❝ सोनिया गांधी ❞

सोनिया गांधींचा जन्म इटलीत झाला. कोणाचा जन्म कोणत्या देशात, प्रदेशात, जातीत, धर्मात व्हावा हे कोणाच्या हातात नसते आणि त्यासाठी ती व्यक्ती जबाबदार नसते. पण सोनिया गांधी यांना ही सूट नाही. कारण...
सोनियाजींनी गांधी घराण्यात लग्न केलं. नेहरू-गांधी घराणं यांनी देशासाठी कितीही त्याग केला असेल, तुरूंगात जावं लागलं असेल, वेळ आली तेव्हा छातीवर गोळ्या झेलल्या असतील किंवा बाॅम्बस्फोटात शरिराच्या चिंधड्या चिंधड्या उडाल्या असतील. तरी सोनिया गांधी देशभक्त नाहीत कारण...
सोनिया गांधींचा जन्म 1946चा.1968 साली त्यांनी राजीव गांधींशी लग्न केलं. त्या भारतात आल्या. राजीव गांधींनी राजकारणात येऊ नये असं त्यांना आधीपासूनचं वाटत होतं. आधी संजय गांधींचं अपघाती निधन झालं. इंदिरा गांधीची गोळ्या झाडून मृत्यू झाला.
नंतर तर खुद्द राजीव गांधींचा बाॅम्ब स्फोटात मृत्यू झाला.
आपली सासूचा जीव ज्या बाईने आपल्या डोळ्यांनी पाहिला. ज्या बाईने देशासाठी आपला पती गमावला आणि अंत्यसंस्कार म्हणून फक्त शरिराच्या चिंधड्यांचं दर्शन घेतलं तरी या बाईंना इथल्या मातीशी आपुलकी नाही असं ठराविक लोक म्हणतात कारण....
लग्न झाल्यापासून जी बाई फक्त भारतीय परंपरेनुसार वागली त्या बाईची चूक एवढीच की ती तिचा जन्म इटलीत झाला. भलेही तिने आपल्या आयुष्याची पन्नास वर्षे भारतात घालवली, संघर्ष केला, विस्कटलेला पक्ष उभा केला, १० वर्ष सत्ता टिकवली आणि देशाची सेवा केली. पण त्या बाई भारतीय नाहीत कारण....
सोनिया गांधींची जन्मभूमी इटली आणि कर्मभूमी भारत. आपण भारतीय लोक जन्मापेक्षा कर्मावर विश्वास ठेवतो. पण हा नियम सोनिया गांधीना लागू नाही. कारण.......

आपली संस्कृती ही स्त्रियांची पूजा करणारी संस्कृती आहे पण सोनिया गांधींना तो मान नाही. कारण....
कारण त्यांचा जन्म इटलीत झाला, त्या गांधी घराण्याच्या सून आहेत, त्यांनी देशासाठी आधी आपली सासू आणि नंतर आपला पती गमावला, त्या काॅंग्रेसच्या अध्यक्षा आहेत आणि महत्वाचं म्हणजे त्या एक स्री आहेत.

Dear Madam,
They are selective, they are misogynist,they are mentally ill. Forgive them
You can follow @rohan_mutha.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: