फेसबुकने जिओत अक्षरशः महाकाय इन्व्हेस्टमेन्ट केली आहे. या बातमीवर आपल्याकडे ऑलमोस्ट शून्य चर्चा घडली. कोरोना - सर्वांनी घरात बसणे - त्यामुळे धंदे ठप्प पडणे - भविष्य अनिश्चित असणे : या पार्श्वभूमीवर, भारतात लॉक डाऊन होऊन एक महिना ही झालेला नसताना इतकी "महत्वाची" डील घडते हे +
अनेक अर्थांनी गांभीर्याने घ्यायला हवं.
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, हा भारतीय - अमेरिकन कंपन्यांचा चीन समोर शड्डू ठोकण्याचा आजपर्यंतच्या इतिहासातला सर्वात मोठा प्रयत्न आहे.
भारतीय टेक इको सिस्टीममध्ये चीन खूपच डॉमिनेटिंग आहे. टिकटॉक ज्या गतीने ग्रामीण भारतात घुसलं आहे +

ते नजरेत भरण्यासारखं आहे. पोस्ट-कोरोना जगात चीनचा प्रत्येक स्तरावरचा डॉमिनन्स संपवण्याचा चंग बांधलेल्या देशांपैकी अमेरिका आणि भारत दोघेही प्रमुख असणार आहेत. या पार्श्वभूमीवर फेसबुक-जिओ डील फार महत्वाची ठरते.
डीलचे आकडे बघितले की हे महत्व अधोरेखित होतं. +
डीलचे आकडे बघितले की हे महत्व अधोरेखित होतं. +
जिओच्या ९.९% इक्विटीसाठी ५.७ बिलियन डॉलर्स - ४३,५७४ कोटी रुपये - मोजलेत फेसबुकने. म्हणजेच जिओचं मार्केट व्हॅल्युएशन सुमारे ६५.९५ बिलियन डॉलर्स - ५,०४,१५९ कोटी रुपये इतकं झालं आहे. +
जगभरात आजपर्यंत मायनॉरिटी स्टेक साठी, इतक्या मोठ्या व्हॅल्युएशनवर, कोणत्याही टेक कंपनीने इन्व्हेस्टमेन्ट केलेली नाही. भारतात आजवर कोणत्याही टेक कंपनीत एकगठ्ठा एवढा मोठा FDI आलेला नाही.
स्टार्ट अप इन्व्हेस्टमेन्टस कश्या होतात, का होतात +
स्टार्ट अप इन्व्हेस्टमेन्टस कश्या होतात, का होतात +
याकडे फक्त "चांगल्या कंपनीच्या ग्रोथचा लाभ घेणे" इतकाच विचार इन्व्हेस्टर करतात असा समज आपल्याकडे (खासकरून मराठी उद्योजकांमध्ये) रुजलेला आहे. वस्तुस्थिती फार वेगळी आहे.
फेसबुकने जिओत केलेली इन्व्हेस्टमेन्ट दाखवून देते की स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप - +
फेसबुकने जिओत केलेली इन्व्हेस्टमेन्ट दाखवून देते की स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप - +
हाच अश्या इन्व्हेस्टमेंटचा मुख्य हेतू असतो. फेसबुक एक टेक कंपनी आहे, जिओ त्या टेक चं भारतात डिस्ट्रिब्युशन करू शकणारी यंत्रणा आहे. शिवाय दोघांनाही फक्त "आमचं app वापरा...इंटरनेट वापरा" इतकंच करून थांबायचं नाहीये. ईकॉमर्सचा कानाकोपरा आपल्या आवाक्यात घ्यायचाय. +
इथेच दोघांचं शुभमंगल झालं आहे.
फेसबुकने ज्या झपाट्याने विविध टेक स्टार्ट अप्समध्ये गुंतवणूक केली आहे, त्यातून या महाकाय स्वप्नाची पुसटशी कल्पना येते. जिओ त्याला पूरक आहे. म्हणून ही युती.
सर्वात महत्वाचं - +
फेसबुकने ज्या झपाट्याने विविध टेक स्टार्ट अप्समध्ये गुंतवणूक केली आहे, त्यातून या महाकाय स्वप्नाची पुसटशी कल्पना येते. जिओ त्याला पूरक आहे. म्हणून ही युती.
सर्वात महत्वाचं - +
कोरोनाच्या वादळात, लॉक डाऊन असताना, इंटरनॅशनल फ्लाईट्स बंद असताना अब्जावधींची ही डील घडून आलीये.
हीच नव्या जगाची नांदी आहे.
घरात बसून "बोअर" झालेल्या, "काहीच करता येत नाहीये" म्हणून फ्रस्ट्रेट झालेल्या प्रत्येकाचे डोळे खाड्कन उघडणारी ही घटना आहे. +
हीच नव्या जगाची नांदी आहे.
घरात बसून "बोअर" झालेल्या, "काहीच करता येत नाहीये" म्हणून फ्रस्ट्रेट झालेल्या प्रत्येकाचे डोळे खाड्कन उघडणारी ही घटना आहे. +
"डिजिटल इंडिया" म्हणजे seo-फेसबुक-व्हाट्सअप मार्केटिंग वा फार फार तर डिजिटल पेमेंट्स - इतका बाळबोध समज असणाऱ्यांनी आता आपल्या व्यवसायाला नव्या जगात टिकण्यासाठी काय काय करायला हवंय हा विचार करण्यास प्रोत्साहित करणारी ही घटना आहे. +
लॉक डाऊन मुळे लॉक होऊन पडणारे लोक कधीच मुकेश अंबानी आणि मार्क झुकरबर्ग होऊ शकत नाहीत - हा या डीलचा सर्वात मोठा धडा आहे आपल्यासाठी. :)
: ओंकार दाभाडकर
d.omkar1@gmail.com
: ओंकार दाभाडकर
d.omkar1@gmail.com
@threadreaderapp please unroll