प्रिय स्थलांतरित मजुरांनो,
हो हो..तुम्हाला 'प्रिय' म्हणून मी तुमची थट्टाच करतोय. का करतोय? कारण मला तुम्हाला गांभीर्याने घ्यावसचं वाटत नाही; अहो मलाच काय कुणालाच अगदी तुमच्या 'मायबाप' सरकारला सुद्धा नाही. तसही फाटक्या माणसाला इथं फाटक्या नोटेएवढीही किंमत नसते.
१)
काही सुजाण नागरीकांच्या मते, "तुम्हा अडाणी लोकांना काही कळतच नाही. सरकार एवढं आकांताने सांगतंय कि आहात तिथंच थांबा, तुमची खाण्या-पिण्याची, प्रवासाची सगळी व्यवस्था करतो तरी तुम्हाला कसं काय समजत नाही. तुम्ही चालतचं सुटलाय? बॅगा आणि पोरं-बाळांचं ओझं पेलत." घरात बसून, २-३ वेळचं
२)
अन्न गिळून, पंखे-एसीचं वारं खाणाऱ्या या बिचाऱ्यांना असं वाटणं सहाजिकच आहे.
इथं आम्हाला १-२ किमी. अंतरावर जरी जायचं असलं तरी बुडाखाली गाडी लागते तिथं तुम्ही ८००-९००-१०००किमी अंतर पायीचं कापताय. आमची लहान लेकरं जरा कुठं उन्हात गेली कि आमचा जीव कासावीस होतो आणि
३)
तुम्ही तुमच्या लेकरांसकट रोज १०-१२ तास उन्हात पायी चालताय. ज्या वयात आमची बाळं बापाच्या अंगावर बसून 'घोडा-घोडा' खेळतात तिथं तुम्ही तुमच्या बाळांना प्रवासी बॅगेवर झोपवून ओढत नेण्याचा कोणता नवीन खेळ आणू पाहताय.आम्ही आमच्या घरातल्या गरोदर बाईचे सगळे डोहाळे पुरवतो, तिची सांगोपांग
४)
काळजी घेतो तिथं तुमच्या घरातली गरोदर माऊली कडेवर अजून एक लेकरु आणि डोक्यावर सामानाची बोचकी वाहतेय. रेल्वेचं तिकीट ऑनलाईन बुक केल्याशिवाय स्टेशनवर न जाणारे आम्ही. तिथं तीच रेल्वे तुम्हाला चिरडून निघून जात आहे. अहो, कोरोना पासून संरक्षण व्हावं म्हणून आम्ही देवालाही मास्क घातले;
५)
तुम्ही इतके निष्काळजी आहात कि साधी कापडाची चिटोरी बांधलीये किंवा तीही नाही बांधलेली.
अशी अजून खूप उदाहरणं आहेत जी सिद्ध करतील कि तुम्ही इथं किती दुर्लक्षित आहात.इथं कपड्यांवरून धर्म ओळखणारी अद्भुत माणसं अस्तित्वात आहेत पण त्यांना तुमच्या उघड्या-बोडक्या अंगकाठीवरुन तुम्ही
६)
मानवधर्माचे आहात हे पटेल का? सरकारी आकड्यानुसार तुम्ही ९ करोड(कमीत कमी) लोकं आहात. तसा हा अवाढव्य आकडा राजकारणाचा विषय आहे; पण तुम्ही मुळात कुणाची व्होट बँकच नाही आहात. तुम्ही खरंच मतदान करता का? तुम्हाला मतदानाचं महत्व कळलंय का? जोपर्यंत तुम्ही कुणाचे मतदाते होत नाही तोपर्यंत
७)
इथं तुम्हाला कोणीही विचारात घेणार नाही. असो, दिड-एक महिन्याने का होईना तुमच्या 'मायबाप' सरकारला जाग आली. तुमची प्रवासाची सोय केली, पॅकेज घोषित केलं यातून तुमच्यातल्या काही जणांना लाभही होईल. पण तोपर्यंत तुमच्या 'Right to Life with Human Dignity' या अधिकाराची झालेली जाहीर
८)
विटंबना आणि वेदना माझ्यासारख्या प्रिविलेज वर्गातल्या लोकांना क्लेशदायक वाटतात का? टीव्ही वर तुमची अवस्था बघून 'अरेरे! किती वाईट' एवढं व्यक्त होऊन चॅनेल बदलणं हे आमचं कर्तव्य झालंय का? या स्वतंत्र देशात भाकरी मिळवण्यासाठी अजून किती दिवस तुम्हाला गुलाम बनून जगावं लागणार आहे?
९)
अजून किती वर्ष तुम्हाला तुमचं जीवनमान उंचावण्यासाठी स्वतःचचं गावं सोडावं लागणार आहे? अजून किती वर्ष तुमच्या मुलांचं बालपण हे दुसऱ्यांच्या खेळण्यांकडे नुसतं चमकून बघण्यातच जाणार आहे? अशा कितीतरी प्रश्नांनी माझं मन तणावपूर्ण होऊन जातंय;
१०)
म्हणूनच हलकं होण्यासाठी तुमची चालवलेली थट्टा मी इथं मांडतोय. तुमचं दुखणं इथल्या देवाला, अल्लाला, येशूला जरूर कळत असणार. त्याच्याकडून कुणीतरी 'मसीहा' पाठवला जाईल या स्वप्नात तोपर्यंत रमत रहा.
काळजी घ्या..!
तुमचाच,
कुणीही नाही.
११)
You can follow @Indias_Pratik.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: