रॉबिनहूड चव्हाण: पृथ्वीबाबांची परीकथा!

१. सध्याचा क्रायसीस हा सप्लाय चेन डिसरप्शनचा आहे. म्हणजे काय ? सोप्या भाषेत- समजा तुम्हाला वडापाव खायचा आहे! आता या एका वडापावसाठी बऱ्याच साखळ्या काम करत असतात. उदा. शेतीतून बटाटा पिकवून तो वडापाववाल्याकडे पोचवणे, बेकरीतली पावलादी 1/16
त्याच्याकडे येणे, त्यांच्यापर्यंत तेलाची पिशवी, मीठमसाला, शेगडीचा गॅस, भांडीकुंडी इ. पोचणे याला म्हणतात सप्लाय चेन! सध्याचा मुख्य प्रॉब्लेम हा नाहीये की तुमच्याकडे पैसे नसल्यामुळे तुम्हाला वडापाव खाता येत नाहीये. प्रॉब्लेम हा आहे की या सप्लाय चेन लॉकडाऊनमुळे उध्वस्त 2/16
झाल्यात! म्हणजे बटाटा गोदामात पडून आहे, पाव बनत नाहीयेत आणि मुख्य म्हणजे वडापाव करायला गाडी लावायला तो माणूस पोलिसांच्या भीतीने धजत नाहीये. आशा अवस्थेत तुम्ही बाजारात पैशाचं पोतं किंवा सोन्याचा गोळा घेऊन गेला तरी तुम्हाला वडापाव मिळणार नाही! कारण सप्लाय चेन वस्तू-सेवा तयार 3/16
करत असते, पैसा आणि सोनं नाही!! म्हणजे जोपर्यंत आपण लॉकडाऊनबद्दल नीट धोरण आखून सप्लाय चेन सुरळीत करत नाही, तोपर्यंत देवळं सोडाच, जगातलं सोनं आपण जमवून आणलं तरी त्याने इकॉनॉमी सुधारत नाही! फारतर सोन्याचे भाव पडायला मदत होईल!!

२. याची गरज आहे का ? सोनं आहे तेवढेच पैसे 4/16
छापायची दुनिया म्हणजे गोल्ड स्टॅंडर्ड करन्सी निक्सनने डॉलर गोल्डपासून डिकपल केल्यानंतर संपली! आज आपण बघतो त्याला फियाट मनी म्हणतात. म्हणजे काय ? तर आजचा छापलेला पैसा हा सरकारकडे असलेल्या सोन्यापेक्षा आपला सरकारी व्यवस्थेवर असलेला विश्वास दर्शवत असतो! म्हणूनच अमेरिकन फेडरल 5/16
रिजर्व्ह दोन महिन्यात जवळपास सात-आठ ट्रीलीयन डॉलर्सची लिक्विडीटी इंजेक्ट करू शकते. म्हणूनच 20 लाख करोडच्या पॅकेजमधलं बरंचसं आपली आरबीआय बँकांना लिक्विडीटी देऊन पुरवू शकते! अमेरिकन फेडरल रिजर्व्हने गेल्या दोन महिन्यांत पुरवलेली लिक्विडीटी ही पृथ्वीराज चव्हाणांच्या 6/16
ट्विटमध्ये आपल्याकडे जेवढं सोनं आहे,त्याच्या आठ पट आहे! तरी अमेरिकेत सप्लाय चेन दुरुस्त झाल्या का ? उत्तर नाही असं आहे!! सध्या जी काही लिक्विडीटी पुरवायची त्याला सेंट्रल बँका सक्षम आहेत. त्यांच्याकडे ते करण्यासाठी असलेला टूलबॉक्स आजकाल प्रचंड विस्तारलेला आहे. यात रेपो 7/16
ऑपरेशन्स, डायरेक्ट असेट पर्चेसेस, क्वांटीटेटिव्ह इजिंग, रेट कट्स इ. बरेच पर्याय समाविष्ट आहेत. त्यासाठी चव्हाणांनी रॉबिनहूड बनून धार्मिक संस्थांची संपत्ती लुटायची किंवा सक्तीने कर्जावर घ्यायची गरज नाहीये.

३. आता पुढचा भाग ! हे शक्य आहे का ? एकतर हे राजकीय दृष्ट्या अशक्य 8/16
हे!! धर्मस्थळे मग ती देवळं असोत किंवा वक्फ बोर्ड किंचा चर्च ही आपल्याकडे "आर्टिफिशियल जुरीडीकल पर्सन" मानली जातात. म्हणजे जसे प्रॉपर्टी राईट्स तुम्हाला आम्हाला आहेत तसेच त्यांनाही आहेत. आपल्याकडे प्रॉपर्टी राईट्स हा आता मूलभूत हक्क नाहीये. तो एक लीगल हक्क आहे. म्हणजे 9/16
माणसाचा प्रॉपर्टी राईट आणि "आर्टिफिशियल जुरीडीकल पर्सन" यांच्यात फार फरक नाही. नाहीतर शाबरीमाला प्रकरणांत महिलांना आपल्या मूलभूत हक्काचं गाऱ्हाणं घेऊन सुप्रीम कोर्टात इतकी जीवतोड लढाई करावी लागली नसती! तेच कशाला, केशवानंद भारती हा सुप्रसिद्ध खटला हा मुळात केरळ सरकारने एका 10/16
मठाच्या संपत्तीवर बळजबरी टाच आणायचा प्रयत्न केला म्हणूनच सुरू झालेला!! म्हणजे आणीबाणी लावली तरी सर्व धर्मस्थळांना त्यांचं सोनं आम्हाला कर्जाने द्या असं म्हणायची सक्ती करणं सरकारला घटनात्मक दृष्ट्या अवघड आहे, आणि ते आजच्या काळात, कोर्टात टिकणे त्याहून अवघड आहे. कारण जो 11/16
कायदा आर्टिफिशियल जुरीडीकल पर्सनची जागा, सोनं बळकावू शकतो तोच कायदा तुमची-आमची जागा-सोनंसुद्धा बळकावू शकतोच!! हा गंभीर धोका आहे. अशाच माओस्टाईल क्रांत्या रोखण्यासाठी संविधान बनवलं गेलं आहे. याशिवाय राजकीयदृष्ट्या मोदी हे करायची रिस्क घेणे अजिबात शक्य नाही!

यामुळे 12/16
पृथ्वीराज चव्हाणांच्या आयडियेचा ना उपयोग आहे, ना गरज आहे, ना वास्तवात ती उतरण्याची शक्यता आहे! पृथ्वीराज चव्हाण यांनी ते मोदी सरकारला खिजवण्यासाठी म्हटलं असेल तर आनंद आहे. पण त्यांचं ट्विट आमच्या पुरोगामी मित्रांनी ज्या जोशाने डोक्यावर घेतलं आहे ते बघून त्या परिकथेची अशी 13/16
साग्रसंगीत चिरफाड करणे हे आमचं नैतिक कर्तव्य आहे असं आम्हाला वाटत होतं!! पृथ्वीबाबा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत, सुशिक्षीत आहेत, राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यांनी अशी बेजबाबदार, मूर्खपणाची आणि उपयोग कमी, उपद्रव जास्त असलेली विधाने करू नयेत अशी आमची अपेक्षा 14/16
आहे...

टीप: नास्तिक मित्रांसाठी! मंदिराचं सोनं पळवून लोक नास्तिक होत नसतात. मशिदी पाडून लोक धर्म सोडत नसतात. चर्चची जमीन घेतली म्हणून लोकांच्या अंधश्रद्धा संपत नसतात. तुमच्या धर्म सोडून, धर्मस्थळांना घोडे लावायच्या फेटिशसाठी संविधानाच्या उरावर प्रायव्हेट प्रॉपर्टी 15/16
बळकवणारा माओ बसवायची तुमची इच्छा असेल तर तुम्ही मूर्ख आहात! धर्म संपलेले आम्हालाही हवेच आहेत. पण त्यासाठी ही रॉबिनहूडगिरी उपयोगाची नाही! एका परिकथेला मारायला दुसरी परीकथा उपयोगी नसते!! 16/16
संदर्भ:
You can follow @makmd.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: