही. जो आहे तो केवळ डॉ. रविंद्र रामदास यांच्या प्रस्तावनेत आहे हा एक वेगळाच विषय आहे.
(३/न)
शिवाय चित्रगुप्त म्हणजे स्वतः सावरकर नव्हतंच तर चक्रवर्ती राजगोपालाचारी यांनी हे चरित्र लिहून प्रसिद्ध केल्याचे स्वतःच प्रकटपणे 1937 साली जाहीर केले. त्याचा उल्लेख बाळाराव सावरकरांच्या हिंदू सभा पर्व मध्ये आहे.
तसेच समाजवादी विचारवंत ग प्र प्रधान यांनीही आपल्या....
(४/न)
अभ्यासपूर्ण संदर्भ दिलेल्या पुस्तकात चित्रगुप्त म्हणजे राजगोपालाचारी असेच म्हटले आहे.

जानेवारी १९२४ ला सावरकरांची मुक्तता झाल्यावर १५ ऑगस्ट १९२४ सालीच सावरकरांचे एक संक्षिप्त चरित्र श्री. सदाशिव राजाराम रानडे यांनी लिहिले साहित्यसम्राट तात्यासाहेब उर्फ न.चिं.केळकर...
(५/न)
यांनी त्या चरित्राला प्रस्तावना लिहिली आणि त्या संपुर्ण चरित्राचे नावात आणि पानापानावर सावरकरांचा उल्लेख स्वातंत्र्यवीर असाच केला आहे. तो लिखित पुरावा असून मी पुढे देत असलेल्या स्कॅन पृष्ठांची ही पहिली आवृत्ती असून वर्धा येथील एका ग्रंथालयातून हे पुस्तक....
(६/न)
वर्ल्ड डिजिटल लायब्ररी ने डीजीटलाईज्ड केले आहे तेथुन आंतरजालावरुन मी हे पुस्तक मिळवले. savarkar . org वर सुध्दा हे पुस्तक आहे. पण ते डिजिटल नाही Text (Typed) आहे.. त्यामुळे त्यातील स्वातंत्र्यवीर उपाधीविषयी खात्री नव्हती. आता मूळ पुस्तकच स्कॅन्ड असल्याने शंकेला जागाच नाही.
(७/न)
किमान ऑगस्ट १९२४ सालीच सावरकरांना लोकांनी स्वातंत्र्यवीर ही उपाधी देऊन गौरव केला हे या पुराव्यातून सिध्द होते.
त्यानंतरही अनेक जण सावरकरांचा उल्लेख वीर/ स्वातंत्र्यवीर असा करत राहिले. असा उल्लेख करणाऱ्यांमध्ये महर्षी विठ्ठल रामजी शिंदे आणि भगतसिंग यांचाही समावेश आहे.
(८/न)
1937 च्या मे महिन्यात सावरकरांची संपूर्ण मुक्तता झाल्यावर एका सर्वपक्षीय, काँग्रेस कम्युनिस्ट सह, मुंबईत झालेल्या सभेत सावरकरांना एक मानपत्र देण्यात आले. त्यात, आपणास स्वातंत्र्यवीर ही पदवी लोकांनी दिली आहे, ती योग्यच आहे असा उल्लेख आहे. तेव्हा 1924 ते 1937 या काळातही...
(९/न)
सावरकरांना स्वातंत्र्यवीर याच पदवीने गौरवले जात होते हे सिद्ध होते.

पुढे प्र. के. अत्रे यांनी जाहीर सभेत १९३७ साली स्वातंत्र्यवीर सावरकर या पदवीचा पुनरुच्चार केला.
एखाद्या पदवीचा उच्चार केला जातो आणि जनसमुदाय ही पदवी उचलून धरतो.
(१०/न)
केवळ अत्रे यांना या पदवीचे श्रेय देणे चुकीचे असून महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील लोकांनी, थोरामोठ्यांनी सुद्धा, सावरकरांना प्रेम आणि कृतज्ञता भावाने दिलेली पदवी असाच त्याचा उल्लेख होणे आवश्यक आहे.
© चंद्रशेखर साने
(११/न)
माहितीस्रोत - चंद्रशेखर साने यांचे फेसबुक
You can follow @accountanthunbc.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: