@ICMRDELHI या आपल्या संस्थेने ५ लाख COVID-19 rapid test kit ची खरेदी चीनमधून केली. ही खरेदी सरळ उत्पादकांकडून न करता त्यांच्या भारतातील २ वितरकांमार्फत केली. MATRIX LABS आणि RARE METABOLICS LIFE SCIENCES हे ते वितरक आहेत.
(१/४)
या ५ लाख उपकरणांचे उत्पादन, उत्पादकाचा नफा आणि चीन ते भारत वाहतूकीचा खर्च पकडून ही उपकरणे १२.२५ करोड रुपयांना MATRIX LABS या वितरकाला मिळाली. नंतर MATRIX LABS ने ही उपकरणे ७.७५ करोड रुपये नफा व १ करोड रुपये GST कर पकडून RARE METABOLICS ला २१ करोड रुपयांना विकली.
(२/४)
नंतर RARE METABOLICS या वितरकाने ही ५ लाख उपकरणे ९ करोड रुपये नफा पकडून @ICMRDELHI या आपल्या संस्थेला ३० करोड रुपयांना विकली.
अर्थात जी उपकरणे १२.२५ करोड रुपयांना भारतात आली त्याच उपकरणांसाठी फक्त वितरकांच्या नफेखोरीमुळे भारत सरकारला १८ करोड रुपये अतिरिक्त खर्च आला.
(३/४)
या व्यवहारात MATRIX LABS आणि RARE METABOLICS यांच्यात काही आर्थिक वाद निर्माण झाले व त्यामुळे या वितरकांनी दिल्ली न्यायालयात धाव घेतली. न्यायालयात आल्यामुळे ही माहिती वितरकांना न्यायालयात जाहीर करावी लागली.
वितरकांमार्फत खरेदी केल्याने भारत सरकारचे केवढे नुकसान होत आहे.
(४/४)
You can follow @MAHATISAGAR.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: