Information overload चा सगळ्यात मोठा व वाईट परिणाम हा आपल्या लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमतेवर होतो.इंटरनेट वापरताना असंख्य गोष्टी आपल्या मेंदू वर आदळत असतात त्या मेंदूतील भावनांचे केंद्र (amygdala) ला टार्गेट करत असतात, त्यांची मांडणी ही आदिम भावना (लैगिंक,भय व हिंसा) जागृत
P1
करण्यासाठी केलेली असते. कुठल्याही जाहिरातीत साधारणपणे सांपत्तिक स्थिती/status व लैंगिक सुखाशी जोडणाऱ्या गोष्टी आपल्याला ती वस्तू घेण्यासाठी भाग पाडल जात. Internet च व्यसन लागण्यामागे आदिम भावना जागृत होणे हे पण एक सर्वात मोठे कारण आहे. आपण सगळे inner focus व outer focus अश्या
P2
दोन पद्धतीचा वापर करतो. Inner focus हा मनातील भावना,आयुष्यातील मूल्य व चांगली निर्णयक्षमता या कामी येतो तर outer focus हा बाहेरच्या जगाशी संबंध जोडण्यास व टिकविण्यास कामी येतो मात्र इंटरनेट च्या अतिवापराने अंतर्गत लक्ष/inner focus खूपच खालावतो. सतत online राहिल्याने आपण आपल्या
P3
शरीर व मन यातून येणारी स्पंदन लक्षात येत नाही. भूक व झोप या सारख्या शारीरिक क्रियांवर परिणाम होऊन अति व नको ते खाणे, अपुरी झोप असल्या गोष्टी वजन वाढण्यास कारणीभूत ठरतात. डोळ्यांवर ताण, सतत बैठक, बोट/मनगट दुखणे, हे आजार जडतात. चिडचिड, अधिरपणा, चंचलता वाढीस लागून एकाग्रचित होणं
P4
कमी/बंद होत. सतत च नवीन बघण्याची (novelty seeking) ची सवय लागून मेंदू वर cognitive load वाढतो ज्याचा थेट परिणाम हा कार्यक्षमतेवर होतो त्यामुळे कामात/अभ्यासात लक्ष न लागणे, हिंसक/गुन्हेगारी वृत्ती वाढते. सतत आभासी जगात राहिल्याने आपण non-verbal clues/अशाब्दीक भाषा जो मानवी
P5
संवादाचा गाभा आहे तो विसरतो व नाती तुटतात. हे सगळं कमी करण्यासाठी digital detox, relaxation, exercise,offline संवाद वाढविणे, meditation व 7-8 झोप (साधारण रा 10 ते स 6)केल्याने फायदा होतो पण हे चक्र सुरू राहील तर मात्र माहितीच्या विस्फोटाने मेंदूचा विस्फोट व्हायला वेळ लागणार नाही
You can follow @DrVrushaliRaut.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: