Donald Trump यांना अमेरिकेची अध्यक्ष पदाची निवडणूक जिंकून देण्यात Cambridge Analytica या कंपनीने अद्यावत अश्या Intensive survey research, data modelling and performance-optimising algorithms यांचा वापर करत targeted digital marketing काय चमत्कार घडवू शकते हे

#मराठी #thread

P1
हे दाखवून देत इंटरनेट, social media व smartphone ह्या गोष्टी आपल्याला कश्या कंट्रोल करू शकतात याची झलक दाखवली.

हे वाचा 👇

https://www.theguardian.com/uk-news/2018/mar/23/leaked-cambridge-analyticas-blueprint-for-trump-victory

गेल्या दशकात social media व smartphone ने आपल्या जगण्याची भाषा बदलली. Orkut, Facebook, Instagram, Whatsapp, TikTok, Twitter

P2
Twitter Snapchat, gaming, porn व dating app अश्या वेगवेगळ्या संवादाच्या माध्यमांनी विसंवाद वाढला. बहुतेक समाज माध्यम ही अमेरिकेन लोकांनी सुरू केल्याने त्यांच्या संस्कृती ला अनुसरून त्यांची रचना होती. भारतातील औद्योगिकरणाने आलेला पैसा, telecom क्रांती व उंचावलेल राहणीमान

P3
याने लोकांच social media शी असलेलं नात घट्ट झालं.2 billion users असलेलं Whatsapp चा सगळ्यात मोठा user group भारतात आहे. तसेच फेसबुक चा सगळ्यात जास्त वापर भारत करतो.

हे वाचा 👇

आपल्या मेंदूत nucleus accumbens ज्याला reward centre म्हणतात

P4 https://www.livemint.com/technology/tech-news/whatsapp-announces-2-billion-users-worldwide-11581516342061.html
व जे pleasure centre/आनंदाचं केंद्र आहे. कुठलीही आनंदाची देणारी गोष्टीने ह्या केंद्रात dopamine हे आनंदाच रसायन स्त्रवत. ह्याच वैज्ञानिक गोष्टीचा आधार घेऊन सगळे social media तयार केले आहेत. मांडणी, रंग, user interface (UI) हे consumer व cognitive psychology चा आधार घेऊन तयार

P5
केले जातात जेणेकरून आपल्याला परत परत ते बघत राहायची इच्छा होईल. Likes/comments/notifications ने मेंदूला काहीतरी reward/बक्षीस मिळाल्याची भावना येऊन dopamine हे आनंदाच रसायन स्त्रवत व जस दारू/सिगरेट/कोकेन ने मेंदूतील circuit बदलतात तसेच social media ने पण मेंदूतील रचना बदलून

P6
व्यसन लागत. नशा करणारी लोक आनंदाची अनुभूती मिळविण्यासाठी जसे वेगवेगळे प्रकार करत जास्त तीव्रता असणारी नशेच्या शोधात असतात म्हणजे नावीन्य हवं असत, तेच novelty seeking च principle हे social media, gaming व porn चे निर्माते वापरतात. त्यामुळेच सतत नवीन features येत राहतात,

P7
update सुरूच असतो. लैंगिक सुखाने dopamine हे 50 ते 100 टक्के वाढत असेल तर कोकेन हे 300 ते 800 टक्के आनंदाची अनुभूती देत. कोकेन व social media हे मेंदूवर जवळपास सारखच काम करतात. Facebook ने depression वाढत ,Twitter ने anxiety वाढते व इन्स्टाग्राम हा  मानसिक आरोग्यासाठी

P8
सगळ्यात खराब आहे. हे वाचा 👇

https://www.theatlantic.com/technology/archive/2017/07/how-twitter-fuels-anxiety/534021/

Grey matter हा मेंदूतील भाग जसा कोकेन मुळे कमी होतो तसाच तो social media च्या वापराने पण कमी होतो. Grey matter हे स्नायूंच नियंत्रण, ज्ञानेंद्रिय जस संवेदनेचे आकलन, बघणे, ऐकणे, स्मरण, भावना, वाचा,
निर्णयक्षमता व

P9
व स्वनियंत्रण करत व एकदा झालेलं grey matter च नुकसान भरून येत नाही.
हे वाचा 👇
 
https://www.psychologytoday.com/us/blog/is-your-brain-technology/201805/does-online-social-networking-change-your-brain

मेंदूतील भावनिक केंद्र ज्याला amygdala म्हणतात ते आपल्या मानवी उत्क्रांतीची देणगी आहे, amygdala हे भीतीवर काम करते व cortex हा मेंदूतील भाग तर्कशुद्ध विचार करतो.

P10
Amygdala ला भीती जाणवली (मानसिक किंवा शारीरिक) तर तो शरीर ला संदेश देतो की आता स्वतःच रक्षण करायला हवं, मग त्यानुसार मानवी शरीर एक तर त्या भीती वाटणाऱ्यापासून दूर जात किंवा भीती वाटणाऱ्या शी दोन हात करायला सज्ज होत, ह्याला flight/fight अस नाव आहे. शरीर ह्या भय अवस्थेत ताण

P11
अनुभवत असत.इंटरनेटवर आपल्यावर आदळनाऱ्या असंख्य गोष्टी मनात भीतीची भावना सतत जागृत ठेवतात. तार्किक विचार करायला मेंदूला वेळच मिळत नाही कारण 24*7 वेगवेगळी मध्यम व त्यातून येणारी अखंड माहिती मेंदूत ट्रॅफिक जॅम करते. त्यामुळे आपलं शरीर व मेंदु सतत alert mode मध्ये राहून झोप कमी

P12
होते, blue light ने पण झोपेवर वाईट परिणाम होतो ज्यामुळं शरीरातील सगळ्या क्रिया बिघडतात व लठ्ठपणा वाढतो. Body dissatisfaction म्हणजे स्वतःच्या शरीरात सतत काहीतरी कमी आहे व जे स्क्रीन वर दाखवलं जात त्यासारख्य दिसण्यासाठी खासकरुन स्त्रिया अगदी अघोरी प्रकार जसे fad diet करतात.

P13
करतात. स्वतःला जस आहे तस स्वीकारणं व आयुष्यातील महत्वाच्या व्यक्तिंनी पण आपल्यला विनाशर्त स्वीकारणं मानसिक शांती साठी सगळ्यात आवश्यक आहे. इंटरनेट/सोशल मिडिया अश्या व्यक्तीसारखं आहे जी आपल्याला कमीपणाची भावना देतात.
FOMO म्हणजे fear of missing out ज्याने
आपण इंटरनेट पासून

P14
जात नाही कारण आपल्याला काहीच कळणार नाही, सगळे पुढे जातील या भावनेने लोक social media सोडत नाहीत.
हे वाचा 👇

https://m.economictimes.com/magazines/panache/between-the-lines/fomo/articleshow/62550811.cms

मनुष्य हा सामाजिकप्राणी आहे व उत्क्रांती च्या सिद्धांतानुसार आपला मेंदू हा प्रत्यक्ष समोर दिसत असलेल्या व्यक्ती च्या हालचाली, हावभाव व आवाज

P15
अश्या अशाब्दीक संकेतानुसारच संवाद साधू शकतो कारण आपल्या मेंदूला ह्याच गोष्टी कळतात,असच प्रोग्रामिंग आपल्या मेंदूत आहे. मनुष्य/प्राणी ह्याच्याशी आपण जेव्हा प्रत्यक्ष संवाद साधतो तेव्हा आपल्यात एक भावनिक सर्किट तयार होत असत,आपण एकमेकांचे अशाब्दीक संकेत स्मरणात ठेवून त्यानुसार

P16
नात पुढं न्यायचं/नाही, कस न्यायच हे सगळं ठरवत असतो. हीच मेंदूची सवय गेली शेकडो वर्षे आहेत पण गेल्या काही वर्षात आलेल्या समाजमाध्यमानी आपल्या ह्या मेंदुतील मूळ साच्याला पूर्णपणे धक्का लावलेला आहे व त्याचा परिणाम आपल्याला वाढलेला मानसिक ताण, दुभंगलेली नाती, गुन्हे,

P17
जात/धर्मद्वेष व एकटेपणा यात दिसतोय. 
हे बघा 👇



लहानपणी आपल्या आईवडिलांनी/शिक्षकानी आपली दुसऱ्या शी केलेल्या तुलनेने आपण चिडायचो पण आपणच नकळत social media वापरताना ओळख नसलेल्या लोकांशी तुलना करून आपली स्वप्रतिमा व स्वतःच्या नजरेत आपली किंमत कमी करत

P18
करत असतो. ईर्ष्या व असूया वाढीस लागून आपले लोकांशी संबंध खराब होतात की त्याला मिळतंय पण मला मिळत नाही. मी कोण, मला काय करायचं आहे, माझी दिशा काय, माझं जगातील स्थान काय व मी स्वतःला कस बघते/बघतो हे म्हणजे self worth/self esteem ज्याचं पक्क आहे तो/ती दुसऱ्यांकडून दिलेल्या

P19
स्विकृती/नकार या दोन्ही गोष्टींचा फारसा फरक पडत नाही. याउलट ज्या लोकांची स्वप्रतिमा दुबळी आहे ती लोक social media च्या जास्त आहारी जातात. Followers/Likes/comments मिळविण्यासाठी खटपटी करतात. आपण जी नकली प्रोफाईल बघतो ज्यात paid/unpaid trollers ने गेल्या काही वर्षात धुमाकूळ

P20
घातला आहे अशी लोक मुख्यत्वे त्यांच्या मनातील खदखद दुसरयला त्रास देऊन बाहेर काढतात म्हणजे त्रास स्वतः ला आहे (दुर्दैवाने दुःखी लोक असतात ही) त्याचा दुसऱ्यावर राग काढून (Catharsis) वेळ निभावतात पण खरं दुःख तसच राहत. सध्या आलेल्या राष्ट्रभक्ती च्या लाटेत असे असंख्य दुःखी आत्मे

P21
वेगवेगळ्या पद्धतीने दुःख व्यक्त करताना दिसतात. त्यातही विखारी/हिंसक बोलणाऱ्या स्त्रीया ज्या बहुतेक पीडित असतात (पीडित पण रडणाऱ्या वेगळ्या) अश्या माध्यमातून एक प्रकारे स्वतः सूड घेतल्याचं समाधान मिळवितात. स्त्रिया एवढ्या भडकाउ बोलू शकतात हे या ट्रोल्लिंग ने कळलं.आपण जसे

P22
दिसतो/असतो त्यापेक्षाही आकर्षक अशी प्रतिमा तयार करून त्यातून मिळणारा आनंद हा आभासी जगाचा USP आहे कारण कोणीही येऊन प्रोफाईल तयार करू शकत.खोटं प्रोफाइल(किंवा खर/अर्धवट नाव वापरून) तयार करून खऱ्या आयुष्यात जे सुख मिळालं नाही ते मिळविण्याचा प्रयत्न करतात किंवा ज्यांना प्रत्यक्ष

P23
बोलायला कुणीच नसत, व्यक्त होऊ शकत नाही पण social media वर व्यक्त होतात. एका मोठ्या ग्रुप चा भाग असल्याचं समाधान एकट्या लोकांना मिळत. याचे फायदे कमी व तोटे जास्त आहेत कारण अशी लोक खऱ्या आयुष्यात तशीच असतात, जे आपण बघत असतो ती प्रतिमा असते, म्हणजे कोणी कस व्यक्त होत हे बघून

P24
त्याच्या प्रत्यक्ष आयुष्यात सगळी छान गोड अपेक्षा करणे म्हणजे मृगजळच्या मागे लागुन तोंडावर आपटण्यासारखं आहे. मनातील खदखद ही शांत करण्याऐवजी ती चुकीच्या पद्धतीने इंटरनेट वर व्यक्त झाल्याने गोंधळ झाला आहे. Social media वर केलेल्या गोष्टी ला digital footprints असतात जी कधीच

P25
delete होत नाहीत ( आपण delete केली तरीही) त्यामुळे तुमच्या कामावर/आयुष्यावर त्याचा खूप चुकीचा परिणाम होऊ शकतो. नौकरी जाणे,पार्टनर/कुटुंबातील लोकांशी शी भांडण असले प्रकार आपण आजुबाजूला बघतच आहोत. इंटरनेट हे आपल्या भावनिक मेंदु ला उत्तेजित करत व आपला तार्किक मेंदु हा internet

P26
surfing करताना offline जातो म्हणून react होणे व मग अस बोलायला नको होतं म्हणून पश्चात्ताप होतो.स्व/सेल्फ हा आपल्याला जशी घरातून व वातावरणातून वागणूक मिळाली त्यातून तयार होतो व पक्का होत जातो. रंग, रूप, बुद्धी, पैसा, यश या बाह्य स्वरूपाच्या शारीरिक वैशिष्ट्यवर अति भर

P27
देणाऱ्या समाजात बहुतेक जण आतून दुःखी असतात. इराण मध्ये एका मुलीने Angelina Jolie सारखी दिसायला 50 शस्त्रक्रिया केल्यात, म्हणजे ती जशी आहे तस तिने स्वतःला स्वीकारलं नाही व तिची काय गडबड झाली हे बघा 👇

https://www.dailymail.co.uk/news/article-8228909/Iranian-Zombie-Angelina-Jolie-Instagram-star-ventilator-contracting-coronavirus.html

इन्स्टाग्राम वर आयुष्य सुंदर दाखवण्यासाठी

P28
प्रचंड पैसा खर्च करणारी लोक आहेत. WHO ने सेल्फी घेणे, इंटरनेट गेमिंग व पॉर्न बघणे ह्याला मानसिक आजार घोषित केले आहे. जस प्रत्यक्ष आयुष्यातील व्यसन हे मेंदूत structural व functional बदल घडवते तसेच बदल पॉर्न, गेमिंग हे आभासी जगातील व्यसन पण मेंदूत बदल घडवतो. लैगिंक हिंसेच्या

P29
वाढलेल्या घटना हे पॉर्न च्या व्यसनाचा परिणाम आहे. व्यसनी मेंदु व साधारण मेंदु मध्ये फरक असतो. व्यसनी मेंदु हा उतावीळ, अविचारी, परिणामाचा विचार न करणारा असतो. हिंसा व लैंगिकता ह्या आदिम भावना उद्दीपित झाल्याने इंटरनेट/समाज मध्यमाच व्यसन लागत. इंटरनेट/समाजमाध्यम आपल्यातील

P30
पशु जागा करतात जो करायला नको व त्या पशुला परत शांत करणं अशक्य आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे ही सगळी माध्यम आपला डेटा वापरतात. आपण कशावर क्लिक करतो, काय जास्त वेळ बघतो, key words काय टाकतो यावरून आपलं personality profile त्याच्याकडे तयार असत जे वापरून ते आपल्याला हवं ते विकू

P31
जस Cambridge Analytica च्या बाबतीत झालं.आपल्या मेंदूत रोज मर्यादित माहिती साठवू शकतो पण अमर्याद येणाऱ्या माहितीमुळे आपला मेंदू information overload अनुभवतो ज्याने स्मरणाशक्ती वर परिणाम होतो. Attention विखुरल्या मुळे एकाग्रता कमी झाली व अतिचंचलता वाढली

P32
हे वाचा 👇

https://www.telegraph.co.uk/technology/2019/06/06/internet-giving-us-shorter-attention-spans-worse-memories-major/

सतत update टाकन्याच्या नादात आपण त्या क्षणाची मज्जा घेतच नाही. here & now/Being in moment ला आपण विसरलोय. काही लोकानी तर लोकांना दाखविण्याचा नादात सेल्फी घेताना जीव पण गमावलेत.

हे वाचा 👇

https://www.psychologytoday.com/us/blog/inviting-monkey-tea/201604/when-posting-our-life-is-more-important-living-it

आपल्या smartphone वर

P33
सगळं customized मिळत असल्याने व self promotion हा सगळ्या social media चा USP असल्याने narcissism/आत्मकेंद्रित वृत्ती व अहंकार वाढत आहे. त्यामुळे एकटेपणा पण वाढून एकमेकांना मदत करायची वृत्ती कमीच झालीय. करुणा, दया व सहसंवेदना ची जागा "तुझं तू माझं मी" ने घेतली आहे. जोकर

P34
या जगात गाजलेल्या सिनेमात तुटलेल्या नात्यांमुळे साधारण माणूस राक्षस कसा बनतो हे परिणामकारक रीतीने बघायला मिळत. मोबाइल अतिवापराने स्नायूंशी संबंधित दुखणी वाढीस लागली आहेत.
इंटरनेट/सोशल मिडिया च्या राक्षसाला आपण जितकं content भरवू तितकी त्याची भूक वाढते कारण attention

P35
त्याचा प्राणवायू आहे.इंटरनेट/social media योग्य व खऱ्या पद्धतीने वापरले तर फायदे पण खूप आहेत. त्याचे नियम वेगळे आहेत. कुठलाही social media platform वापरायचा तुमचा हेतू काय आहे हे स्पष्ट पाहिजे. कोणती काळजी घायला हवी, किती वेळ वापरायचं हे पण स्पष्ट हवं. काय करायचं माहीत

P36
नसेल की भरकटत जास्त जातात. 5 वर्ष वयापर्यंत फक्त 3 मिनट स्क्रीन टाइम द्यावा व 18 पर्यंत स्मार्टफोन वापरू नये.

सकाळी उठल्यावर किमान एक तासानंतर व झोपण्यापूर्वी 1 तासा पूर्वी मोबाईल/लॅपटॉप बघू नये. सकाळ व रात्रीच एक वेळापत्रक ठरवलं तर फायदा होतो.

P37
Inception या स्वप्नांच्या दुनियेची रहस्य दाखवणाऱ्या चित्रपटात पात्र स्वतःला स्वप्नाची व खरी दुनिया यातील फरक कळण्यासाठी totem वापरतात कारण जर तो नाही वापरला तर स्वप्नच्या दुनियेत आपण हरवू शकतो.इंटरनेट च आभासी जग मायावी आहे, हरवू नये म्हणून तुम्ही कोणतं totem वापरता ?

Complete🌟
You can follow @DrVrushaliRaut.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: