#THREAD
विषय:- कोकण

आज जरा कोकणी गाणी ऐकली आणि कोकणाबद्दल लिहावसं वाटलं.कोकणात आत्तापर्यंत किती वेळा गेलो आहे याचा काही नेम नाही,कधी घरच्यांसोबत,तर कधी मित्रांसोबत तर कधी एकटा.

#मल्हारवारी

(1/10)
कोकण म्हणलं कि समोर दिसतो निळ्याशार आकाशाच्या खाली असलेला अथांग सागर आणि उंच उंच नारळाची झाडं.कौलारू घरं,शेणाने सरावलेली अंगण त्या पुढे असलेले तुळशी वृंदावन आणि त्या घराच्या आवारात असलेली काजूची बाग !
(2/10)
पु ल म्हणतात तसं कोकणातली मंडळी अगदी फणसासारखी,बाहेर काटेरी पण आतून मात्र प्रचंड गोड.मी आजवर जेव्हा जेव्हा कोकणात गेलो आहे तेव्हा तेव्हा कुणाच्यातरी घरीच राहिलो आहे .माणूस अनोळखी जरी असला तरी आपले घरचेच आहेत असेच वाटत हि कोकणी माणसं.
(3/10)
या भागाबद्दल बोलायला शब्द खरंच पुरणार नाहीत,समोर कधी डोंगराळ भागातून तर कधी घनदाट जंगलातून जाणारी ती कोंकण रेल्वे दिसते तर कधी कधी नागमोडी वळण असलेले समुद्रकिनारचे रस्ते दिसतात.
(4/10)
इथे असलेली मंदिरं आणि इथे असलेले किल्ल्यांविषयी तर काही बोलायलाच नको, गणपती पुळ्याचे लाल विटात बांधलेले सुंदर मंदिर समोर दिसते तर कधी अवाढव्य असा जंजिरा किल्ला समोर दिसतो !
(5/10)
अलिबाग चा किनारा आणि थोड्याच अंतरावर असलेला अलिबाग चा किल्ला दिसतो तर कधी मुरुड चा किनारा समोर दिसतो !
(6/10)
त्या टीपीकल कोकणी खानावळी जिथे सोलकढी,भात आणि सुरमई मिळतात हे आठवते तर कधी टोपली मध्ये मोदक विकणारी ती गल्लोगल्ली फिरणारी आजी डोळ्यासमोर उभी राहते.
(7/10)
या सगळ्यात तुम्ही म्हणत असाल आंबा विसरलास कि काय ? आंबा मुद्दामहूनच विसरलो कारण तो आठवला कि कारण नसताना तोंडाला पाणी सुटेल आणि या काळात तो सुंदर,केशरी,रसाळ देवगड हापूस त्या किनाऱ्यावर बसून खाता येणार नाही हे आठवून दुःख सुद्धा होईल !
(8/10)
खरंच या कोकणात काहीतरी वेगळं आहे,विलक्षण ऊर्जा आहे या भागामध्ये,एकदम vibrant आहे हे ठिकाण ! खरंच आपण भाग्यवान आहोत, कि आपण अश्या राज्यात जन्माला आलो आहोत जिथे सगळं काही आहे.
(9/10)
उंच आणि भलामोठा सह्याद्री पण इथेच आहे आणि शांत सोज्वळ अशी कोकणची किनारपट्टी पण इथेच आहे !
कधी एकदा हे lockdown संपतंय,कधी एकदा आपले आयुष्य सुरळीत चालू होतंय आणि कधी एकदा मी माझी बुलेट काढून कोकणात जातोय असं झालंय !
(10/10)
कोकणाबद्दल लिहायला बरंच काही आहे ! त्याला हे थ्रेड अजिबात पुरणार नाहीत ! असो,तुमच्याकाही कोकणातल्या आठवणी असतील तर कमेंट मध्ये जरूर कळवा!
#मल्हारवारी
You can follow @malhar_pandey.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: