एखादा सजीव जिवंत राहतो ते साधारणपणे दोन गोष्टींमुळं, फिअर ऑफ डेथ आणि सरव्हाईवल इन्स्टिक्ट. फिअर ऑफ डेथ, मरणाची भीती त्याला नको तो आगाऊपणा करू देत नाही, म्हणजे ज्यामुळं मरायची, इजा व्हायची शक्यता असते. सरव्हाईवल इन्स्टिक्ट, जगण्याची ओढ त्याला जगण्यासाठी जे काही करावं लागेल (1/8)
ते ते करायला भाग पाडते. केव्हमॅन वाघाच्या भीतीने गुहेत लपून बसला, पण भूक लागल्यावर बाहेर पडलाच, नाहीतर भुकेनं मेला असता. बरं ह्या दोन्हीं त्याच्याजवळ असणाऱ्या साधन संपत्ती वर अवलंबून असतात, म्हणजे केव्हमॅन कडे खायला आहे का, वा भाला आहे का, यावरून त्याच्या फिअर ऑफ डेथ आणि (2/8)
सरव्हाईवल इन्स्टिक्ट च्या भावना बदलतात.
बरं आता हा शहाणपणा मी का सांगतोय? तर लॉकडाउन वाढवावा की नाही या निमित्ताने जी काही चर्चा चालू आहे त्यात माझा ही सहभाग असावा म्हणून. आपल्याकडे जे दोन वर्ग आहेत, एक आहे रे वाला आणि दुसरा नाही रे वाला. मी आहे रे या वर्गात मोडतो. (3/8)
म्हणजे माझ्याकडे राहायला एक प्रशस्त घर आहे, 2-3 महिने घराबाहेर न पडता जगता येईल इतका पगार, पैसा आहे. घरपोच सामान पोहोचवणाऱ्या सेवा मी घेऊ शकतो. मला उपाशी मारण्यापेक्षा करोना ने मरण्याची भीती जास्त आहे. मी जगतोय ते फिअर ऑफ डेथ मूळे. म्हणून मी लॉकडाउनचे समर्थन आणि पालन करणे (4/8)
साहजिक आहे. दुसरा जो वर्ग आहे नाही रे वाला, ह्यांच्याकडे रहायला घरं नाहीत, असली तरी इतकी लहान की एकाच्या श्वासांचा आवाज दुसऱ्याला ऐकू जाईल. पैसा आज कमावला तर आज पुरेल इतका, आणि साचवला असला तरी आठ-पंधरा दिवस पुरेल इतकाचं. होम डिलिव्हरी हा यांच्यासाठी पर्यायच नाहीये. (5/8)
हा नाही रे वर्ग जगतो सरव्हाईवल इन्स्टिक्ट च्या जोरावर. या वर्गाकडून लॉकडाउनचे समर्थन आणि पालन करण्याची अपेक्षा करणे म्हणजे ह्यांच्या जगण्याची आणि आपल्या समजूतदारपणाची खिल्ली उडविण्यासारखे सारखे आहे. खरंतर ह्यांच्या सोशिकपणाला दाद द्यावी असं आहे,इतके दिवस ही मंडळी साथ देत आलीत 6/8
उद्रेक करत रस्त्यावर उतरली नाहीत. नाहीतर आपण कांद्याचे भाव वाढल्याचा बातम्या पेपरात देतो आणि इथं यांच्या जगण्याचे वांदे झालेत तरी हे बातम्यात नाहीत. करोना पुण्याच्या पेठांमध्ये, मुंबईच्या धारावी मध्ये वाढतोय अन कोथरूड, बाणेर, बांद्रा मध्ये नाही याचं सरळ सरळ कारण आहे. (7/8)
कोथरूड, बांद्रा ने आत्ता तरी पेठा, धारावी कडे तुच्छ नजरेने पाहू नये. त्यांचं सरव्हाईवल इन्स्टिक्ट तुमच्या फिअर ऑफ डेथ ला भारी ठरणार आहे, मग समोर करोना असो वा पोलिसांच्या लाठ्या.

- @nayumtamboli यांच्या फेसबुक वॉलवरून..

(8/8)
You can follow @DhumalSpeaks.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: