कोरोणा संसर्गानंतर काही कायमस्वरूपी बदल जे व्यवसायात घडतील किंवा करावेच लागतील, त्यावर प्रकाश टाकणारा एक धागा लिहितं आहे. आवडल्यास नक्की शेअर करा
१) व्यवसायात विक्री करण्यासाठी ई-काॅमर्स चा उपयोग फार प्रभावी पद्धतीने करावा लागेल. त्यासाठी आवश्यक असणारे प्राॅडक्ट फोटोग्राफी, प्राॅडक्ट चे बारकावे सांगणारे वर्णन आणि डिजिटल कॅटलॉग यांना सुद्धा यापुढे अनन्यसाधारण महत्व असेल.
२) सामाजिक विलगिकरण (Social Distancing), दुकानातील स्वच्छता (Store Hygiene), कामगारांची वैयक्तिक स्वच्छता (Personal Hygiene) आणि स्वच्छतेच्या प्रक्रिया (Hygiene SOP) हे यापुढे व्यावसायिक ठिकाणांमध्ये अत्यंत कटाक्षाने पाळावे लागेल.
३) व्यवसायांमध्ये केले जाणारे खर्च यापुढे तंत्रज्ञानाचा वापर करून घेण्यासाठी प्राधान्याने करावे लागतील. त्यासाठी व्यावसायिक खर्चाचे प्राधान्यक्रम बदलावे लागतील.
४) डिजिटल मार्केटिंग हा येणारया काळात मार्केटिंग चे महत्त्वाचे माध्यम असेल. त्याला दुर्लक्षित करणं वेडेपणा ठरेल.
५) या महामारी नंतर येणाऱ्या आर्थिक मंदीला तोंड देण्यासाठी अती-आवश्यक, आवश्यक आणि टाळता येणारे अशा तीन प्रकारात खर्चाचे प्राधान्यक्रम ठरवावे लागतील. टाळता येणारे खर्च टाळावे लागतील आणि त्यानुसार आपले त्रैमासिक खर्चाचे कॅलेंडर व्यावसायिकांना बनवावे लागेल.
६) परिस्थिती अनुरूप बदलांना सामोरे जाण्याची तयारी करावी लागेल. बारावी विज्ञान शाखेत शिकलेले Survival of the fittest (बदलांना स्विकारणारे शिल्लक उरतात) हे तत्त्व कायमस्वरूपी आठवणीत ठेवावे लागेल.
७) वरील सर्व गोष्टी मला माझ्या १० वर्षांच्या व्यवसायाच्या अनुभवात शिकायला मिळाल्या आहेत. खुप जाणकार आणि अनुभवी लोक ट्विटरवर आहेत. आपण यामध्ये आपला अनुभव संपादित करु शकलात तर निश्चितच सर्वांना त्याचा नक्कीच फायदा होईल.
धन्यवाद
#म #मराठी_ट्विटर #मराठी @MUL_Maratha #महासंवाद
जाणकार व्यावसायिकांनी कृपया अधिक मार्गदर्शन करावे
@swarada @nikhilchitale @rishidarda @narendrafirodia @AbhijeetTitkare @KohinoorNagar
You can follow @ykproperties09.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: