Thread post by B. M. Patil (Kop)
(जनपद गीतांतून)
#BasavaJayanti
#बसवण्णा , तुझे नाम दिशदिशांतरी शिवमंत्र, नवमताचा मंत्र, शेतकरीदादा, नवमंत्र बसवनित्य जप करू या! मादिराज-मादलांबिकानंदन, देवराजअनुज, नागलांबिकाबंधू, निलमावल्लभ, गंगाबिकाकांत, बालसंगय्यतात, चेन्नबसवाचे मामाश्री आणि

आणि समस्त श्रमजीवी, शोषित, पददलित स्त्री-पुरुषांचे अण्णा बसवण्णा यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
सर्वज्ञ असे कल्याण बसवय्या, विखुरला आणुनी शिवप्रकाश भूमीवरी, उच्च कंठारवाने लोक गाऊ लागले!
बसव राज्याचे ऐश्वर्य, बसव गरिबांचा निधी, बसव पाऊस आणि पीकपाणी, बसव देशातील सत्यदीप, बसवचि स्वर्गसोपान!
बसव राज्याचे ऐश्वर्य, बसव गरिबांचा निधी, बसव पाऊस आणि पीकपाणी, बसव देशातील सत्यदीप, बसवचि स्वर्गसोपान!
मोगरा असताना सख्यांनो, अंबाड्यात काटे का माळावे? बसवण्णा असता कल्याणात, दगडात हात का जोडावे?
वेद वेदांचा वाद, भेद निर्मुनी जगात, भेदांत बुडविले जगास, हे सांगण्या नाही कोणी, कुला-कुलांतील भेद नष्ट केले बसवण्णांनी!
वेद वेदांचा वाद, भेद निर्मुनी जगात, भेदांत बुडविले जगास, हे सांगण्या नाही कोणी, कुला-कुलांतील भेद नष्ट केले बसवण्णांनी!
पठिले, जाणिले बसवय्यांनी वेदांमधील मिथ्यापण, भेदादी भेदांच्या गाठी सोडविल्या बसवण्णांनी!
वाद-विवाद चालुनी जाहली वेदांची हार, भेद नकोच म्हणती बसवण्णा, ऐसे घोषिल्याने ठायी ठायी नवविचार!
वाद-विवाद चालुनी जाहली वेदांची हार, भेद नकोच म्हणती बसवण्णा, ऐसे घोषिल्याने ठायी ठायी नवविचार!
बसवप्रकाश कुठे कुठे विहरून आला? साऱ्या भारतभर विहरून आला, हताश मने उजळवीत आला, खिन्न ह्रदये झगमगवीत आला, नारींचे नयनाश्रू सुकवीत आला. ...... - डाॅ. सिद्धय्य पुराणिक
बीज पेरण्याचा मंत्र, पिके कापण्याचा मंत्र, सत्य शिव मंत्र, तुझे नाव बसवण्णा, ह्या मर्त्यलोकी जीवनमंत्र!
खळेच मंटप होऊन, गुणी बसवेश मळणी करणारा रयत होऊन, दंडेश (चेन्नबसव) खळ्यातील खांब झाला, गुरू होई खळ्याला प्रभुलिंग हो!
वेदांतील दोष बसवाने काढले, भेदभाव उघड केला, जनतेला पाजले अमृत बसवाने!
बसवाने वाटचाल करून कल्याण वसविले, सहजी निर्मिला अनुभव मंटप, हाक ऐकून जन तिकडे धावती!
बसवाने वाटचाल करून कल्याण वसविले, सहजी निर्मिला अनुभव मंटप, हाक ऐकून जन तिकडे धावती!
अर्पणाने अनुभाव सांद्र झाला जगी, स्वर्ग अचंबित झाला, दुधाच्या नदीत दासोहाची होडी तरंगली!खाऊन पिऊन ढेकर देई जग, कायकाची स्तुती करीत! जेथे तेथे दासोह, कायक पाहून जिवात जीव आल्याच्या गोष्टी! अल्लम, सिद्धराम असे ज्ञानी आले, कल्याणच्या मंटपी कळी खुलली, बसवण्णा जाईल तेथ सारे मधुर झाले!
शरणांना आठवावे, त्याचीच बोरमाळ घालावी, मोग-याची माळ केसांत माळल्यापरी, कल्याणच्या शरणांना आठव रे मना!