Thread Post by Vishal phutane -
तुम्हाला आदरणीय राजकुमारी कौल या व्यक्तीचे नाव माहिती आहे का ? माहीत नसेल तुमच्या माहितीसाठी सांगतो अटलबिहारी वाजपेयी यांची एक अशी मैत्रीण. जी शेवटपर्यंत आपल्या कुटुंबासहीत अटलबिहारी वाजपेयी यांच्या सोबत राहत असे.
वाजपेयी यांच्या मृत्युनंतर ज्या मुलीने अंत्यसंस्काराच्या वेळी अग्नी दिला ती याच राजकुमारी कौल यांची मुलगी. वाजपेयींनी तीला दत्तक कन्या मानलं होतं.
ही व्यक्ति भारताच्या राजकीय वर्तुळाच्या केंद्रभागी होती. कित्येक वर्ष.
२०१४ ला त्यांच निधन झाल्यानंतर प्रथमच प्रसारमाध्यमांनी याबाबतीत लिखाण केलं.

खूप महत्त्वाची व्यक्ति होती. खरं तर ईतक्या वर्षांमधे या गोष्टीवर किती तरी अफवा पसरल्या जावु शकत होत्या. राजकारण करायच ठरवलच असतं तर कदाचित बदनामीच अस्त्र सुद्धा वापरता आलं असतं.
वाजपेयी अन कौल यांच्या मैत्रीच्या पवित्र नात्यावर शितोंडे उडवता आले असते. पण अस गलिच्छ राजकारण एकदा सुद्धा घडलं नाही. ती काॅग्रेसची संस्कृती कधीच नव्हती.
तो अध्याय भारताच्या राजकीय सभ्यतेचा उच्च क्षमतेचा होता. तो असा काळ होता ज्यावेळी राजकारण करताना काही मर्यादा पाळल्या जायच्या. शिष्टाचाराचा अवलंब केला जायचा. प्रत्येक व्यक्तीच्या मतांचा, भावनेचा आदर केला जायचा.
वैचारिक भिन्नता ही फक्त राजकारणापुरती मर्यादीत ठेवुन प्रत्येक गोष्टीचं पावित्र्य कसं अबाधित राहिल याचा विचार केला जायचा.मला अभिमान आहे की राजकारणात अशा प्रकारची एक सामुहिक सभ्यता एकेकाळी या देशात होती.
परंतु आज जे काही चालू आहे ते मात्र अत्यंत नीच पातळीच्या सभ्यताहीनतेचे लक्षण आहे. सोनिया गांधी यांचा पक्ष तुम्हाला आवडत नसेल. हरकत नाही. राजकारण आवडत नसेल हरकत नाही. पण ज्या बाईंनी देशासाठी आपलं आयुष्य खर्ची केलं.
जिने देशासाठी आपला नवरा गमावलाय त्या भारताच्या सुनेला आज ज्या भाषेत टिका केली जातेय त्याने सभ्यतेच्या सगळ्या मर्यादा आज ओलांडल्यात अन स्वताला संस्कृतीरक्षक म्हणवणारे चेहरे सुद्धा एकप्रकारे उघडे पाडले.
खरं तर २०१४ च्या अगोदरच याची सुरवात झाली होती. खोटे अन घाणेरडे फोटोशाॅप बनवुन अनेक व्यक्तींच चारित्र्यहनन करायचा एक ट्रेंड मार्केटला या काळात आला. तो आजपर्यंत आहे. अक्षरशः बहीण भावाच्या पवित्र नात्याला सुद्धा यांनी सोडलं नाही.
कधी नेहरुंचा बहीणीसोबतचा फोटो प्रेयसी म्हणुन फिरवला गेला. कधी हाॅलीवुडमधे बाई सोबत नाचणार्या अॅक्टरला गांधी म्हणुन सांगितलं गेलं तर कधी विदेशातील एका माॅडेलचा फोटो सोनीया गांधीच्या नावाने फिरवला.
हर एक प्रकारे बदनामी चालु असताना सुसंस्कृत पक्षाचे सर्व नेते या गोष्टीला मुकसंमती देत आले ते आजतागायत देतायेत. अर्थात अश्या गोष्टीला हीच नेतेमंडळी निवडणुका जिंकण्याची स्ट्रॅटेजी मानतात.
अक्षरशः उघडपणे हे सगळं कबुल करताना त्यांच्या चेहर्यावर तुम्हाला कधीच अपराधीपणाची भावना सुद्धा दिसणार नाही. उलट तुमच्याकडे बघुन कुत्सितपणे हसतील अन पुढं जातील. भारतीय राजकारणाला जर ईतक्या खालच्या पातळीवर जर कुणी नेलं तर ते आजच्या नेत्यांनी.
"राहुल गांधी तेरी मा का **सडा"

हा ट्विटर वर आज नंबर एकला असलेला ट्रेंड.
सुसंस्कृत अन सुशिक्षित पक्षाचे सगळे समर्थक आज याच भाषेमधे सोनीया गांधी यांच्या वर टिका करत होते. विशेष म्हणजे या भाषेत टिका करताना अनेक महीलासुदधा आघाडीवर होत्या.
ही कुठली पद्धत आहे एका स्त्रीवर टिका करायची.
तुम्हाला लढायच असेल समोरुन लढा. मुद्द्यावर लढा. चारित्र्यहनन अन बदनामी करणे ही कुठल्या योद्ध्याची लक्षणं आहेत ?
अटलबिहारी वाजपेयी ज्यावेळी काॅग्रेसच्या चुकांवर बोटं ठेवायचे त्याचवेळी ते काॅग्रेसने केलेल्या कामाच सुद्धा कौतुक उघडपणे करायचे.
कारण तो माणुस मुद्द्यांवर लढताना राजकारणातील प्रामाणिकपणा आणि शिष्टाचार जपत होता म्हणुनच त्या माणसाबद्दल कायम आदर टिकुन राहीला.
"सुसंस्कृत राजकारणी" ही ओळख वाजपेयींनी शेवटपर्यंत ठिकवली ती याच कारणामुळे.

या माणसाच्या आयुष्यात ना कधी कुठल्या राजकीय व्यक्तीने डोकावलं ना कुठल्या राजकीय पक्षाने. त्याकाळातील माध्यम सुद्धा तेवढीच संयमी असायची.
माध्यमांनी सुद्धा कधी वाजपेयींच्या अंतर्गत बाबींमधे ना कधी हस्तक्षेप केला ना कधी चटपटीत अन मसालेदार बातम्या पेरल्या. अश्या पद्धतीने पर्सनल टिका करुन टारगेट करणे हे उत्तम पत्रकारीतेच लक्षण नाही याची जाणीव कदाचीत त्या काळात चौथ्या स्तंभाला असावी.
याबाबतीत मी शंभर टक्के काॅग्रेसला धन्यवाद देतो कि त्यानी राजकारणातील सभ्येतेच्या मर्यादा काही बाबतीत नक्कीच पाळल्या आहेत. कुणाच्या खाजगी आयुष्यात डोकावुन व्यक्तीगत हल्ले नाही केले.
आज वाजपेयी जर आपल्यात असते तर सोनीया गांधीवर ज्या भोषेत टिका होतं आहे हे एकतर त्यांना कदापी सहन झालं नसतच. दुसरं म्हणजे स्वताच्याच पक्षामधे झालेला ईतका सांस्कृतिक बदल बघुन त्यांनी नक्कीच आज सोनीयांजींची भेट घेवुन नाराजी तर व्यक्त केलीच असती.
आभाराप्रती दोन ओळी सोनीयाजींना नक्कीच सांगितल्या असत्या..

दाँव पर सब कुछ लगा है, रुक नहीं सकते
टूट सकते हैं मगर झुक नहीं सकते
You can follow @faijalkhantroll.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: