विषय :-

किल्ले न.६- किल्ले तोरणा
महाराजांचा इतिहास म्हणलं कि काही किल्ले अगदी नजरेसमोर उभे राहतात.शिवजन्मभूमी शिवनेरी,पहिली राजधानी राजगड,दुर्गदुर्गेश्वर रायगड,स्वराज्याची शपथ घेतलेला रायरेश्वर आणि स्वराज्याचे तोरण असलेला तोरणा !
आज याच किल्ले तोरणाची #मल्हारवारी !
(1/20)
पुण्यापासून अंदाजे ६९ किलोमीटर अंतरावर वेल्ह्याच्या मागे भला मोठा प्रचंडगड अर्थात 'तोरणा' दिमाखात उभा आहे.स्वारगेट वरून निघालो कात्रज,जांभूळवाडी असा रस्ता करत करत नसरापूर फाट्याला येऊन पोहोचतो.इथून उजव्या बाजू ला गाडी वळवली कि नसरापूर च्या रस्त्याला लागतो !
(2/20)
याच रस्त्यावरून थोडं आत गेलो कि बनेश्वर नावाचे शंकराचे मंदिर दिसते.घनदाट झाडी मध्ये वसलेले हे मंदिर अगदी पाहण्यासारखे आहे.नसरापूर,आंबवणे,विंझर,लशीरगोन अशी गावं पार करत आपण वेल्ह्याला येऊन पोहोचतो !
(3/20)
दूरवरूनच आपल्याला भला मोठा असा प्रचंडगड दृष्टीस पडतो आणि मनात थोडीशी भीती निर्माण करतो.समुद्रीसपाटी पासून ४००० फूट उंच असलेला हा किल्ला ट्रेकर्स साठी पर्वणीच आहे ! वेल्ह्यामधून गडावर जायला एक वाट आहे,थोडीशी अवघड पण thrilling !
(4/20)
थोडं किल्ल्याच्या इतिहासाकडे जाऊयात आणि मग किल्ल्यावर असलेल्या गोष्टींची भ्रमंती करूयात.
तोरणा केव्हा बांधला आणि कुणी बांधला याचा ठोस इतिहास माहित नाही पण गावकऱ्यांकडून जेवढा इतिहास मला कळला तेवढा मी सांगू शकेन.
(5/20)
गावकरी म्हणतात हा किल्ला शैव पंथीयांनी १३ व्या शतकात हा किल्ला बांधला.मेघनाची देवी अर्थात तोरणाइ देवीचे मंदिर किल्ल्याच्या सुरवातीलाच आहे म्हणून याचे नाव तोरणा ! आता हि एक आख्यायिका आहे,याचा ऐतिहासिक पुरावा आहे का ते माहित नाही !
(6/20)
इ. स. १४७० ते १४८६ च्या दरम्यान बहामनी राजवटीसाठी मलिक अहमदने हा किल्ला जिंकला होता.हा किल्ला कधी बहमनी राजवटी मध्ये,कधी निजामशाहीत तर कधी आदिलशाही मध्ये होता.
(7/20)
आणि मग १६४६ साली छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी हा किल्ला काही मावळ्यांसोबत जिंकला आणि स्वराज्याचे तोरण उभारले.किल्ल्याची डागडुजी करत असताना कोठी दरवाज्याचा इथे धन सापडले,आणि हे धन महाराजांनी मुरंबदेवाचा डोंगर अर्थात किल्ले राजगडाच्या उभारणीसाठी वापरले.
(8/20)
किल्ले राजगड हा तब्बल २४ वर्ष स्वराज्याची राजधानी होता.ह्या धनाचा वापर किल्ले तोरणाच्या डागडुजी साठी सुद्धा केला होता.मला कायम वाटतं कि या किल्ल्याला खूप मोठा इतिहास असणार आहे परंतु अजून तो शोधायचा बाकी आहे ! आता येउयात किल्ल्यावरच्या मुख्य गोष्टी पाहायला.
(9/20)
वेल्यापासून चढून गेल्यावर आपल्याला पहिला दरवाजा लागतो,त्या दरवाज्याचे नाव बिनीदरवाजा आणि त्याच्या थोडंच पुढं गेलो कि दुसरा दरवाजा लागतो तो म्हणजे कोठी दरवाजा,हाच दरवाजा जिथे महाराजांना धन मिळाले
हा दरवाजा ओलांडून पुढे गेलो कि आपल्याला तोरणजाईचे देऊळ दिसते.
(10/20)
ह्या देवीचे दर्शन घेऊन आपण पुढे चालू लागतो आणि आपल्याला या किल्ल्याचा बालेकिल्ला दिसू लागतो. बालेकिल्ल्यात तोरणेश्वर,मेंगाई,दिवाणघर इत्यादी वस्तूंचे उध्वस्त झालेले अवशेष आढळतात
(11/20)
बालेकिल्ला पाहून झाला कि थोड्याच अंतरावर झुंजारमाची दिसते,या किल्ल्याला दोन माच्या आहेत.एक झुंजार आणि दुसरी बुधला माची.झुंजार माची तशी लहान पण यावर जाणे जरा अवघड.या माचीला दोन टप्पे आहेत,आणि दोनीही टप्प्यात चिलखती बुरुज आहेत.
(12/20)
किल्ल्याच्या पश्चिमेस बुधला माची आहे,या बुधला माचीच्या तळास दक्षिणेकडे एक असलेला डोंगराचा फाटा आहे तो थेट राजगडापर्यंत जातो.बुधला माची पाहून झाली की उजव्या हाताला आपल्याला कोकणदरवाजा दिसतो आणि अजून एक दरवाजा दिसतो ज्याचे नाव चित्तादरवाजा,पण हा आता पडून गेला आहे.
(13/20)
या किल्ल्यावरच्या बर्याचश्या इमारती उध्वस्त झालेल्या आहेत पण या किल्ल्याचा विस्तार प्रचंड आहे,म्हणूनच कदाचित महाराजांनी या किल्ल्याचे नाव तोरणा पासून प्रचंडगड असे ठेवले.इथून खाली दिसलेले विहंगम दृश्य नजरेत सामावणे खर्यार्थाने कठीण.
(14/20)
नशिबाने आपण महाराजांच्या महाराष्ट्रात जन्माला आलो आहोत,सह्याद्रीच्या कुशीत वसलेले असे अनेक अनेक किल्ले आपल्या राज्यात आहेत,राजगड,रायगड,शिवनेरी,सिंहगड,पुरंदर! किती किती ते किल्ले.
प्रत्येकाने वेळात वेळ काढून अश्या या इतिहासाची साक्ष देणाऱ्या किल्ल्यांना जरूर भेट द्या.
(15/20)
मी कायम म्हणतो तसं,हे किल्ले म्हणजे दगडाची इमारती आहेत या पलीकडे काहीही नाही,पण त्या मध्ये घडलेला इतिहास त्या दगडांना जिवंत करतो,या दगडांनी किती राजे पहिले,किती शाह्या पहिल्या,किती युद्ध पहिली आणि शेवटी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाले.
(16/20)
तुम्ही स्वतः,तुमच्या लहानग्यांना घेऊन अश्या किल्ल्यांची अवश्य भेट द्या,मॉल,सिनेमाची आवड लावण्यापेक्षा भटकंतीचे वेड लावा,एक समृद्ध,सुजाण आणि सुसंस्कृत पिढी म्हणून आपली पुढची पिढी निश्चितच उभी राहील !
(17/20)
तोरणा किल्ल्याचे प्रचंड वर्णन ऐकून कसे वाटले ते अवश्य सांगा,आवडल्यास share करा,तुमच्या काही आठवणी असतील तर कमेंट मध्ये जरूर कळवा ! पुढची #मल्हारवारी कोणत्या किल्ल्यावर न्यायची हे देखील सांगायला विसरू नका !
(18/20)
बोला
पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज कि.....जय
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज कि....जय !
सनातन हिंदू धर्म कि .....जय !
(19/20)
याच्या आधी पाहिलेल्या सर्व किल्ल्यांचे थ्रेड या लिंक वर क्लिक करून वाचा! धन्यवाद !
(20/20) https://twitter.com/i/events/1255358579000979457?s=13
You can follow @malhar_pandey.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: