महाभारताबद्दल उत्कंठा असल्याने वाचन आणि संदर्भ घेऊन एक धागा विणतोय..

• हा प्राचीन भारताचा पुराण काळातील नकाशा आहे.
• नकाशा पहा आणि प्राचीन काळातील आपल्या प्रदेशाचे नाव पहा.
#महाभारत #मराठी #म
• महाभारत हा प्राचीन भारताचा विश्वकोश आहे.
खरंतर भौगोलिक तपशील प्रचंड व्यापक आहेत.
यामध्ये प्रत्येक क्षेत्राचे मी तपशीलवार वर्णन केले आहे.

• वायव्येला अफगाणिस्तानमध्ये यवना नावाचा देश आहे.
• हिंदुकुशच्या पूर्वेकडे अश्वक आणि कंबोज देश आहे.
• अफगाणिस्तानातील कमविरी नुरिस्तानी, पंजाबचे कंबोज आणि आंध्र प्रदेशातील कम्मस हे त्यांचे अंशतः वंशज असू शकतात.
• यांच्या पूर्व दिशेला सीना, लडाक (लडाख) आणि रामठा (भोतास), स्रीराज्य हे देश आहेत. हे सर्व तिबेटी लोक होते. चिनी लोक महासीन म्हणून ओळखले जात.
• कंबोजच्या दक्षिणेस गांधारचा देश आहे ज्याची राजधानी तक्षशिला आहे.
• हा सध्याचा अटक-स्वात-चारसद्दा-पेशावर-इस्लामाबाद प्रदेश आहे. गांधारच्या दक्षिणेस केकयाचे राज्य आहे, जे झेलम व सिंधु खोऱ्यात येतो. हा आता पाकिस्तानातील खानांचा प्रदेश मानला जातो.
• त्याच्या दक्षिण दिशेला सिबी आणि त्याची राजधानी सिबीपुरा (जे हल्लीचे सेवान आहे) आहे.

• त्याच्या पूर्वेकडे पंजाबच्या माझा भागात मद्र हे प्राचीन राज्य आहे. त्याच्या पूर्वेस इरावती (रावी) नदीच्या दुसर्‍या बाजूला वहिका प्रदेश आहे.
• या नकाशामध्ये बहलिकस हा प्रदेश खरेतर अफगाणिस्तानच्या बल्खमधील आहे.

• वहिकाच्या उत्तरेस सकला (हल्लीचे सियालकोट) येथे राजधानी असलेल्या त्रिगर्ताचे राज्य आहे. हा जम्मू-सियालकोट प्रदेश आहे.
• त्याच्या उत्तरेस काश्मीरचे राज्य (कस्मिरा) असून त्याची राजधानी राजापुरा (राजौरी) येथे आहे.
• इथे नोंद करावी लागेल की नंतर श्रीनगर राज्य अशोका यांनी स्थापित केले होते. तसे ते इथे दिसत नाही.
• काश्मीरच्या उत्तरेस दारादासचे राज्य (गिलगिट-चित्रल-यसीन) आहे.

• त्रिगर्ताच्या पूर्वेस "औदुंबर" हे राज्य आहे जे हिमाचलमधील प्राचीन राज्य आहे. त्याच्या पूर्वेकडे खासांचे राज्य आहे जे लोक "कुरा" बोलणारे नेपाळी लोक आहेत.
• विशेषत: महाराष्ट्र आणि सिंधु-सतलज खोऱ्यात अजूनही माळव्या चा वारसा आहे. महाभारतानंतरच्या काळात माळव्याच्या नेतृत्वाने पंजाब पूर्व ते मध्य प्रदेशपर्यंतच्या प्रदेशावर विजय मिळविला.

• पूर्व पंजाबचा (लुधियाणा) आणि मध्यप्रदेशचा माळवा अजूनही काही प्रमाणात या जमातीच्या नावावर आहे.
• यौधेयांनी पूर्वेकडील हरियाणा प्रदेश जिंकला. त्यांनी आपली राजधानी रोहिताक (रोहतक) येथे स्थापित केली.
• पंजाबच्या दक्षिणेस 'सौवीरा' प्रदेश आहे, जे सिंध-मुल्तानचे लोक 'सरायकी' भाषा बोलतात.
• यांच्या पूर्वेकडे कुरु राज्य आहे, जो आत्ताच्या दिल्लीच्या शेजारील हरियाणा आहे. इंद्रप्रस्थ (दिल्ली) आणि हस्तिनापुरा (मेरठ) ही दोन राजधान्या होत्या. त्यांच्या आग्नेयेस पांचाळांचे राज्य आहे. त्यातही दोन राजधान्या होत्या. उत्तरेकडील "अहिच्छत्र" आणि दक्षिणेस असलेली "कांपिल्या".
• द्रोणांचा पुत्र "अश्वत्थामा" यांनी अहिच्छत्र या प्रदेशावर राज्य केले.

• गुरुदक्षिणा म्हणून अर्जुनाने द्रोणांना, राजा द्रुपद यांसमोर कैद करून आणले. त्यानंतर राजा द्रुपद यांनी द्रोणांना अहिछत्र चे राज्य दिले आणि त्यांची सुटका केली. (महाभारत, आदीपर्व, भाग १३७, श्लोक ७३ ते ७६)
• पांचाळांच्या पश्चिमेस "यदुस" यांचे राज्य आहे. ज्याची राजधानी मथुरा. त्यांच्या दक्षिणेस "कुंतला" (ग्वाल्हेर) आणि "निशद" (बुंदेलखंड) राज्य आहे व त्या पश्चिमेस इतर यदुस टोळ्यांनी 'अंधक' आणि 'सुरसेना' जिंकले होते.
• मत्स्य राज्य हे जयपूरचाच एक भाग होते व ज्याची राजधानी विराटनगर (सध्याचे बैराट) येथे आहे.

• वत्स हा प्रयागचाच एक भाग होते ज्याची राजधानी प्राचीन 'कौशाम्बी' होय. "मगध" राज्य म्हणजे सध्याचे 'पाटणा', ज्याची राजधानी गिरीव्रज(राजगीर) होय.
• उत्तर बिहार (मिथिला) प्रदेश 'विधेय' यांनी स्वारी करून बळकावला होता. त्यांची राजधानी 'मिथिला' होती.
• वृजसांची राजधानी श्रावस्ती (बलरामपूर) ही होती. त्यांच्या पश्चिमेस कोसलांचे राज्य होते ज्याची राजधानी ''अयोध्या'' होती !
• आंध्रच्या पश्चिमेस कुंतल राज्य होते जे सध्याचे "उत्तर कन्नड" आणि दक्षिण महाराष्ट्राचा थोडाफार प्रदेश. कुंतलच्या वायव्येस गोवा प्रदेश होता ज्याला त्यावेळी "अपरांत" म्हणून ओळखले जाई. कुंतलच्या नैऋत्येस कोंकण प्रदेश जो आजही कोंकण म्हणून ओळखला जातो !
व दक्षिणेस कर्नाटचे साम्राज्य आहे ज्याचा बंगळूर प्रदेश प्रसिद्ध होता.
• कर्नाटच्या दक्षिणेस तामिळींचे ३ मोठे प्रदेश होते.
द्रविड देश, राजधानी कांची. त्याच्या अगदी दक्षिणेस पांड्यांचा देश, राजधानी मदुरा (सध्याचे मदुराई). कावेरी नदीच्याकाठी चोलांचा देश.
• दक्षिण कोंकणचा भाग असलेली गोकर्ण नगरी तर महाभारतात सुप्रसिद्ध आहे. ज्याला भगवान शिवांचे आवडते ठिकाण संबोधले गेले आहे.

• त्याच्याच दक्षिणेस अत्यंत संहारक अशा अगस्त्य यांची वसाहत होती. तेथेच वतापि यांचेही राज्य होते ज्याचा पौराणिक कथांमध्ये उल्लेख आढळतो.
• मध्य भारतात साधारणपणे माळवा आणि पश्चिमेचा मध्य प्रदेश यांच्याशी संबंधित "अवंती" चा प्रदेश होता.
ज्याच्या आजूबाजूस विदर्भ, कर्णप्रवर्ण, भोज वगैरे राज्ये येत.

• उज्जयानी (उज्जैन) ही उत्तर अवंती प्रदेशाची राजधानी व महिष्मती ही नर्मदा नदीकाठावरील दक्षिण अवंतीची राजधानी होती.
• महाभारतातील कर्ण पर्व (१२.१५) : तिन्ही राज्ये : पांड्य, केरळ आणि चोल ही "द्रविड" या नावानेच एकत्र जोडली होती.

• उंचेपुरे आणि रुंद छाती असलेले योद्धांची भूमी योद्धा असे वर्णन आढळते.
द्रविड = आजचा तामिळनाडू आणि केरळ यांचा संपूर्ण प्रदेश.

#महाभारत #भारत #प्राचीन #मराठी #म
• महाभारतात दक्षिणेच्या पांड्य राजाने पांडवांच्या बाजूने युद्ध केले. त्याने दुर्योधनाच्या सैन्याची अमाप कत्तल केली.

• त्याने बहलिक, खास, कुंतल याविरुद्ध सुद्धा लढा दिला. महाभारतात त्याच्या शौर्याची स्तुती केली गेली. तो द्रोणाचा शूर पुत्र अश्वत्थामाप्रमाणे शूरवीर होता.

#मराठी
• महाभारताच्या म्हणण्यानुसार, महिष्मतीने अग्निदेवतेला प्रसन्न करून स्वतःला एका सुरक्षित किल्ल्यात ठेवले होते, जो किल्ला अजिंक्य होता.

• परंतु सहदेव ने यज्ञ करून अग्नी देवतेला शांत केले व सर्व जिंकून घेतले.

#महाभारत #मराठी #म
• कलिंगच्या उत्तरेस “ओद्रस” देश होता जो आजचा “पश्चिम ओडिशा” आहे. हा प्रदेश महेंद्रगिरी पर्वतासाठी प्रसिद्ध होता.
• महाभारत आणि रामायणानुसार भगवान परशुरामांचे हे विश्रामस्थान होते.

#महाभारत #मराठी #म #भारत #सिंधू #हिंदू
• आजच्या ईशान्यमधील "मणिपूर" हे नाव १६ व्या शतकानंतर पडले. (हे पूर्वी कांगेलीपाक नावाने ओळखले जात असे)
#भारत #महाभारत #मणिपूर #पुराण #मराठी #म
• ब्राह्मण नदीच्या उत्तरेस “उत्कल” प्रदेश होता. 'वंग' जो देश होता, जो आज दक्षिण बांगलादेशचा पद्म प्रदेश आहे. (गंगेचा त्रिभुज प्रदेश त्याच्या पूर्वेकडील भाग)
• भव्य भारताचा दिव्य इतिहास समजेल आणि सांगेल तितका थोडा आहे.

- @malhar4you | मल्हार

#भारत #महाभारत #इतिहास #मराठी #म
You can follow @malhar4you.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: