एकीकडे पुणे शहरात आयुक्तांनी कडक कर्फ्यू लावलाय. मुंबईत मात्र शिथिलता आणलीय. लोक बाहेर पडायला बघतायत. हिच कठोर किंबहुना अधिक कठोर पावले मुंबईसाठी उचलायला हवी होती. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चांगले काम करताहेत. आपण काही बोलायचं नाही, नाहीतर भक्तीचा स्टॅम्प...
लागलाच म्हणून समजा. काही तुचिये स्वतःच योगी आणि ठाकरेंचे पोल तयार करतात. आणि मग ठाकरे ग्रेट दाखवण्याचा प्रयत्न करतात. मुख्यमंत्र्यांबद्दल आम्हालाही आस्था आहे. मात्र त्यामुळे बिघडलेली परिस्थिती पाठिशी घालता येणार नाही. मुंबईतील करोनाग्रस्त देशात सर्वाधिक आहेत हे सत्य स्वीकारून..
पुढे जावं लागेल. व्होटबँकेच्या नादात, लोक नाराज होतील म्हणून आजही कडक निर्णय घेण्यास सरकार कचरतंय. आधीच पालिकेच्या मदतीनं मुंबईला रंडकी केलीय. जे ते येऊन फक्त मुंबईवर चढून गेले, नि जबाबदारीची वेळ आली तेव्हा शेपूट घालून घराकडे पळाले.. शेवटी ताठ उभा राहीला तो मुंबईबाहेर घालवलेला
मराठी माणूस! दस्तुरखुद्द टाटा बोलले. बिल्डरांनी मुंबईच्या नगरनियोजनाची वाट लावलीय. अक्षरशः उभ्या झोपड्या उभ्या केल्या. आता पालिकेत सत्तेत कोण हे वेगळ्याने सांगायला नको. सध्या वाइन शॉप्ससंदर्भात निर्णय प्रलंबित आहे. त्यातून महसूलाचा प्रश्न सुटणार याची..
कल्पना आहे. मात्र शुद्धीत असून न ऐकणारे
लोक नशेत ऐकतील काय? आम्ही पक्षाचे (कुठल्याही) आंधळे कार्यकर्ते नाही. नेता चुक की बरोबर, काही माहित नाही. लगेच वकीलीपत्र घेऊन दारात.. परिस्थिती बिघडल्यास मुंबईत यापूर्वीच ३० हजार (अंदाजित) लोकांच्या स्वर्गगमनाची सोय झाल्याचं कळतंय.. कदाचित
उडती खबर असेल. मात्र सत्य असेल तर, अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली घराबाहेर मुजरा करण्यास बाहेर पडणा-यांस डांग सुजेवोस्तर हाणायला हवे. आणि यासाठी यंत्रणेला काहीअंशी फ्रीहँड द्यायला हवा. मात्र सरकार तो देताना दिसत नाही.
एक सामान्य नागरिक म्हणून, त्या फालतू (जाणिवपूर्वक) पोल घेणा-यांच्या नादी न लागणं योग्य! मी मागेही म्हटलं आता दिसतेय ती सोशल मीडियावरची चांदणी.. कौतुकाचे अजून चार दिवस बाकीयत. मात्र आकडे जसे वाढत जातील तसा सामान्य लोकांचा उद्रेक बाहेर आल्याशिवाय राहणार नाही. त्याचं प्रात्यक्षिक..
आज शिवडीतील हत्या घटनेनं समोर येतंय. सुरूवातीला आकडे कमी होते तेव्हा कौतुक चालून गेलं. खरी कसोटी सुरू झालीय. करोना मुंबईत कम्युनिटी स्टेजपलिकडे गेलाय हे मान्य करा. नाहीतर ज्या वेगानं लोकांनी वर उचलून धरलंय त्या वेगानं खाली आपटायला ते वेळ लावणार नाहीत. इतकं वाचूनही..
प्रकाश पडला नसेल तर ठिके! मी ही बोलतोय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे छान काम करताहेत!
You can follow @RaneSays.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: