#Thread
विषय :-टिक टॉक !

टिक टॉक हा विषय सध्या चर्चेत आणि त्या वरील व्हिडीओ व्हायरल होत आहेत! अनेक जण,हे व्हिडीओ पाहून संताप व्यक्त करत आहेत, परंतु आता पर्यंत किती जणांनी,टिक टॉक फोन मधून काढून टाकलं आहे ?

मुळात, हे भंपक application install केलं त्यांना सलाम!
(1/13)
आता, या टिक टॉक वर लहान मुलांचे म्हणजे अगदी लहान म्हणतोय मी,
4 5 वर्षांच्या मुलांचे सुद्धा व्हिडिओ त्यांचे आई वडील पोस्ट करतात आणि दुर्दैवाने मागे आयटम सॉंग असतात!

ज्या वयात कानावर, श्लोक आणि बडबडगीते पडली पाहिजेत, त्या वयात आई वडील आपल्या मुलांकडून,काही क्षुल्लक...
(2/13)
Views साठी आयटम सॉंग वर डान्स करून घेतात! त्या पुढे,12 14 वर्षांची मुलं मुली, एकमेकांच्या गळ्यात पडून प्रेम करतानाचे व्हिडिओस पोस्ट करतात!

अरे बाबा,इथं त्याला 9 चा पाढा येत नसतो आणि हा प्रेमाच्या गोष्टी सांगत हिंडतोय लोकांना!
(3/13)
14 15 वर्षांच्या मुली,विचित्र कपडे घालून नाचतानाचे व्हिडीओ आणि त्या वरील कमेंट बघून किळस येते!

कोण काय कपडे घालतोय हा ज्याचा त्याचा विषय,पण प्रत्येक गोष्टीला एक वेळ असते!
या सगळ्यात ही मुलं बालपण हरवत आहेत हे पालकांना लक्षात येत नाही हे दुर्दैव!
(4/13)
त्या नंतर येतात आमच्या पिढीतले संत महात्मे! 18 ते 25 वयोगटातील काही पोरं असले उपदेशात्मक संदेश त्या टिक टॉक वर टाकत असतात,जणूं यांच्या सात पिढ्या याच कामात पारंगत असतात!

या वयात,काहीतरी उपयुक्त करावं हे लक्षात न ठेवता,हे असले मेसेज देऊन views मिळवून काही होत नसतं!
(5/13)
मग ते फैजू हा कोण तो आणि त्याची गॅंग,असले भंपक व्हिडीओ बनवतात की बघून वाटतं, आपल्या देशात वेड्यांच्या हॉस्पिटल मधले जेवढे मिळून पळून आले आहेत ते इथेच आहेत,टिक टॉक वर!!
(6/13)
हा झाला टीकेचा विषय,पण आता खरोखर एका गोष्टीकडे लक्ष देऊयात,
यावर जे काही व्हिडीओ असतात,त्यात यांची creativity काय? स्वतःच असं खरंच काही नाही! आणि तरीही यांना लोक बघतात,म्हणजे या पिढीची टेस्ट काय आहे ते कळतं!
(7/13)
काल पर्वा acid attack ला समर्थन करणारा हा व्हिडीओ सिद्दीकी का कोणीतरी पोस्ट केला होता, आज सकाळी 'रेप' या गोष्टीला समर्थन करतानाच व्हिडीओ पाहिला!

म्हणजे,व्हिडीओ साठी काहीही का ?
हे असले मेसेज टाकणाऱ्या लोकांना 13M लोक SUBSCRIBE करतात हे पाहून आश्चर्य वाटतं!
(8/13)
कुठं कुत्र्याला मारतानाचे व्हडिओ,कुठे अश्लील चाळे करतानाचे व्हिडीओ तर कधी ज्यांना चड्डी घालता येत नाही अशी पोरं प्रेमाचे उद्देश देतानाचे व्हडिओ!

हे बघून,आमची पिढी कुठं चालली आहे हा प्रश्न पडतो!
(9/13)
ज्या वयात महाराजांचे पोवाडे ऐकून गडकिल्ले फिरले पाहिजेत, ज्या वयात वाचून आपलं ज्ञान वाढवलं पाहिजे, ज्या वयात आपल्या values वाढवल्या पाहिजेत,त्या वयात हे असले भपंक चाळे?
(10/13)
या वाक्याचा अर्थ खूप मोठा आहे,
'तुमच्या देशातील युवा पिढी कुणाकडे आदर्श म्हणून पाहते,मी त्या देशाचे भविष्य सांगेन'
सुदैवाने या देशात असे अगणिक नायक होऊन गेले ज्यांच्या कडे आपण आदर्श म्हणून बघू शकतो,पण दुर्दैव हेच की आपण या टिक टॉक च्या लोकांना स्वतःचे आदर्श मानून बसलो आहोत
(11/13
ही प्रत्येक पालकाला विनंती आहे की तुम्ही तुमच्या मुलाला चांगल्या गोष्टी ऐकवायला भाग पाडा,
युट्यूब वर इतकी जबरदस्त भाषणं आहेत, ती ऐकून एक जाज्वलय राष्ट्रभक्त पिढी नाही निर्माण झाली तर बघा!!
(12/13)
या देशाला एक सुजाण,देशभक्त युवा पिढीची गरज आहे टिक टॉक मध्ये रमणार्या पिढीची नाही!

अजूनही वेळ गेलेली नाही! तुम्ही वापरत असाल तर ते उडवून टाका आणि जे वापरात असतील त्यांनाही ते टिक टॉक उडवायला सांगा!

जय हिंदू जय महाराष्ट्र 🙏🚩
(13/13)
You can follow @malhar_pandey.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: