📌📌📌
ऐका भविष्यातील हाका...

एका आर्टिकलच्या निमित्ताने पायाभूत सुविधा क्षेत्रातील तज्ज्ञांशी बोलणे झाले. त्यानुसार काही विचार मांडत आहे. करोनाच्या पश्चात अनेक विकासकामांमध्ये स्थलांतरित मजुरांचा प्रश्न आ वासून उभा राहणार आहे. करोनाच्या भीतीने... (१/११)
हजारो मजूर आपल्या मूळगावी परतले आहेत. परिणामी, मुंबईमध्ये निर्माण होणारा मजूरवर्गाच्या उपलब्धतेच्या प्रश्नाकडे मराठी तरुणांना संधी म्हणून पाहता येणार आहे. ते तज्ज्ञ म्हणतात, 'मुंबईत मेट्रो प्रकल्प, उड्डाणपूल तसेच महामार्ग बांधणीसारखे मोठे प्रकल्प सुरु आहेत. हे सर्व प्रकल्प (२/११)
हाताळणाऱ्या कंत्राटदारांसमोर स्थलांतरित मजुरांना पुन्हा आणण्यासाठी सर्वाधिक प्रयत्न करावे लागणार आहेत. कारण त्यांच्याकडे कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या संख्या अधिक आहे. हे स्थलांतरित झालेले सर्वच मजूर पुन्हा परततील असे नाही. काहीजण मूळगावी... (३/११)
राहणे पसंत करतील. जे पुन्हा येतील, किंवा इथेच अडकून पडले आहेत त्यांना थांबवून ठेवण्यासाठी आरोग्यविमा, किंवा इतर आरोग्य सुविधा तसेच पगारवाढीसारख्या क्लुप्त्या लढवाव्या लागतील. त्यामुळे कामगारवर्गावर होणारा खर्च वाढण्याची शक्यता आहे. तसेच संचारबंदी उठल्यानंतर.. (४/११)
लगेचच कामे सुरु होतील असे नाही. या मजुरांची फळी लवकरात लवकर उभी करणे आत्यंतिक गरजेचे असणार आहे.'

आता लक्षात घ्या.. ज्यांना जायचे होते ते गेले. जाताना नामी संधी मागे ठेऊन गेले. आता या संधीचा लाभ कसा घ्यावा हा प्रश्न उरतो. तत्पूर्वी. लक्षात घ्या की, ही मंडळी... (५/११)
निश्चितपणे पुन्हा येणार. हे सत्य आहे. ते स्वीकारा. कारण कंत्राटदारांना त्यांची कामे हरतऱ्हेने पूर्ण करायची आहेत. आता करोनानंतर आपल्याकडील समाजसेवक, नेते, अभिनेते (हे नेतेच, फक्त अभिनय करणारे) मराठी बांधवांसाठी पुढे येतील. मराठी नोकऱ्यांवर मराठी पोरांचा हक्क वगैरे आरोळी.. (६/११)
ठोकतील. मात्र प्रत्यक्षात मराठी मुलांनी 'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार' या वाक्यावर विश्वास ठेवायचा. आणि हो! आपण आपल्या जागेवर नसू तर दुसरा कोणीतरी येऊन ती जागा बळकावणार. त्यामुळे तुम्ही तुमची जागा घ्या, तरच ते त्यांच्या जागी राहतील. बहुतांश संधी या मजूरांसाठी... (७/११)
खुल्या होणार आहेत. आपल्या पोरांची खोटी प्रतिष्ठा सोडून काम करण्याची तयारी असेल तर तरच त्यांनी पुढाकार घ्यावा. कॉलसेंटरमध्ये ७-८ हजारात काम करण्यापेक्षा, ९ तास कसून मेहनत करत वीसेक हजार कमावण्यात काहीच रकत नाही. त्यानंतर स्थानिक स्तरावर छोटे-मोठे व्यवसाय... (८/११)
सुरु करता येतील. लाज सोडा. त्या 'चार लोकांनी' तुमच्यातील टॅलेंट वाया जाऊ देऊ नका. हातात नोकरी नसेल तर डोळे झाकून व्यवसायाचा विचार करा. अर्थात आपल्या क्षमतेचा विचारही करा. कारण सर्वच उदयॊजक झाले तर कर्मचारी पण हवे की नाही? आणि हो विविध प्रकल्पांमध्ये केवळ मजूरच नाही तर... (९/११)
अभियंत्यांची (इंजिनीअर्स) गरज आहे. हे मी स्वानुभवाने सांगतो. कारण मेट्रो प्रकल्प फिरताना उत्तरप्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल विभागातील अभियंते भेटले. त्यामुळे आपल्याकडील अभियंत्यांना देखील सातत्याने पालिका, एमएमआरडीए, एमएमआरसीच्या वेबसाइट्स धुंडाळा. प्रचंड संधी आहेत... (१०/११)
माझ्या पाहण्यात, @iamShantanu_D सारखी पोरं कुठलाही स्वार्थ मनी न ठेवता काम करत आहेत. त्यांची मदत घ्या. ही संधी सोडलात की भविष्यात राज्यकर्त्यांना शिव्या घालण्याइतपतही अधिकार उरणार नाहीत.
खूप शुभेच्छा❤️ (११/११)
You can follow @RaneSays.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: