💠 मिनी पाकिस्तान 💠

शहर आणि गाव जास्त फरक नसतो मुळात. फक्त शब्दांचा खेळ. कुणी मोहल्ला म्हणतं, कुणी मिनी पाकिस्तान म्हणतं. कुणी लांड्यांची गल्ली म्हणतं. ज्याला जे वाटतं ते म्हणत.
1/n
मुद्दाम लिहितोय आज. रोज याच्या ना त्याच्या मुखातून , बोलण्या चालण्यातून, वागण्यातून ऐकतोय, बघतोय अन् विचार करून गप्प बसतोय.

का म्हणत असेल जो कोणी असेल तो ?
त्याला भीती नसेल का वाटतं ?
2/n
बरं हे जे ऐकून घेतात यांना नाही का याबद्दल चीड येत , वाईट वाटतं, त्रास होत, मग हे का गप्प बसतात?

कधी कोणी केला आहे का विचार, आहे का उत्तरं याचं. याच उत्तर बहुसंख्यांक समाज आहे त्याकडं आहे. अल्पसंख्यांक कडे नाही.
3/n
ऐकून का घेतात कारण त्यांना बोलायला शिकवलेलच नसतं मुळात. नेहमी गप्प बसायचं, फक्त ऐकायचं, काहीच न बोलता एखादी कानाखाली खायची उगाच विषय वाढला तर कोण आहे आपलं. हे ज्याच्यात्याच्या बापाने सांगितलेलं असतं अन् त्याला त्याच्या बापाने. म्हणजे हे कधीपासून चालत आलंय नाही माहीत.
4/n
पण हे असच असतं गावाकडे. 100 घरांपैकी 10 घर मुस्लिम लोकांची इथेच निकाल लागतो कोणी कोणावर प्रभुत्व दाखवायचं ते. जरी "समोरच्याने काही विरोध दर्शवला तर आयुष्यभराच दुखणं होऊन बसतं मग कोण निस्तारणार रोजचं मरण."
5/n
गावाकडे प्रत्येक अल्पसंख्यांकला मग तो दलीत असो किंवा मुस्लिम यांना एक तरी बहुसंख्यांक मधल्या माणसाची जवळीक ठेवावी लागते अगदी खूपच. म्हणजे कधी काळी मरणाची सगळ्याच घरांवर पाळी आली तर मारणाऱ्यातल्याच एकाकडे मदत मागायला कोणी तरी असावं म्हणून.
6/n
उठसुठ कोनीपण शिव्या द्यायच्या पाहिजे तस बोलायचं, वागवायच, नाही तर जावा म्हणायचं तुमच्या पाकिस्तानात. तोंडावरच बोलायचं म्हणजे त्याने परत कधीच मान वर नाही काढली पाहिजे. कसे बोलणार हे लोक, कधी उठवणार आवाज, आहे का शक्य आपल्यामुळे हे.
7/n
शहरात तर सरळ सरळ मिनी पाकिस्तान म्हणून मोकळे होतात. मिळतो का कोणाला फ्लॅट सोसायटीमध्ये. मिळते का रेंट वर फ्लॅट,रूम कोणाला. जिथे त्यांची लोकं राहतात तिथेच जावं लागतं शेवटी. ही आपली वृत्ती यात त्यांचा काय दोष.
8/n
कायदे, अधिकार कागदावरच आहेत सत्य काहीस वेगळच आहे.

"प्रत्येकवेळी जय श्री राम म्हणलं की त्यांना भारत माता की जय म्हणावं लागतं."

"इकडे कोणी भगवा फिरवला की तिकडं त्यांना तिरंगा हातात घ्यावा लागतो."
9/n
दलितांना, मुस्लिमांना काहीच करायची गरज नाही बदल माणसात अन् त्याच्या विचारात झाला की माणूस म्हणून माणुसकीने माणसाला जगता येईल.
धर्म पाळा पण उंबर्याच्या आत. बाहेर फक्त विवेक जागेवर ठेऊन माणुसकी पाळा. आपोआप आपण सर्वसमावेशक/ धर्मनिरपेक्ष होऊ.
10/n
आता येतो "मिनी पाकिस्तान" या नावावर. जे आहे तेच लिहायचा प्रयत्न केलाय मग हे नाव का नको. देशद्रोही आहे का मी तर हो आहे. "देशद्रोही". तत्व बाजूला ठेवणाऱ्यांनी डोळे फाडून बघितलं असेल सुरुवातीलाच तेच नकोय इथे.

तुम्हाला हवा तसा उपयोग करून घ्यायला कोणी धर्म नाही विकायला काढलेला .
11/n
"धर्माचं राजकारण करण्यापेक्षा माणुसकीने समाजकारण करा". कालच्या झुंडबळीमध्ये ना मुस्लिम होते ना दलीत होते ना ते कोणी गरीब होते ना मारणारे अल्पसंख्यांक होते. होते सगळे हिंसा करणारे अडाणचोट बहुसंख्यांक .
12/n
कशाला हवी आहेत नावं,आडनाव, धर्म जात जे झाल ते चुकीचं आहे पण आपल्या सोयीप्रमाणे घेतलं तर. नाही तर फाशी द्या, उभा कपा, गोळ्या घाला, त्याची धिंड काढा ही कोणत्या आदर्श धर्माची/समाजाची शिकवण आहे ते तरी सांगा. विवेक बुद्धीने डोळसपणे प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोन ठेवा.
13/n
जे चूक ते चूकच म्हणून हिंसेच समर्थन न करणे हेच आदर्श समाजाचं लक्षण आहे.
वाचलच आहे तर विचार नक्की करा. प्रतिक्रिया अन् उणिवा कळवा.
समाप्त. 🙏
~ शुभम गरड .
#म
#मराठी
#निरीक्षण
#विचार_करा

@arvindgj @Liberal_India1 @praveengavit10 @swapnp @Nishigandha269 @me_amya007 @aviuv
You can follow @Shubham_G2118.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: