-'टोल'वणारे भ्रष्टाचारी सरकार-
आपण सगळ्यांच्या विचारांत, चर्चेत सध्या फक्त करोनाचा विषय असताना दुसरीकडे सरकारने काय केलंय बघा- 'मुंबई पुणे एक्स्प्रेस'वे चा टोल वाढवला आहे. (1/4)
वास्तविक टोलच्या झोलात अगदी मुकुटमणी शोभावा असा हा टोल. टोलची रक्कम ठरवताना असं गृहीत धरण्यात आलं होतं की टोल घेणाऱ्या कंपनीला 15 वर्षात एकूण 2869 कोटी रुपये मिळतील. यामध्ये कंपनीला मिळणारा भरघोस नफा धरलेला होता. (2/4)
प्रत्यक्षात कंपनीने जाहीर केल्या नुसार (खरं काय ते माहीत नाही.) कंपनीला तब्बल 4369 कोटी रुपये मिळाले. म्हणजे 1500 कोटी जास्त, म्हणजे वर्षाला 100 कोटी जास्तीचा नफा! हे जास्तीचे पैसे तुमच्या आमच्या खिशातून चुकीच्या गृहितकावर अवलंबून राहून सरकारी आशीर्वादाने लुटले गेले. (3/4)
आणि तेच गृहीतक तसंच ठेवत नव्याने कंत्राट केलं गेलंय. त्याचनुसार ही टोलवाढ केली आहे. जेव्हा सरकार लोकांच्या भल्यापेक्षा आपल्या मर्जीतल्या कंपनीवर मेहेरबान होऊन निर्णय घेतं तेव्हा त्याला क्रोनी कॅपिटलिझम म्हणतात. आपलं सरकार हे असं भ्रष्टाचारी आहे. (4/4)
You can follow @TanmayKanitkar.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: