#म

कोरोना, गुजरात आणि HIGH COURT !

महाराष्ट्रात कोरोना च्या केसेस वाढत आहेत ही चिंतेची बाब आहे. राज्यशासन त्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करत आहे. मात्र काही अतिउत्साही मंडळी ज्यांचा राग कोरोना वर कमी आणि इथल्या सरकार वर जास्त आहे ते असं चित्र उभं करत आहेत जणू फक्त महाराष्ट्रात
परिस्थिती वाईट आहे आणि बाकी सर्व राज्यात सर्व काही व्यवस्थित सुरू आहे. महाराष्ट्रात परिस्थिती चिंताजनक नक्कीच आहे, मात्र टिका करताना केवळ महाराष्ट्राला टार्गेट करणे योग्य नाही. देशातील सर्वात विकसीत राज्य असलेल्या आणि प्रगतीचं मॉडेल असलेल्या गुजरात मधल्या अहमदाबाद मधे...
परिस्थिती इतकी वाईट आहे की गुजरात उच्च न्यायालयाने सरकारवर कडक ताशेरे ओढले आहेत.
अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलच्या कोरोना पेशंट हाताळणीवर उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. " It is very   distressing   and   painful   to   note that the condition
prevailing...
as   on   date,   in   the   Civil   Hospital, is pathetic " असे मत कोर्टाने नोंदवले आहे. गुजरात मधे 20 तारखेपर्यंत 625 मृत्यू कोरोनामुळे झाले आहेत. त्यातील 570 अहमदाबाद मधील आहेत. या 570 मधे 60% मृत्य हे अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटल मधे झालेत. हे सिव्हिल हॉस्पिटल सरकारच्या...
अखत्यारीत येतं. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यदर जास्त असण्यामागे तिथे रुग्णांची ट्रिटमेंट आणि काळजी व्यवस्थित घेतली जात नसल्याचे मत कोर्टाने नोंदवले आहे. सिनियर डॉकटर वॉर्डला भेट देत नाहीत, वर्किंग स्ट्रक्चर नाहीये, सिरीयस पेशंटबद्दल निर्णय लवकर होत नाहीत, हायजीन मेंटेन केलं जातं
नाहीये अशी अनेक कारणे कोर्टाने दर्शवली आहेत.

पुढे कोर्टाने गुजरातच्या आरोग्यमंत्र्यांवर ताशेरे ओढले आहेत. आरोग्यमंत्र्यांनी कितीवेळा सिव्हिल हॉस्पिटलला भेट दिली जेणेकरून तिथल्या परिस्थितीचा आढावा घेता येईल , रुग्ण, डॉकटर, नर्सेस आणि इतर स्टाफ यांना काय समस्यांना तोंड द्यावे...
लागत आहे याची आरोग्यमंत्र्यांना कल्पना आहे का ? आरोग्य अधिकारी आणि इतर कर्मचारी यांना येणाऱ्या अडचणी आणि समस्या जाणून घेण्यासाठी आरोग्यमंत्र्यांनी त्यांच्याशी कितीवेळा चर्चा केली ? आरोग्य खात्याच्या मुख्य सचिवांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये काय चालू आहे याची कल्पना आहे का ?...
मुख्य सचिवांनी कितीवेळा सिव्हिल हॉस्पिटलला भेट दिली ? पुरेसे व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्यामुळे सिव्हिल हॉस्पिटल मधील रुग्ण मृत्यमुखी पडत आहेत याची सरकारला जाणीव आहे का ? व्हेंटिलेटरची समस्या सोडवण्यासाठी सरकारकडे काही उपाययोजना आहे का ? असे प्रश्न विचारून उच्च न्यायालयाने सरकारच्या..
उपाययोजनांमधील फोलपणा दाखवून दिला आहे. सिव्हिल हॉस्पिटल हे लोकांच्या उपचारासाठी आहे. मात्र ते एखादी अंधारकोठडी असल्यासारखे दिसत आहे असे कोर्टाने म्हंटले आहे. याकडे गांभीर्याने बघा आणि पुढील तारखेला सकारात्मक फीडबॅक घेऊन या असे निर्देश कोर्टाने सरकारला दिले आहेत....!
महाराष्ट्र सरकारच्या चुका निश्चित दाखवल्या पाहिजेत, त्यावर काम होत नसल्यास टिका देखील केली पाहिजे....मात्र कोरोना आडून राजकिय स्कोर सेटल करू पाहणाऱ्यांनी विशेषतः उत्तर भारतातल्या विद्वानांनी एकदा गुजरात मॉडेल कडे देखील नजर टाकावी...🙏🏻
You can follow @Gaju3112.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: