@CMOMaharashtra COVID Test चा अनुभव शेयर करतोय. बघा ह्यातून काही बोध घेता आला तर. मी YCM - पिंपरी मध्ये admit होतो, COVID टेस्ट साठी. देवाकृपेने test negative आली आहे अजूनतरी. मा.मु. साहेब आपली यंत्रणा कोरोना शी लढण्या बाबत तितकीशी चांगली नाही.(1)
येताना रुग्ण negative असतो,test झाल्यानंतर-टेस्ट results पण negative येतात, पण घरी सोडल्या नंतर तो १४ दिवसांनी positive होऊन येणाची शक्यता १००% आहे, कारण positive आणि negative दोन्ही प्रकारचे रुग्ण एकाच ठिकाणी ठेवले जातात. स्वछता zero आहे. Hygiene झिरो आहे साहेब. (2)
माझ्या वॉर्ड मध्ये ३ positive सापडले ६०-७० लोकnegativeआले. साहेब महाराष्ट्र कोरोना सोबत लढण्यासाठी सक्षम नाही हे मी स्वतः अनुभवून सांगतोय मागच्या दोन दिवसांपासून. आपण लक्ष द्या नाहीतर महाराष्ट्रा चा इटली व्हायला एक महिना पण लागणार नाही.प्रत्येक patientला separate पार्टीशन द्या(3)
हे कदाचित एकदम शक्य नाही पण होणार पण हळू हळू करता येईल. हि काळजी नाही घेतली तर शेवटी negative सुद्धा positive होऊन घरी जातो. आणि ह्याचा नंतर फक्त गुणाकार च होईल आणि सरतेशेवटी हाती शून्य उरेल. सगळ्यात जास्त धोका तिथे आहे.(4)
हे आता लक्षात येणार नाही साहेब, हातातून वेळ गेलेली असेल तेव्हा आपला Italy झालेला असेल. मी हे सगळं भोगून आलोय मागच्या दोन दिवसात म्हणून महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने कळकळीची विनंती करतोय. घरा -घरात जाऊन टेस्ट करण्यापेक्षा जास्त चांगला उपाय नाही. (5)
मला माहित आहे हे practically शक्य नाहीये ह्या वेळेला, पण कदाचित पुढे जाऊन विचार करून ह्या वर तोडगा काढता येईल. कोरोना चा नेमका आकडा कधीच समोर येणार नाही कुठल्याच देशात आणि कुठेच, कारण, जे ३ positive आलेत ते सगळेच asymptomatic होते. Asymptomatic असण्याची शक्यता ९५% आहे. (6)
ह्याला कोणीच जबाबदार नाही, घरी बसणार्यांना असंच वाटतंय आपल्याला नाही पण तसं नाहीये. मला घाबरवायचा नाहीये पण मी हे माझ्या उघड्या डोळ्यांनी बघून आलोय. Asymptomatic च्या बाबतीत एकच करू शकतो सरसकट सगळ्यांचा टेस्ट करून,positive वाल्याना isolate करा.(७)
मी माझ्या नरक यातना भोगून आलोय बाकी कोणाला तसं काहीही होऊ नये हे ईश्वरचरणी प्रार्थना. बाकी साहेब आपण सुज्ञ आहातच अजून काही बोलणे न लागे. बघा जातीने लक्ष घालता आलं तर. Front foot येऊन लढा आणि खेळा, साहेब घरी बसून FB live करून काहीच हाती लागणार नाही. (8)
दिसले तर प्रेताचे खच च दिसतील Ecuador सारखे येणाऱ्या काळात जे उचलायला लोकच राहणार नाहीत. शहरांची, गावांची स्मशानभूमी करू नका साहेब. परिस्थिती वाटते तितकी सोपी नाही माझ्या अनुभवावरून सांगतोय. बाकी देव आपणास सद्बुद्धी देवो. जय महाराष्ट्र! (End)
You can follow @akhand_sindhu.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: