#THREAD

किल्ले.५- लोहगड

पावसाळा आला कि पुण्यातला प्रत्येक विद्यार्थी हि सकाळची पहिली लोकल पकडून लोहगड पाहायला जातो ! लोहगड हा ट्रेकिंग साठी एक सुंदर स्पॉट आहे म्हणून अनेकांना हा किल्ला भावतो ! ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाच्या अश्या ह्या किल्ल्याची सैर आज !
(1/27)

#मल्हारवारी
सकाळी लवकर पुणे स्टेशन ला पोहोचून लोणावळ्याला जाणारी लोकल पकडून,लोणावळ्याच्या अलीकडील स्टेशन ला उतरायचे ! हे गाव म्हणजे मळवली गाव ! याच गावापासून थोड्याच अंतरावर आहे तो लोहगड.
(2/27)
मळवली ला उतरल्यावर निसर्ग रम्य वातावरणात गरम गरम भजी,कडक चहा पिला कि आपण लोहगडापर्यंत जायला अगदी ताजे तवाने होतो ! स्टेशन बाहेर लोहगडापर्यंत जायला अनेक गाड्या असतात ! पण ट्रेकर्स साठी या गाड्या नाहीत !
(3/27)
समजा स्वतःच्या गाडीने निघालात तर स्वारगेट,बाणेर,ताठवडे,कामशेत अशी जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील गावं करत जावं लागतं.याच मार्गावर भाजे या गावाकडे जायला फाटा लागतो आणि हा फाट्या ला गाडी वाळवून आपण भाजे,मळवली आणि लोहगडास येऊन पोहोचतो !
(4/27)
भाजे ह्या गावामधून जात असताना डाव्या हाताला एक फाटा दिसतो,हाच रास्ता आपल्याला प्राचीन भाजे लेणींकडे घेऊन जातो ! तर भाजे गावा पासून अंदाजे ४ किलोमीटर अंतरावर लोहगड आहे.गाड्या अगदी लोहगडाच्या पायथ्या पर्यंत येऊन थांबतात!
(5/27)
खरंतर,लोहगड आणि विसापूर हि दोन भावंडं इंद्रायणीच्या खोर्याला पहारा देत बसली आहेत अशीच वाटतात !विसापूर आणि लोहगड या किल्ल्यांच्या उत्तरेकडून पवना वाहते तर दक्षिणेतून पवना.इथूनच जवळ तुंगी आणि तिकोना असे दोन किल्ले आहेत
(6 /27)
या सगळ्या किल्ल्यांपेक्षा बळकट आणि उपयोगी असा किल्ला म्हणजे किल्ले लोहगड.या किल्ल्याची रचना पाहण्यासारखी आहे.लोहगड बराच जुना आहे हे आजूबाजूच्या परिसरात जे अवशेष मिळतात त्यावरून कळ
( 7/27)
म्हटलं जातं कि हा किल्ला सातवाहन काळाच्याही आधीचा आहे. भाजे लेणी या प्राचीनतेचे प्रमाण देते.राष्ट्रकूट,चालुक्य,सातवाहन,यादव अश्या सर्वच राजवटी या किल्ल्याने पहिल्या आहेत असं म्हणायला हरकत नाही.
(8 /27)
मलिक अहमदच्या निजामशाहीच्या स्थापने नंतर हा किल्ला इ.स. १४८९ मध्ये यावनी शासनात गेला. त्या नंतर बरेच वर्ष हा निजामशाहीत होता,त्या नंतर १५६४ साली नगरचा बुऱ्हाणशहा लोहगडावर कैद होता.असे अनेक वर्ष उलटून गेली आणि शेवटी हा किल्ला पुन्हा एकदा आपल्या ताब्यात आला.
( 9/27)
१६४८ साली शिवाजी महाराजांनी लोहगड जिंकला,पण १६६५ च्या जयसिंग शी केलेल्या तहात हा किल्ला महाराजांना पुन्हा द्यावा लागला.१६७० साली महाराजांच्या मावळ्यांनी हा किल्ला पुन्हा जिंकला आणि स्वराज्यात दाखल केला.
(10 /27)
१६९० च्या दरम्यान कान्होजी आंग्रे यांच्या कडे हा किल्ला होता,ह्या किल्ल्यावर छत्रपती शाहू महाराजांचे पेशवे बहिरोपंत पिंगळे हे अटकेत होते,त्यांना सोडवायला म्हणून शाहू महाराजांनी बालाजी विश्वनाथ अर्थात बाजीराव पेशवा यांना कान्होजींच्या विरुद्ध लढायला पाठवले.
( 11/27)
पण बालाजी विश्वनाथांनी वाटाघाटीचा मार्ग स्वीकारून कान्होजी आंग्रेना शाहू महाराजांच्या सैन्यात दाखल केलं आणि कान्होजीना कोकणचे संरक्षण करण्याचे कार्य मिळाले. शाहू महाराजांनी कान्होजी आंग्रेना 'सरखेल' म्हणून नेमले.
(12 /27)
असे करत करत हा किल्ला १८१८ पर्यंत आपल्या कडे होता. १८४५ साली हा किल्ला इंग्रजांच्या फौजेचे घर झाला.
ह्या किल्ल्यावर अनेक ऐतहासिक प्रसंग घडले. आता येउयात किल्ल्यावर असलेल्या वास्तूंकडे,गोष्टींकडे.
( 13/27)
लोहगाव हे गाव लोहगडाच्या पायथ्याला वसले आहे,हि लोहगडाचे पेठ.इथून थोड्या अंतरावर आपल्याला लोहगडावर जाण्याच्या पायऱ्या दिसू लागतात.लोहगडावर एकूण ४ दरवाजे आहेत.गणेश,नारायण,हनुमान आणि नारायण असे हे चार दरवाजे.
( 14/27)
गडाच्या आजूबाजूचा परिसर हिरवागार आहे.इथे येणाऱ्या प्रत्येकाला याच निसर्गाच्या सानिध्यात कायम राहावे असं जरूर वाटतं! मला तर आता हे लिहताना सुद्धा अंगाला स्पर्श करून गेलेल्या त्या गार वाऱ्याचा झोका जाणवला!
या किल्ल्यावर हवा कायमच सुखद असते !
( 15/27)
लोहगडाचे चारही दरवाजे एकदम मजबूत आहेत आणि बघण्यासारखे आहेत,रचना जबरदस्त आहे. किल्ल्यावर डाव्या हाताला एक दगडी इमारत आहे.इथेच दोन मुस्लिम कबरी आहेत. इथे अनेक जुने पुराणे अवशेष आहेत.
इथे सदर होती असं म्हणलं जातं.
(16 /27)
इथून पुढं एक छोटीशी टेकडी आहेसाधारण शंभर दीडशे फुटाची,इथे गुहा आहे,म्हणलं जातं कि हि गुहा लोमेश ऋषींचे तपश्चर्या स्थळ होते. या टेकडीवर किल्लेदारयांच्या वाड्यांचे अवशेष आहेत. तिथून थोड्या अंतरावर भली मोठी बारव आहे,तिथून खाली उतरायला पायऱ्या आहेत.
( 17/27)
उतरायच्या मार्गावर एक शिलालेख आहे,जरा अस्पष्ट आहे पण गो नि दांडेकरांच्या पुस्तकात त्याचा उल्लेख आढळतो.त्या शिलालेखवर लिहले आहे."शके १७११ मध्ये हे तळे बालाजी जनार्दन भानू(नाना फडणवीस) यांनी बांधले.
( 18/27)
गडावर त्र्यंबकेश्वराचे जुने मंदिर आहे आणि दोन तळी आहेत.तिकडवरून पुढं गेली कि किल्ल्याचा मुख्य भाग संपतो आणि विंचूकाटा नावाची एक सोंड लागते,हिच्यावर असलेला बुरुज संबंध इंद्रायणी खोर्यावर पहारा देतो आहे असच वाटतं !
( 19/27)
लोहगड पाहायला साधारण एक दिवस पुरतो,सकाळची पहिली लोकल,सूर्योदय व्ह्याच्या आधी किल्याच्या माथ्यावरून दिसणारा सूर्योदय काही वेगळाच अनुभव देऊन जातो. जायला काय आपण कधीही जाऊ शकतो,पण काही असे क्षण असतात जे आपल्याला आपल्या comfort zone च्या बाहेर जाऊनच अनुभवयाला लागतात.
( 20/27)
लोहगडाच्या माथ्यावर तिथल्या हिरव्यागार गवतात बसून आपण जेव्हा निसर्गाचा आनंद घेत असतो आणि पुढे इमारतींचे अवशेष पाहत असतो तेव्हा मन भरून येतं.कधीकाळी या ठिकाणी आपले पूर्वज येऊन गेले आहेत,महाराजांचे पाय या भूमीला लागले आहेत,हि भावनाच मुळात भारावून टाकणारी आहे.
( 21/27)
मी प्रत्येक वेळेला म्हणतो तसं,कोणतीही ऐतिहासिक वस्तू हि जिवंत असते आणि तिला आपल्याशी बोलायचं असतं.तिच्या कडे सांगायला अनेक कहाण्या असतात पण ऐकणारे कमी असतात !
( 22/27)
गड किल्ल्यांवर जाऊन selfie काढणारे अनेक जण असतात पण त्या वस्तूची कहाणी ऐकणारे कमी ! फोटोज जरूर काढा,पण त्या वस्तूचा आदर करून.तिथले बुरुज,ते अवशेष हे सगळे इतिहासाची साक्ष देत उभे असतात !
( 23/27)
आजही ते आपल्या इतिहासाची शौर्यगाथा सांगत असतात ! आपण खऱ्या अर्थाने भाग्यवान आहोत कि आपण या पवित्र,कणखर आणि दगडांच्या महाराष्ट्र देशात जन्माला आलो आहोत,जेव्हा कधी या किल्ल्याला जाल तेव्हा पहिल्या आणि शेवटच्या पायरीला डोकं टेकवून नमस्कार करायला विसरू नका.
( 24/27)
जेव्हा कधी या किल्ल्याला जाल तेव्हा पहिल्या आणि शेवटच्या पायरीला डोकं टेकवून नमस्कार करायला विसरू नका.इथे महाराज येऊन गेले आहेत !
( 25/27)
आजची #मल्हारवारी कशी वाटली ते जरूर कळवा,तुमच्या कडे काही अजून माहिती असेल,फोटो असतील ते जरूर टाका आणि पुढे कुठे जायचे तेही कळवा !
(26/27)
बोला,पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज कि जय..🚩
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज कि जय...🚩
सनातन हिंदू धर्म कि जय.......🚩
(27/27)
11 नंबर ट्विट मध्ये एक चूक झाली आहे!
बालाजी विश्वनाथ अर्थात बाजीराव पेशवा यांचे वडील असे असले पाहिजे होते!
You can follow @malhar_pandey.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: