धर्मवीर संभाजीराजे आणि आजचा महाराष्ट्र
झाले बहू होतील बहू पण या सम हा!
धर्मवीर शंभूराजे म्हणजे ज्वलंत हिंदुत्वाचा धगधगता निखारा! हिंदुत्व त्यांच्या रक्तातून सळसळून वाहत होतं आणि हा हिंदुत्वाचा वसा त्यांना हजारो सूर्याचं तेज असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांकडून मिळाला

वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी छत्रपतींनी आपल्या अंगठ्याचे रक्त महादेवाला अर्पण करून अखंड हिंदवी स्वराज्याची शप्पथ घेतली आणि अवघ आयुष्य या पवित्र कार्यासाठी अर्पण केलं आपल्या पुत्राने अखंड हिंदुराष्ट्राची गौरवपताका यशस्वीपणे पूढे न्यावी या हेतुने महाराजांनी शंभूराजांना शूर बनवलं

धर्मवीर संभाजी राजांनी हिंदवी स्वराज्य आणि धर्म संरक्षणाच कार्य हाती घेतलं आणि याचा त्रास मुघलांना व्हायला लागला.
जेंव्हा शंभुराजांना फितुरीने पकडण्यात आले त्यांना असंख्य मरण यातना भोगाव्या लागल्या. त्यांच्या शरीराचे क्रूरपणे हालहाल करण्यात आले.
जेंव्हा शंभुराजांना फितुरीने पकडण्यात आले त्यांना असंख्य मरण यातना भोगाव्या लागल्या. त्यांच्या शरीराचे क्रूरपणे हालहाल करण्यात आले.

संभाजी राजांना डोळे फोडणे, कानात शिसे ओतणे, जीभ कापणे यासारख्या शिक्षा ठोठावण्यात आल्या. तप्त लाल लोखंडी सळ्यांनी त्यांचे डोळे काढण्यात आले, एवढं सगळ होऊनही त्याच्या मुखातून आक्रोश निघाला नाही. ४० दिवस हालपेष्टा भोगून पण संभाजी राजांनी स्वराज्यनिष्ठा आणि धर्मनिष्ठा सोडली नाही.

मुघलांकडून धर्मांतरासाठी होत असणाऱ्या जाचाला त्यांनी भीक घातली नाही म्हणून त्यांना धर्मवीर ही पदवी बहाल केल्या गेली.
अखंड हिंदवी स्वराज्य हेच शंभुराजाच स्वप्नं!
पण आज दुर्दैवाने त्यांच्याच महाराष्ट्रात अखंड हिदुराष्ट्राची संकल्पना शेवटच्या घटका मोजत आहे. याला जबाबदार कोण?
अखंड हिंदवी स्वराज्य हेच शंभुराजाच स्वप्नं!
पण आज दुर्दैवाने त्यांच्याच महाराष्ट्रात अखंड हिदुराष्ट्राची संकल्पना शेवटच्या घटका मोजत आहे. याला जबाबदार कोण?

आज महाराष्ट्र पुरोगामी होतोय. काही कोम्रेडी धर्मद्वेष्टे लोक पूस्तक लिहून आणि वाचून आपल्या इतिहासाची टिंगल उडवतात त्याची हेटाळणी करतात.
सेक्युलर, डावे लोक खोटा इतिहास रंगवून सांगतात आणि आपण पण कधी कधी त्त्यांच्या खोट्याला बळी पडतो आणि ते आपलं मन वळवण्यात यशस्वी ठरतात.
सेक्युलर, डावे लोक खोटा इतिहास रंगवून सांगतात आणि आपण पण कधी कधी त्त्यांच्या खोट्याला बळी पडतो आणि ते आपलं मन वळवण्यात यशस्वी ठरतात.

स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेमध्ये अनाजी पंत रंगवून दाखवला आहे. कारण त्याने आपोआप ब्राह्मण द्वेषाचे मूळ समाजात रोवल्या जातील. परंतु संभाजी महाराजांच्या देहाचे लक्तर तोडणाऱ्या औरंगजेबाला आणि महाराजांना दिलेल्या यातनांना हवे तसे दाखविल्या गेले नाही कारण

त्यानी एका विशिष्ट समुदायाच्या भावना दुखावल्या गेल्या असत्या. आपण आपल्या राजांचा खरा इतिहास सांगू शकत नाही केवढी ही लाचारी!!
छत्रपतींना गोब्राम्हण प्रतिपालक असे संबोधले जायचे. त्यांचा ब्राह्मणांवर कधीच रोष नव्हता. पण आज छत्रपतींचे नाव घेऊन समाजात ब्राम्हण द्वेष पसरवल्या जातो.
छत्रपतींना गोब्राम्हण प्रतिपालक असे संबोधले जायचे. त्यांचा ब्राह्मणांवर कधीच रोष नव्हता. पण आज छत्रपतींचे नाव घेऊन समाजात ब्राम्हण द्वेष पसरवल्या जातो.

शंभूराजांनी हिंदू धर्माच्या सर्व जातींना नेहमी संरक्षण दिल आणि याची जाणीव म्हणून एका गणपत महाराने शंभुराजांवर अंत्यसंस्कार केले. यातून समाजातील सर्वच स्तरातील लोकांनां ते किती प्रिय होते याची प्रचिती येते परंतु हा इतिहास हेतुपुरस्सर बदलवून हिंदुच्या एकीमध्ये फुट पडण्याचा डाव

काही समाजकंटक नेहमीच करत आलेले आहेत.
आपल्याकडे आता पुरोगामीत्वाचे असे वारे वाहू लागलेत की खऱ्या खोट्याची शहानिशा न करता आपण ब्रिगेडी, सेकुलर यांच्या धर्मद्वेषी डावांना बळी पडत चाललोय आणि आपल्याच धर्माची अवहेलना करतोय!
आपल्याकडे आता पुरोगामीत्वाचे असे वारे वाहू लागलेत की खऱ्या खोट्याची शहानिशा न करता आपण ब्रिगेडी, सेकुलर यांच्या धर्मद्वेषी डावांना बळी पडत चाललोय आणि आपल्याच धर्माची अवहेलना करतोय!
विचार करा हिंदू धर्मासाठी आयुष्याची राख रांगोळी करणारे शंभूराजे सेकुलर कसे असू शकतील?
जरा विचार करा, काय म्हणत असेल आपल्या शंभुराज्यांचा आत्मा जेंव्हा आपल्याच लोकांकडून हिंदू धर्माची अवहेलना होतांना पाहत असतील?याच दिवसासाठी त्यांनी इतक्या मरणयातना भोगल्या होत्या का?
जरा विचार करा, काय म्हणत असेल आपल्या शंभुराज्यांचा आत्मा जेंव्हा आपल्याच लोकांकडून हिंदू धर्माची अवहेलना होतांना पाहत असतील?याच दिवसासाठी त्यांनी इतक्या मरणयातना भोगल्या होत्या का?
विचार करा हिंदूंनो जागे व्हा! धर्माचे रक्षण करा!
धन्यवाद

होतील बहु किर्तीवंत जगती।
सर्जासंभाजीसम होनार नाही।
जगतील बहु स्वयेची कारणे।
देशधर्मापायी ऐसा मरने नाही|
*धर्मविर संभाजी महाराज जयंतीच्या सर्व हिंदु बांधवांना हार्दिक शुभेच्छा*
#धर्मवीर_संभाजीराजे
धन्यवाद

होतील बहु किर्तीवंत जगती।
सर्जासंभाजीसम होनार नाही।
जगतील बहु स्वयेची कारणे।
देशधर्मापायी ऐसा मरने नाही|
*धर्मविर संभाजी महाराज जयंतीच्या सर्व हिंदु बांधवांना हार्दिक शुभेच्छा*
#धर्मवीर_संभाजीराजे