भक्तांशी भिडत असतो तेव्हा भक्तांना मुद्द्यावर बोलायचं नसेल तेव्हा त्यांच्या तोंडातून काफिर शब्द नक्की निघतो...
काही कट्टर हिंदू संघटनांनी मुस्लिम धर्माला बदनाम करण्यासाठी कुराणच्या अर्धवट आयतांचा आधार घेतला. त्यातील काफिर एक. त्यांच्या मते मूर्तिपूजा करणारे काफिर असतात. त्यांना मारा आणि त्यांना धर्मपरिवर्तन करायला लावा असं कुराण सांगतो. आणि त्यामुळे मुस्लिम लोक हिंदूंना मारतात.
त्यांना हिंदूंना संपवायचं आहे. ते हिंदूंना काफिर समजतात. असे अनेक खोटे आरोप लावून लोकांची माथी भडकवली जातात. आणि मुस्लिम धर्माविरुद्ध द्वेष निर्माण केला जातो.
"कुराणमध्ये सुरह तौबा 9 आयत नं. 5"
मध्ये सांगितले आहे की, 'जिथे मूर्तिपूजक (काफिर) भेटतील त्यांना मारा, कैद करा, जर ते माफी मागत असतील आणि नमाज पढायला तयार असतील तर त्यांना सोडून द्या'.
वर दिलेल्या आयत चा उपयोग केला जातो हिंदूंना मुस्लिम विरूद्ध भडकवण्यासाठी. पण हा अर्धवट संदर्भ आहे. कुराणची 5 नं. ची आयत उचलून लोकांना खोटे दाखवले जाते. पण सत्य जाणून घेण्यासाठी तुम्हाला कुराणच्या पहिल्या आयत पासून वाचायला सुरू करावे लागेल.
"कुराणच्या सुरह तौबा 9 आयत नं.1"
पासून पुढे लिहिलं आहे की, मक्का मध्ये राहणारे काफिर (गैर मुस्लिम) लोक जे मूर्ती पूजा करतात. ते मदिनेत येऊन मुस्लिम समाजावर अन्याय करत आहेत. धर्मस्थळे उध्वस्त करून मुस्लिमांना मारत आहेत.
तेव्हा अल्लाह त्या काफिर (गैर मुस्लिम) लोकांना 4 महिन्याची मुदत देतो आणि म्हणातो की या 4 महिन्यात सगळं ठीक करा नाहीतर युद्ध होईल. तेव्हा ते आपल्या मुस्लिम बांधवांना सांगतात की जेव्हा युद्ध सुरू होईल तेव्हा तुम्ही त्यांना (Opposition ला) मारा.
यानंतर..
सूरह तौबा 9 आयत नं.6
जे कैद केलेले लोक आहेत त्यांतील ज्या लोकांना अमन (शांती) हवे आहे अशा सर्व काफिर (गैर मुस्लिम) लोकांना संरक्षणासह सुरक्षित ठिकाणी पोहचवा.
काफिर हा शब्द इथे Opposition साठी वापरला आहे. आणि Opposition ला मारण्याची सूचना केली आहे. हे धर्म युद्ध आहे आणि धर्म वाचवण्यासाठी त्यांना मारा असा आदेश अल्लाह मुस्लिम बांधवांना देतो.
पण आपल्याला हे सांगितलं जातं नाही. आपल्याला Randomly 5 नं. ची आयत उचलून दाखवली जाते. त्याच्या मागे पुढे काय लिहिले आहे किंवा त्या मागे संदर्भ काय हे मुद्दाम लपवले जाते.
समजा भारत आणि पाकिस्तान युद्ध सुरू झालं. भारतीय जवानांना सांगितलं गेलं की जिथे जिथे तुम्ही पाकिस्तानी जवान पहाल तिथे त्यांना मारा. याचा अर्थ असा नाही की एखादा पाकिस्तानी भारतात ताजमहाल पहायला आलेला आहे तर त्यालाही मारा.
हिंदू धर्मग्रंथ भगवत गीतेमधील एक श्लोक पहा..

अध्याय नं.11 श्लोक नं.32
भगवान कृष्ण म्हणतात की "मी वेळ आहे आणि मी जगाचा विनाश करण्यासाठी आलो आहे."

मी जर इतकेच बोललो तर तो अर्धवट संदर्भ होईल.
याच्या पुढे ते म्हणतात की तुम्ही (पांडव) सोडून या कुरुक्षेत्र मध्ये जे कोणी आहेत ते सर्व मारले जातील. तर इथे हा संदर्भ कुरुक्षेत्र साठी आहे.
एक लक्षात घ्या. आपण कोणत्याही धर्मग्रंथातील अर्धवट संदर्भ उचलून काहीही संदर्भाने पसरवू शकतो. तसाच काहीसा प्रयत्न हिंदू संघटनांचा मुस्लिम धर्माविरुद्ध सुरू आहे.
काफिर हा शब्द वाईट नाही किंवा कोणती शिवी नाही. जो मुस्लिम नाही त्याला इथे काफिर म्हटले आहे.

तुम्ही हिंदू असाल आणि तुमचा मित्र मुस्लिम असेल तर तो मुस्लिम मित्र तुमच्यासाठी काफिर असेल.

तुम्ही ट्विटर वापरता आणि तुमचा मित्र ट्विटर वापरत नसेल तर तो मित्र तुमच्यासाठी काफिर असेल.
पण काही धार्मिक द्वेष पसरवणाऱ्या लोकांनी काफिर शब्दाला बदनाम केलं आहे.

कुराण मध्ये एक शिकवण आहे. शेजाऱ्याचा सन्मान करा त्याला संकट समयी मदत करा जरी तो काफिर (गैर मुस्लिम) असला तरी. जर काफिर लोकांना माराच सांगायचे असते तर त्याला मदत करा म्हणून तरी का सांगितले असते ??
You can follow @SahilVastad.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: